हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

फेशिअलच्या बाबतीत अनेक जण आग्रही असतात. चेहर चमकदार आणि स्वच्छ दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेशिअल्स ट्राय करतो. पण आज आपण ज्या फेशिअलबद्दल जाणून घेणार आहोत ते इतर फेशिअलच्या तुलनेत आहे फारच वेगळे आणि खास. ते आहे ‘ हायड्रेटिंग फेशिअल’. या फेशिअलबद्दल जर तुम्ही ऐकले नसेल तर आजची आमची माहिती तुमच्यासाठी आहे फारच महत्वाची. कारण या फेशिअलचे फायदे जाणून घेतल्यानंतर हायड्रेटिंग फेशिअल एकदा तरी करुन पाहावे अशी इच्छा नक्की होईल. चला तर जाणून घेऊया हायड्रेटिंग फेशिअल म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे आणि ते कसे केले जाते याविषयीची अधिक माहिती.

Table of Contents

  हायड्रेटिंग फेशिअल म्हणजे काय? (What Is Hydrating Facial In Marathi)

  Instagra

  त्वचा चांगली दिसण्यासाठी त्यावर मॉईश्चर दिसणे गरजेचे असते. जर हे मॉईश्चर काही कारणास्तव कमी झाले असेल तर तुमच्या त्वचेला तजेला देण्यासाठी हायड्रेटिंग फेशिअल करण्याचा सल्ला दिला जातो. हायड्रेटिंग फेशिअल तुमच्या त्वचेचा पोत सुधारुन तुमची त्वचा चांगली करण्याचे काम करते. हायड्रेटिंग फेशिअलमध्ये वापरलेल्या प्रोडक्टमुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते. अगदी पहिल्याच फेशिअल ट्रिटमेंटनंतर तुमची त्वचा अधिक चांगली खुलून दिसू लागते. 

  हायड्रेटिंग फेशिअलचे फायदे (Benefits Of Hydrating Facial In Marathi)

  हायड्रेटिंग फेशिअल म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर त्याचे नेमके तुमच्या त्वचेवर काय फायदे होतात ते आता आपण जाणून घेऊया.

  मुलायम आणि कोमल त्वचा (Soft And Smooth Skin)

  Instagram

  मुलायम आणि कोमल त्वचा कोणाला आवडत नाही. हायड्रेटिंग फेशिअलचे मुख्य उद्दिष्ट तुमच्या त्वचेतून गायब झालेला तजेला तुम्हाल परत मिळवून देणे. अनेकदा त्वचेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचा अनाकर्षक दिसू लागते. अनेकदा त्यातील मॉईश्चर कमी झाल्यामुळे रुक्षही दिसते. फेशियल हायड्रेट केल्यावर आपल्याला मऊ आणि सुंदर त्वचा मिळेल. आपल्या हातावर अशा त्वचेचा स्पर्श आपल्याला वासना वाटतो.

  उजळ त्वचा (Brighter Skin)

  उजळ त्वचा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुमच्यासाठी हे फेशिअल फारच चांगले आहे. खरंतरं प्रत्येक फेशिअलमध्ये तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकली जाते. त्यामुळे तुमच्या त्वचेखाली दडलेला उजळपणा तुम्हाला परत मिळवून देण्याचे काम हायड्रेटिंग फेशिअल करते. त्वचेवरील मृत त्वचा निघून गेल्यामुळे तुमची त्वचा अधिक आकर्षक दिसते.त्वचेला एक वेगळाच ग्लो येतो. त्यामुळे तुम्हाला उजळ त्वचा हवी असेल तर तुमच्यासाठी हा एकदम योग्य असा पर्याय आहे.

  त्वचेला देते तजेला आणि ओलावा (Hydrated And Supple Skin)

  Instagram

  कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी अशा त्वचेला एक प्रकारचा तजेला आणि ओलावा आवश्यक असतो. हा ओलावा पुरवण्याचे काम करते. हायड्रेटिंग या शब्दाप्रमाणे तुमची त्वचा हायड्रेट करण्याचे काम करते. त्वचा हायड्रेट असेल तर ती नेहमी हेल्दी आणि चांगली दिसते.

  पिंपल्सवर करते कमाल काम (Works On Pimples)

  मुरुम टाळण्यासाठी बरेच लोक फेशियल वापरतात. जर तुम्ही पिंपल्ससाठी कारणीभूत असणारे पोअर्स स्वच्छ करुन त्वचेला अधिक चांगले करण्याचे काम हायड्रेटिंग फेशिअल करते. जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर ते अधिक न पसरवता तिथल्या तिथेच पिंपल्स दाबण्याचे काम हे फेशिअल करते.

  एकसारखी त्वचा आणि चांगला पोत (Even Skin Tone And Texture)

  Instagram

  त्वचा नीट निरखून पाहिली तर आपल्या त्वचेवर अनेक ठिकाणी काळे डाग असतात. कपाळ, नाक आणि ओठांच्या आजुबाजूला त्वचा थोडी काळवंडलेली असते. हायड्रेटिंग फेशिअलच्या मदतीने त्वचा स्वच्छ होत एकसारखी होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेचा पोतही सुधारण्यास मदत मिळते. यामुळे तुमची त्वचा ग्लो होऊ लागते.

  हायड्रेटिंग फेशिअल कसे केले जाते ? (How To Do Hydrating Facial In Marathi)

  Instagram

  हायड्रेटिंग फेशिअलचे फायदे वाचल्यानंतर हे फेशिअल नेमके कसे केले जाते ते आता आपण जाणून घेऊया 

  • फेशिअलची पहिली पायरी असते ती म्हणजे क्लिन्झिंगची. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा चेहरा विशिष्ट क्लिनझरच्यमदतीने स्वच्छ केला जातो. चेहरा क्लिन्झ केल्यानंतर चेहऱ्यावर साचलेली अतिरिक्त धूळ काढण्यास मदत मिळते. शिवाय तुमचे पोअर्स ओपन होतात. 
  • क्लिन्झिंगनंतरची दुसरी महत्वाची पायरी म्हणजे ‘स्क्रबिंग’ हायड्रेटिंग फेशिअल करताना किंवा कोणतेही फेशिअल करताना तुम्ही निवडलेला स्क्रब हा नेहमी माईल्ड असावा. कारण जर स्क्रब खरखरीत असेल त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होण्याची शक्यता असते.
  • माईल्ड स्क्रब केल्यानंतर वाफ दिली जाते. चेहऱ्याला वाफ दिल्यामुळे त्वचेच्या पोअर्समध्ये अडकेले व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स पोअर्समधून बाहेर येण्यास मदत मिळते.
  • या पुढे केला जातो तो म्हणजे मसाज. चेहऱ्यासाठी मसाज हा फारच आवश्यक असतो. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते. हायड्रेटिंग फेशिअलमध्ये हायड्रेटिंह फेसऑईलचा उपयोग केला जातो. हातावर थोडेसे तेल घेऊन साधारण 10 मिनिटे तरी मसाज करण्यात येतो. 
  • हायड्रेटिंग फेशिअल हे सगळ्यांसाठी असले तरी देखील यामध्ये वापरण्यात येणार मास्क हा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडला जातो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा प्रकार ओळखून त्याला योग्य असेल अशा मास्कची निवड करण्यात येते. 
  • मास्क काढून टाकल्यानंतर मग तुमच्या चेहऱ्याला टवटवीत आणि तजेला देण्यासाठी चेहऱ्याला हायड्रेटिंग सीरम लावले जाते आणि तुमचा चेहऱ्यावरील तजेला लॉक केला जातो. 

  तुमच्यासाठी हायड्रेटिंग 5 बेस्ट मास्क (Top 5 Hydrating Face Masks)

  तुम्हाला घरीच तुमचा चेहरा हायड्रेट ठेवायचा असेल तर तुम्ही आम्ही सुचवलेले हे शीट मास्क वापरायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या चेहऱ्याला छान ग्लो येतो आणि तुमची त्वचा अधिक चांगली दिसण्यास मदत होते. 

  Kaya Hydrating Face Mask

  कायाचा हा हायड्रेटिंग मास्क अनेकांना आवडते. अॅलोवेरा जेल, काकडी अर्क, हायअलुरोनिक अॅसिड असे घटक यामध्ये आहेत. अगदी घरी राहूनही तुम्हाला हा हायड्रेटिंग मास्क वापरता येतो. त्यामुळे तुम्ही अगदी आरामात याचा उपयोग घरीही कधीही करु शकता.  

  फायदे (Benefits) : अॅलोवेरा जेल आणि काकडी तुमच्या त्वचेला उजाळा देत तुमची त्वचा हायड्रेट करण्याचे काम करते. त्वचा उजळवण्यासोबतच तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. 

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी हा मास्क चांगला आहे. 

  Skin Care

  Kaya Hydrating Face Mask

  INR 125 AT kayayouth

  Hydra Solution Mask For Dry Skin

  सेरामाईड मॉईश्चर आणि ट्रिहालोसे असे घटक असलेला हा हायड्रेटिंग मास्क खास कोरड्या त्वचेसाठी आहे. यामुळे तुम्ही त्वचा अधिक चांगली होते. 

  फायदे (Benefits) : तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेसाठी अत्यंत चांगला असा हा शीट मास्क आहे. हा शीट मास्क तुमच्या त्वचेला तजेला देत त्वचा एकसारखी करण्याचे काम करतो 

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : कोरड्या त्वचेसाठी हा चांगला शीट मास्क आहे. या शीटमास्कमुळे त्वचा चांगली होते

  Skin Care

  Hydra Solution Mask For Dry Skin

  INR 290 AT Innisfree

  The Body Shop Vitamin C Glow Sheet Mask

  बॉडी शॉपचे हे प्रोडक्ट तुमच्या त्वचेवर ग्लो आणण्यााचे काम करते. व्हिटॅमिन C मुळे त्वचा अधिक खुलून दिसते. यामध्ये असलेले अॅलोवेराचे घटक त्वचेला तजेला देण्याचे काम करते. 

  फायदे (Benefits) : याचा वापर त्वचेवर केवळ 15 मिनिटांसाठी करायचा असतो. यामधील गुणधर्म तुमच्या त्वचेमध्ये लगेचच फरक आणण्याचे काम करतात. या 100 % वीगन आहेत. शिवाय हे प्रोडक्ट बायोडिग्रडेबल आहे.

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : सगळ्या त्वचेच्या प्रकारासाठी हे शीट मास्क एकदम चांगले आहे.

  Skin Care

  The Body Shop Vitamin C Glow Sheet Mask

  INR 375 AT The Body Shop

  K.PLAY LYCHEE HYDRATING SHEET MASK

  त्वचेची इलास्टिसिटी कमी झाली असेल तर ती वाढवण्याचे काम माय ग्लॅमचे हायड्रेटिंग शीट मास्क करते. यामध्ये लिचीचे गुणधर्म असून लिची त्वचा एकसारखी करण्यासम मदत करते

  फायदे (Benefits) : त्वचा मॉश्चराईज आणि हायड्रेट करते. 100% बायोडिग्रेडेबल असे हे प्रोडक्ट त्वचेचा पोत सुधारते.

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : सगळ्या प्रकारच्या स्किनटाईपसाठी हा शीट मास्क चांगला आहे.

  Beauty

  K.Play Lychee Hydrating Sheet Mask

  INR 145 AT MyGlamm

  OJAS Age Arresting Ayurvedic Sheet mask

  केमिकल्स मुक्त आणि नैसर्गिक घटक असलेल्या मास्कचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही फॉरस्ट इसेन्शिअलचा हा शीट मास्क घेऊ शकता. या मास्कमध्ये आयुर्वेदिक काश्यम सीरम असून ते कोलॅजन बुस्ट करण्याचे काम करते. शिवाय त्वचेला मॉश्चरायईज करण्याचे काम करते

  फायदे (Benefits) : त्वचेला तजेला देत कोलॅजन बुस्ट करण्याचे काम करते. त्वचेची इलास्टिसिटी वाढवून एजिंगच्या सगळ्या खुणा कमी करण्यास मदत करते. त्वचेल इन्स्टंट ग्लो देते.

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी एकदम योग्य असे हे शीट मास्क आहे.

  Skin Care

  OJAS Age Arresting Ayurvedic Sheet mask

  INR 995 AT forestessentialsindia

  5 बेस्ट हायड्रेटिंग सीरम (Top 5 Hydrating Face Serums)

  त्वचेचा तजेला टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या स्किनकेअरमध्ये सीरमचाही समावेश करायला हवा. सीरमच्या वापरामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसतो. तुमच्यासाठी आम्ही निवडले आहेत 5 बेस्ट फेस सीरम

  Green Tea Face Hydration Kit

  ग्रीन टी चेहऱ्यासाठी फारच चांगल्या पद्धतीने काम करते हे एक डिटॉक्स सीरम असून त्वचेवर एकसारखे पसरते आणि त्वचेतील तजेला राखण्यास मदत करते. 

  फायदे (Benefits) : सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्वचेला अँटी-ऑक्सिडंट घटक पुरवत त्वचा चांगली करण्यास मदत करते. शिवाय यामधील व्हिटॅमिन C त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते 

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : कोणत्याही त्वचेसाठी हे फेस सीरम चांगले काम करते.

  Skin Care

  Green Tea Face Hydration Kit

  INR 965 AT mcaffeine

  Hydrating Night Serum With Kakadu Plum(Vitamin C), Shea Butter & Vitamins

  शिआ बटर आणि व्हिटॅमिन्सनी युक्त असे हे सीरम तुमच्या त्वचेच्या खोलवर जाऊन त्वचा हायड्रेट करण्याचे काम करते. हे लाईटवेट सीरम चेहऱ्यावर एकसारखे पसरते 

  फायदे (Benefits) : चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी करुन हे सीरम रात्री झोपताना लावा तुमच्या चेहरा अधिक चांगला खुलून दिसतो.

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : कोणत्याही त्वचेसाठी हे फेस सीरम योग्य आहे.

  Skin Care

  COCCOON HYDRATING NIGHT SERUM WITH KAKADU PLUM(VITAMIN C), SHEA BUTTER& VITAMINS

  INR 599 AT COCCOON

  Natural Vitamin C Face Serum

  व्हिटॅमिन C ने युक्त असे हे फेस सीरम तुमच्या त्वचेला डीप हायड्रेट करुन त्वचा खुलवण्यास मदत करते. खोलवर हायड्रेशन देत त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्याचे कामही हे फेस सीरम करते. 

  फायदे (Benefits) : त्वचेवरील मॉईश्चर लॉक करणे, त्वचेवरील डाग कमी करणे, त्वचेचा स्किनटोन एकसारखा करण्यास मदत करते.

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : कोणत्याही त्वचेसाठी हे सीरम योग्य आहे.

  Skin Care

  Natural Vitamin C Face Serum

  INR 558 AT themomsco.

  Kakadu Plum & Pomegranate Facial Oil

  ज्युसी केमिस्ट्रीचे 100% ऑरगॅनिक असे हे फेस ऑईल सीरम असून यामधील काकडी आणि डाळिंबाचे घटक तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करुन त्वचेला तजेला देण्याचे काम करते. 

  फायदे (Benefits) : चेहऱ्यावर येणारा तेलकटपणा येत नाही. त्यामुळे त्वचा सिल्की आणि स्मुथ दिसू लागते. याच्या पॅकिंगमुळे ते अधिक काळासाठी टिकते.

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : सगळ्या त्वचेसाठी हे फेशिअल ऑईल हे कोणत्याही त्वचेसाठी चांगले आहे.

  Skin Care

  KAKADU PLUM & POMEGRANATE FACIAL OIL

  INR 875 AT cosmos organic

  Vaunt Multi Vitamin Super Hydrator

  तुमच्या प्रत्येक दिवशी वापरता येईल असे हे एक सुपर हायड्रेटंट सीरम आहे. यामध्ये असलेले मल्टी व्हिटॅमिन त्वचा चांगली करण्यास मदत करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन B3 त्वचा नरीश आणि हायड्रेट करण्याचे काम करते. 

  फायदे (Benefits) : त्वचा तजेलदार ठेवण्याचे काम हे सीरम करते. या सीरममुळे त्वचेचा डलपणा निघून जातो आणि त्वचा उजळते. 

  त्वचेसाठी योग्य (Suitable For Skin) : कोणत्याही त्वचेसाठी हे सीरम योग्य आहे.

  Skin Care

  VAUNT MULTI VITAMIN SUPER HYDRATOR

  INR 645 AT VAUNT

  तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

  1. हायड्रेटिंग फेशिअलचा खर्च किती आहे?

  हायड्रेटिंग फेशिअलचा खर्च साधारण 3 हजार ते 5 हजार इतका खर्च असतो. आता प्रत्येक सलोननुसार याचे खर्च वेगवेगळे असतील. पण इतर कोणत्याही फेशिअलपेक्षा हे फेशिअल थोडे महाग आहे. त्यामुळे याचा खर्च थोडा जास्त आहे.

  2. हायड्रेटिंग फेशिअलचा फायदा आहे का? 

  हो, हायड्रेटिंग फेशिअल फारच फायदेशीर आहे. या फेशिअलचा फायदा तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. हायड्रेटिंग फेशिअलमुळे तुमची त्वचा कोरडी असेल तर त्याला हायड्रेट करुन त्वचा एकसारखी करण्याचे काम करते. त्यामुळे हायड्रेटिंग फेशिअल हे खूप फायदेशीर आहे. 

  3. कोणीही हायड्रेटिंग फेशिअल करु शकते का?

  हो, हायड्रेटिंग फेशिअल कोणालाही करता येऊ शकते. त्वचेतील मॉईश्चर टिकवण्याचे काम या फेशिअलमधून होते. त्यामुळे तुमची त्वचा ग्लो होऊ लागते. हायड्रेटिंग फेशिअलमुळे अन्य काही फायदे होतात. कोणत्याही त्वचेसाठी हे फेशिअल चांगले असते. त्यामुळे तुम्ही कधीही आणि कोणीही हायड्रेटिंग फेशिअल करु शकता. 

  4. हायड्रेटिंग फेशिअल्सच्या साहित्याची खरेदी करताना त्यामध्ये नेमके कोणते साहित्य पाहायला हवे? 

  फेशिअल करताना त्वचा अधिक चांंगले दिसणे गरजेचे असते. जर तुम्ही हायड्रेटिंग फेशिअल करण्यात असाल तर तुम्ही त्यामुळे व्हिटॅमिन C, कॅफिन, सॅलिसिलिक अॅसिड, लुटेइन, ग्रीन टी, अल्फा लिपोईक अॅसिड असे काही चांगले घटक असायला हवे. 

  5. त्वचेला ओलावा निघून जात आहे याची लक्षणे कोणती? 

  त्वचा कोरडी होणे, त्वचा डल वाटणे, त्वचा काळवंडलेली दिसणे अशी काही लक्षण दिसू लागतात. जर तुमची त्वचा अशी दिसत असेल तर तुमच्या त्वचेतील ओलावा निघून जातो हे समजून घ्यावे. अशावेळी तुम्ही चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. 

  हायड्रेटिंग फेशिअल करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच करुन पाहायला हवे.