जरी वर्कपेक्षाही शोभून दिसते गोटापत्ती वर्क, जाणून घ्या हा ट्रेंड

जरी वर्कपेक्षाही शोभून दिसते गोटापत्ती वर्क, जाणून घ्या हा ट्रेंड

फेस्टिव्ह सीझन सुरु झाला की, एरव्ही कपाटात गेलेल्या ट्रेडिशनल वेअरला खूप चांगले दिवस येतात. काही जणांना तर खास या फेस्टिव्ह सीझनसाठी ट्रेडिशनल कपड्यांची खरेदी करावी लागते. फेस्टिव्ह सीझन वगळता, लग्नकार्य किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाठी ट्रेडिशनल कपडे निवडणे आलेच. अशावेळी आपण ट्रेडिशनल कपड्यांवर असलेले कलाकामही बघतो. त्यानुसार या कपड्यांची निवड करायची की नाही हे देखील आपण ठरवतो. हल्ली बाजारात गोटापत्ती वर्कचा ट्रेंड सुरु आहे. तुम्हीही अनेक कुडत्यांवर हे काम नक्कीच पाहिले असेल. तुमच्या ट्रेडिशनलवेअरच्या कप्प्यात एक तरी गोटापत्ती वर्क असलेला कुडता किंवा ड्रेस असावा असे आम्हाला वाटते. म्हणून आज आपण जाणून घेऊया गोटापत्ती वर्कबद्दल

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

गोटापत्ती वर्क म्हणजे काय?

Instagram

सोनेरी आणि चंदेरी रिबिन्सचा उपयोग करुन तयार करण्यात आलेली पान आणि फुलांची नक्षी म्हणजे ‘गोटापत्ती वर्क’ मूळ राजस्थानची कलाकृती असलेला हा प्रकार आहे. या रिबिन्सचा उपयोग करुन कपड्यांवर ही डिझाईन केली जाते. पूर्वीच्या काळी जरी वर्कच्या माध्यमातून सोने आणि चांदीच्या तारा वापरल्या जात असतं. या तारा पातळ असल्या तरी देखील जरी वर्कच्या साड्या किनाऱ्यावर डिझाईन असल्यामुळे याचे पदर फार जड व्हायचे पण आता या गोटापत्ती वर्कमुळे एक लाईटवेटेड तरीही रिच असा लुक कपड्यांना मिळतो.

गोटापत्ती वर्क आणि जरी वर्कमधील फरक

Instagram

गोटापत्ती आणि जरी वर्कमधील फरक तसा वरच सांगितला आहे. पण तरीही या दोन कामांमध्ये फरक सांगायचा झाला तर काही मुद्दे नक्कीच आहेत ज्यामुळे गोटापत्ती वर्क अधिक सरस ठरते. 

  • गोटापत्ती वर्कसाठी गोल्डन आणि सिल्वहर रंगाच्या रिबिन्सचा उपयोग केला जातो. 
  • गोटापत्ती वर्क केल्यानंतर ओढणी किंवा ड्रेस मटेरिअल जड वाटत नाही त्याच्या वजनात काहीही फरक पडत नाही. पण अनेक हेव्ही जरी वर्क केलेल्या साड्यांचे काठ हे त्याच्या हेव्ही डिझाईनमुळे फारच जड होतात. 
  • जरी वर्कचे कपडे हे हाताने धुता येत नाही त्यासाठी ड्राय क्लीनिंग करावे लागते. पण गोटापत्ती वर्कचे कपडे हाताने धुता येत नाही. याचा फार रंग जात नाही. 
  • जरी वर्कमध्ये आता इतके वेगवेगळे प्रकार मिळतात की. त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन्स मिळतात. तुलनेने गोटापत्ती वर्कमध्ये काही ठराविक डिझाईन्स तयार होतात. यामध्ये टेंपल, पान, फुलं अशी डिझाईन केली जाते. जी ड्रेसचा गळा,हात, बॉटम, ओढणी यांना केली जाते. 
  • गोटापत्ती वर्क असलेल्या साड्या आणि ड्रेस कॅरी करणे फारच सोपे असते. 

सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट

गोटापत्ती वर्क फॅशन टिप्स

Instagram

  • तुमच्याकडे प्लेन कपडे असतील तरी देखील तुम्ही गोटापत्ती वर्क करुन घेऊ शकता. गोटापत्ती वर्क करताना ते खूप ओव्हर होणार नाहीत याची काळजी घ्या. घरीच करणार असाल तर नाजूक डिझाईन्स निवडा. 
  • जर तुमच्या ड्रेसला गोटापत्ती वर्क केलेले असेल तर त्यावर घेत असलेली ओढणी प्लेन असू द्या. तरच त्या कामांना न्याय मिळेल. 
  • कुडता, शरारा, लेहंगा या सगळ्यावर गोटापत्ती वर्क चांगले दिसते.पण या डिझाईन्स निवडताना त्य फार मोठ्या आणि तुमच्या शरीरयष्टीला शोभत आहेत की नाही ते देखील बघा. 

 

आता बिनधास्त खरेदी करा एक तरी गोटापत्ती वर्क असलेला ड्रेस कारण त्याचा सांभाळ करणे आहे फारच सोपे 

यंदाच्या फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत हे #Traditionalwear