ADVERTISEMENT
home / Shoes
फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्याकडे हवेत हे फुटवेअरचे पर्याय

फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्याकडे हवेत हे फुटवेअरचे पर्याय

नवरात्र आणि दिवाळी आली की, सगळीकडे खरेदीची लगबग सुरु होते. इतर दिवशी कितीही वेस्टर्न आऊटफिट घातले तरी या कालावधीत मात्र अनेकांना ट्रेडिशनल कपडे घालायचे असतात. आता ट्रेडिशनलवेअरपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण त्यावर नेमके कोणते फुटवेअर घालायचे हे अनेकांना कळत नाही. ट्रेडिशनलवेअरची आपली एक खासियत असते. त्याचा फॉल कसा पडायला हवा त्यानुसार तुम्ही फुटवेअरची निवड करणे आवश्यक असते. जर तुम्ही चुकीचे फुटवेअर निवडले तर तुम्ही कितीही महाग आणि लेटेस्ट फु़टवेअर घ्या त्याचा लुक पूर्णपणे निघून जाते. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी खास फेस्टिव्ह सीझन फ्रेंडली असे फुटवेअर निवडले आहेत. जाणून घेऊया या विषयी

कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?

मोजडी (Mojari)

मोजडी हा पर्याय चांगलाच एव्हरग्रीन आहे. फ्लॅट अशा या मोजडी तुमच्या कोणत्याही एथनिक ड्रेसला चार चाँद लावतात. हल्ली यामध्ये अनेक रंग आणि वेगवेगळे पॅटर्न मिळतात. जर तुम्हाला तुमच्या खास कपड्यासाठी याची निवड करायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी डिझाईन किंवा जरदोसी यासारखे काम असलेल्या मोजडी निवडा. तुमचा ड्रेस कितीही साधा असला तरी पायातील मोजडीमुळे याचा लुक एकदम उठून दिसतो. आता मोजडी तुम्हाला 200 रुपयांपासून मिळतात. पण स्वस्तात मिळणाऱ्या मोजडी या फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे तुम्ही चांगल्या दर्जाच्या आणि योग्य ब्रँडच्या मोजडीची निवड करा

कपडे : अनारकली, पंजाबी सूट, स्कर्ट 

ADVERTISEMENT

कोल्हापुरी चपला ( Kolhapuri )

कोल्हापुरीज हा आणखी एक ट्रेडिशनल प्रकार आहे जो कधीही आणि कोणत्याही कपड्यांवर घालता येतो. पण पंजाबी ड्रेस स्ट्रेट फिट कुडती यावर कोल्हापुरी खूप छान उठून दिसते. हल्ली कोल्हापुरी आता एका ठराविक रंगात मिळत नाही. हल्ली डिझायनर कोल्हापुरीज मिळतात. कोल्हापुरी या  तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात. गोल्डन, सिल्व्हर अशा कोणत्याही रंगात तुम्हाला त्या घेता येतील. कोल्हापुरीज तुम्हाला अगदी 150 रुपयांपासून मिळतात. यामध्ये तुम्हाला हिल्सचा पर्याय ही मिळतो. तुम्ही तुमच्या कपड्यांनुसारही याची निवड करु शकता. 


कपडे: साडी, प्लेन पंजाबी सूट, अनाकरली, चुडीदार

अशी करा Palazzo सोबत हटके स्टाईल How To Style Palazzo In Marathi

एथनिक स्लिप ऑन्स

खूप जणांना चप्पल हा पर्याय सगळ्यात दृष्टिकोनातून सोयीस्कर वाटतो. बॉक्स, किटन्स किंवा वेज्ड हिल्समध्ये या स्लिपर्स मिळतात. या  एथनिक स्लिप ऑन्स घालायला अगदी सोपे असतात. शिवाय यामध्ये इतके वेगळे प्रकार मिळतात की, अगदी साडीपासून तुम्हाला वेगवेगळ्या कपड्यांवर ते घालता येतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेगवेगळे वर्क निवडू शकता. चंदेरी, सोनेरी, गोटापत्ती, मिररवर्क अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये या स्लिप ऑन्स मिळतात.  या वेगवेगळ्या रेंजमध्ये मिळतात. अगदी 350 रुपयांपासून पुढे तुम्हाला या मिळतील. 

ADVERTISEMENT

कपडे: साडी, चुडीदार ड्रेस, पटियाला असे कोणतेही ( डिझाईनवर अवलंबून )


आता तुमच्याकडे अशाप्रकारचे कपडे नसतील तर तुम्ही देखील याचा वापर करु शकता.

स्ट्रेट फिट पँटची फॅशन करताना नेमकी काय घ्याल काळजी (Straight Fit Pants In Marathi)

 

ADVERTISEMENT
11 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT