ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
यंदाच्या फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत हे #Traditionalwear

यंदाच्या फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत हे #Traditionalwear

नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण आता लागोपाठ येतील अशा फेस्टिव्ह सीझनसाठी आपण खास ट्रेडिशनलवेअरची निवड करतो. जर तुम्ही यंदा मस्त घरीच बसून ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताचा काळ तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण ऑनलाईन बरेच सेल सुरु आहेत. पण तुम्हाला नव्या ट्रेंडनुसार कोणता #Traditionalwear निवडायचा असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास कपड्यांची निवड केली आहे. तुम्ही या काही फॅशनेबल कपड्यांची निवड करु शकता.

फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्याकडे हवेत हे फुटवेअरचे पर्याय

अंगरखा विथ पलाझो ( Angrakha With Palazzo)

पलाझोची फॅशन गेल्या काही दिवसांपासून फॅशन इन आहे. तुम्ही अजूनपर्यंत हा प्रकार वापरुन पाहिला नसेल तर यंदा हमखास ट्राय करा. अंगरखा हा प्रकार कोणत्याही साईड कटशिवाय असतो. त्याखाली असलेला ब्रॉड पलाझो हा चांगला दिसतो. हा ड्रेस लांब असल्यामुळे फार ज्वेलरी घालण्याची गरज नसते. अंगरखा प्रकारचा कुडता तुम्हाला चुडीदारवरही घालता येतो. तुम्ही इतर कोणत्याही लेगिंग्ज किंवा कुडत्यावरही हा मिसमॅच करु शकता. या ड्रेसवर तुम्हाला ओढणी घेण्याची गरज नाही.


तुम्ही अशा ड्रेसच्या शोधात असाल तर तुम्ही LimeRoad वरुन  खरेदी करु शकता 

ADVERTISEMENT

Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

बांधणी दुपट्टा (Bandhani Dupatta)

बांधणी दुपट्टा ही फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. तुम्हाला फार काही खर्च करायचा नसेल आणि तुम्हाला फक्त दुपट्टा घेऊन तुम्ही जुन्या ड्रेसला यामुळे एक चांगला लुक देऊ शकता. बांधणी दुपट्टा तुम्हाला वेगवेगळ्या रंगात आणि मटेरीअलमध्ये मिळतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या प्लेन ड्रेसचा बेस निवडून याची निवड करु शकता. हा दुपट्टा तुम्हाला कमीत कमी पैशात एक मस्त ट्रेडिशनल लुक देऊ शकतात.

तुम्ही अशा ड्रेसच्या शोधात असाल तर इथून करा खरेदी

मॅक्सी ड्रेस (Maxi Dress)

मॅक्सी ड्रेस हे फ्युजन आणि ट्रेडिशनलवेअरचा प्रकार आहे. हे ड्रेस हल्ली फॅशन इन आहेत. मॅक्सी ड्रेस हे उंचीला फार लांब असतात. त्यामुळे तुम्ही या खाली पायजमा घातला नाही तरी चालू शकतो. पण तुम्ही उंच असाल आणि तुम्हाला त्याला काही हटके लुक द्यायचा असेल तर तुम्ही त्या खाली स्कर्ट घालू शकता. किंवा तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही स्टायलिंग करु शकता. या ड्रेसवर तुम्ही एखादे कानातले किंवा हातात कडं घातलं तरी पुरेसं असतं.

ADVERTISEMENT

तुम्ही अशा ड्रेसच्या शोधात असाल तर इथून करा खरेदी

जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

जॅकेट ड्रेस (Solid Jacket Dress)

मॅक्सी ड्रेस प्रमाणेच असलेले हे फ्युजन ट्रेडिशनल जॅकेटवेअर दिसायला फारच सुंदर दिसतात. अगदी टिपिकल ट्रेडिशनल ड्रेस नसले तरी देखील हे ड्रेस फेस्टिव्ह सीजनमध्ये चार चांद लावतात. शिवाय हे तुमच्या बजेटमध्ये बसत असल्यामुळे फार विचारही करावा लागत नाही. फेस्टिव्हलच नाही तर इतर काही खास समारंभासाठी देखील तुम्ही हा ड्रेसचा प्रकार घालू शकता. जॅकेटचा विचार करता तुम्हाला यामध्ये अनेक प्रकारची व्हरायटी मिळू शकेल. फेस्टिव्हचा विचार करता तुम्ही नेहमीच ब्राईट रंगाना पसंती द्या. कारण असे ड्रेस अधिक खुलून दिसतात.

तुम्ही अशा ड्रेसच्या शोधात असाल तर इथून करा खरेदी

ADVERTISEMENT

साडी नेसत नसाल तरीही तुमच्याकडे हवेत या हे पॅटर्नचे ब्लाऊज

कुडता विथ फ्लेअर्ड पलाझो सेट (Kurta With Flayred Pallazzo Set)

तुमच्या रोजच्या पलाझोपेक्षा थोडासा वेगळा प्रकार म्हणजे कुडता विथ फ्लेअर्ड पलाझो असा हा प्रकार असून याचा कुडता थोडा लहान असतो. तर पलाझो हा घेरदार असतो. त्यामुळे हा प्रकार फार उठून दिसतो. हा प्रकार फेस्टिव्हलसाठी एकदम परफेक्ट आहे. हा प्रकार थोडा घोळदार असल्यामुळे या प्रकारच्या ड्रेसवर फ्लॅट मोजडी छान दिसतात जर तुम्हाला यामध्ये उंच दिसायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये हिल्स तुम्ही घालू शकता. तोही प्रकार तुम्हाला चांगला दिसतो. यावर तुम्हाल ओढणी घेण्याची गरज नसते.

कपड्यांसोबत फेस्टिव्ह सीझनमध्ये हवा चेहऱ्यावर ग्लो तर नक्की ट्राय करा MyGlamm चे हे प्रोडक्ट

 

ADVERTISEMENT
15 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT