स्तनांचा सैलसरपणा तुम्हाला त्रास देत आहे का? त्यासाठी तुम्हाला टिप्स हव्या असतील तर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करून स्तनांचा सैलसरपणा नक्कीच दूर करू शकता. काही दिवस तुम्ही आम्ही दिलेल्या उपायांचा वापर केल्यास स्तनांचा सैलसरपणा दूर होऊन टाईट होण्यास मदत मिळेल. कही जणींचे स्तन हे मोठे आणि जड असल्याने एका ठराविक वयानंतर त्यांच्या स्तनांमध्ये सैलसरपणा येऊ लागतो आणि स्तन कमजोर होऊ लागण्याची शक्यता असते. बऱ्याचदा वजन कमी करणे, पोषण कमी मिळणे, अनफिट ब्रा यामुळे स्तनांचा सैलसरपणा असल्याचे जाणवते. पण तुम्ही नैसर्गिकरित्या घरच्या घरी यावर उपाय नक्कीच करू शकता. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. तुम्हाला जर स्तन टाईट करायचे असतील तर आम्ही दिलेले उपाय नक्की करून पाहा. तत्पूर्वी स्तनांचा सैलसरपणा येण्यास नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात ते जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बऱ्याचदा वाढत्या वयाच्या कारणामुळे सैलसर स्तनांची समस्या उद्भवते. पण वाढत्या वयाव्यतिरिक्त स्तन सैल होण्याची अनेक कारणे असतात. कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. स्तन सैल होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत.
गरोदरपणा - गरोदरपणामध्ये स्तनांचा आकार वाढतो आणि त्यामध्ये सैलसरपणा येतो. त्यामुळे गरोदरपणात नेहमी स्तनांची अधिक काळजी घ्यावी लागते. गरोदरपणाचे नऊ महिने स्तनांचा सैलसरपणा वाढत जातो. त्यामुळे या नऊ महिन्यात स्तनांना मसाज देत त्याचा टाईटपणा जपावा लागतो.
वाढते वय - वाढत्या वयानुसार स्तनांमधील सैलसरपणाही वाढत जातो. शरीर कमजोर होत जाते तसंच स्तनही सैलसर होत जातात. पोषण कमी झाल्यानंतर स्तनांचा सैलसरपणा वाढू लागतो.
मोठे आणि भारी स्तन - मोठ्या आणि भारी स्तनांच्या वजनामुळे स्तनांमध्ये टाईटपणा राहत नाही. तसंच तुमचे वय वाढते तसा मोठ्या स्तनांमध्ये सैलसरपणा अधिकाधिक जाणवू लागतो. स्तनांचा भार शरीरावर येते आणि त्वचा अधिक खेचली जाते. त्यामुळे त्यामध्ये सैलसरपणा येतो.
अचानक वजन कमी होणे - अचानक वजन कमी झाल्यास अथवा जास्त व्यायाम करून वजन कमी केल्यास स्तनांचे वजनही कमी होते आणि त्याचा टाईटपणा कमी होऊन स्तन सैलसर होतात. खेचलेली त्वचा अचानक वजन कमी झाल्याने आकुंचन पावते आणि स्तनांचा सैलसरपणा जाणवू लागतो.
मेनोपॉज - ठराविक वयानंतर येणारा मेनोपॉज शरीरामध्ये बरेच बदल घडवतो. त्यामध्ये स्तनांचा सैलसरपणा हा एक भाग आहे. सततच्या त्रासाने त्याचा परिणाम स्तनांच्या ढिलेपणावरही होताना दिसून येतो.
स्तन चांगल्या पद्धतीने टाईट (Toned Breasts) ठेवायचे असतील तर तुम्हाला जास्त जोखीम उचलायची गरज नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला काही जुन्या सवयी सोडाव्या लागतील आणि आपल्या स्तनांची योग्य काळजी घ्यावी लागेल. तु्म्ही नैसर्गिक उपाय करून घरच्या घरी अर्थात घरगुती उपाय स्तनांचा सैलसरपणा कमी (breast tightening tips in marathi) करण्यासाठी करू शकता. वयाच्या आधी अथवा अगदी विशिष्ट वयानंतरही स्तनांमध्ये सैलसरपणा येत असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत तुम्ही त्याचा उपयोग करून हा सैलसरपणा कमी करू शकता.
अंड्याचा बलक आणि काकडीचा मास्क याचा एकत्रित उपयोग करणं हे स्तनांचा सैलसरपणा कमी करण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय आहे. त्वचा जरी खेचली जात असेल तर काकडीचा फेसमास्क हा त्यावरील नियमित करण्यात येणारा उपाय आहे. काकडीमध्ये बिटा कॅरेटिन (Beta Carotene) असते आणि अंड्याच्या बलकमध्ये प्रोटीन आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेला टाईट करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच त्वचेला अधिक कसदार बनवण्यासाठीही फायदेशीर ठरते. यामध्ये विटामिन ए, डी, बी6 आणि बी12 चे प्रमाण अधिक आढळते.
कसे वापरावे
आठवड्यातून तुम्ही हा प्रयोग एकदा केल्यास, स्तनांचा सैलसरपणा दूर होऊन स्तनांमध्ये उभार येण्यास मदत मिळते. स्तनांवरील केस असल्यास तेदेखील कमी करण्यासाठी उपाय एका लेखातून आम्ही तुम्हाला दिले आहेत.
स्तन सुडौल आणि आकर्षक बनविण्यासाठी ऑलिव्ह ऑईलच्या तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) त्वचेला पोषण देते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. आणि ऑलिव्ह ऑईलमुळे स्तनांमध्ये उभार येतो. तसंच याचा प्रभाव वाढविण्यासाठी तुम्ही रोझमेरी तेलाचाही उपयोग करून घेऊ शकता. हे तेल स्तनाच्या त्वचेमध्ये कोलेजन वाढवते आणि स्तन टाईट करण्यास मदत करते. ऑलिव्ह ऑईलने स्तनांना मालिश केल्यास ब्रेस्ट सॅगिंग (Breast Sagging) अर्थात स्तनांच्या सैलसरपणाची समस्या कमी होते. तसंच यामुळे स्तनांच्या आजूबाजूच्या त्वचेमध्येही सुधारणा होते.
कसे वापरावे
आठवड्यातून किमान चार वेळा तरी अशा तऱ्हेने मालिश करावे आणि मग परिणाम पाहावा. नियमित मालिश केल्यास स्तनांचा सैलसरपणा कमी होण्यास मदत होते.
स्तनांना सुडौल बनविण्यासाठी फायदेशीर वनस्पती म्हणून मेथीकडे पाहिले जाते. आयर्वेदानुसार, गरोदरपणात स्तनपान केल्यानंतर सैलसर होणाऱ्या स्तनांसाठी हा उत्तम उपाय मानला जातो. मेथीमधून विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मिळत असून स्तनांच्या कोशिकांना कोणत्याही नुकसानापासून वाचविण्यास मदत करते आणि स्तनांच्या आसपासची त्वचा टाईट राखण्याही मदत करते. याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो तो आपण पाहूया.
कसे वापरावे
पद्धत 2
पद्धत 3
कोरफड जेल ही त्वचेच्या कोणत्याही समस्यांवर लागू पडते. मग तो अगदी स्तनांचा सैलसरपणा असला तरीही. कोरफडचेच जेल हे अत्यंत उपयुक्त असून स्तनांमध्ये टाईटपणा आणण्याचे काम करते तसंच तुम्ही याची पेस्ट बनवून फ्रिजमध्ये ठेऊनही वापरू शकता.
कसे वापरावे
सैलसर स्तनांसाठी बर्फाने मसाज करणे अर्थात आईस मसाज हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. बर्फ हा मांसपेशींना टाईट करण्याचे काम करतो. म्हणून चेहऱ्यासाठीही बर्फाचा मसाज बऱ्याचदा वापरला जातो. त्यामुळे त्वचा कसदार होते आणि सैलसरपणा निघून जाण्यास मदत मिळते.
कसे वापरावे
अत्यंत सोपा घरगुती उपाय म्हणून याकडे पाहिले जाते. शिया बटरमध्ये विटामिन ई चा समावेश असल्यामुळे तुमचे स्तन अधिक टाईट करण्यास याचा उपयोग होतो.
कसे वापरावे
डाळिंबाचा उपयोग खाण्यासाठी आणि त्वचेवर लाली आणण्यासाठी होतो याची आपल्याला कल्पना आहे. पण स्तनांचा सैलसरपणा दूर करण्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? याचा उपयोग करून घेणे सोपे आहे.
कसे वापरावे
स्तनांचा सैलसरपणा काही ठराविक वयात ठरलेलाच असतो. पण त्यावर घरगुती उपाय आम्ही सांगितले त्याप्रमाणे हा सैलसरपणा सहसा येऊ नये यासाठी काही टिप्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आधीपासूनच स्तनांची काळजी घेऊन सुरक्षितता बाळगावी. काय आहेत या सोप्या टिप्स जाणून घेऊया.
नियमित व्यायाम केल्याने तुमचे सैलसर स्तन घट्ट होण्यास मदत मिळते. नियमित व्यायाम हा शरीरातील रक्तप्रवाह योग्य राखून शरीरातील लवचिकता राखण्यास मदत करतो. त्यामुळे स्तन सैलसर पडू नये यासाठी काही ठराविक व्यायाम तुम्ही नक्कीच करू शकता. जे तुमच्या स्तनांचा टिशू मजबूत करतील आणि स्तन उभारण्यास मदत करतील.
पुश अप्स - पुशअप्स मध्ये संपूर्णतः वजन हे हातावर आणि स्तनांवर येते. त्यामुळे त्याचा व्यायाम होऊन आजूबाजूचे शरीरही टाईट होते आणि स्तनांना सैल पडण्याची संधी राहात नाही.
चेस्ट प्रेस - हा व्यायाम मुख्यत्वे स्तनांच्या उभारीसाठी आणि स्तन सैलसर पडू नये यासाठीच आहे. यामुळे त्वचा कसदार राहून स्तनही टाईट राहतात.
बेंच प्रेस - बेंच प्रेस करताना स्तनांवर प्रेशर येते आणि स्नायू बळकट होतात. त्यामुळे स्तन सैलसर पडण्याची संधी राहात नाही.
चेस्ट फ्लाय - हा व्यायामप्रकारदेखील खास स्तनांसाठी अर्थात छातीसाठी बनविण्यात आला आहे. तुम्हाला सुडौल आणि आकर्षक स्तन हवे असतील तर तुम्ही हा व्यायाम नक्कीच करू शकता.
प्लँक अप्स - या व्यायामाने तुमचं पूर्ण शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. तसंच यामध्ये बराच वेळ गेला तरीही याचे परिणाम जास्त चांगले आहेत.
स्तनांचा सैलसरपणा कमी करण्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार योग्य ब्रा चा उपयोग करून घ्या. बऱ्याचदा चुकीची ब्रा घातल्याने स्तनामध्ये सैलसरपणा येतो. त्यामुळे स्तन टाईट करण्याचा उपाय ब्रा चा योग्य वापरदेखील आहे.
तुम्हाला त्वचा अधिक चमकदार ठेवायची असेल आणि स्तन सैलसर होऊ द्यायची नसेल तर MyGlamm चे मॉईस्चराईजर तुम्ही वापरू शकता.
1. स्तन सैलसर न होण्यासाठी योग्य पोश्चरचा वापर करायला हवा का?
हो. स्तन सैलसर न होण्यासाठी पोश्चरही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण व्यवस्थित पोश्चरमध्ये न बसल्यास, अथवा उभे राहिल्यास त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होत असतो.
2. स्तनांच्या सैलसरपणाची नक्की काय कारणं आहेत?
स्तनांच्या सैलसरपणाची बरीच कारणं आहेत. पण त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे गरोदरपण आणि तिने स्वतःची काळजी ने घेणे.
3. घरगुती उपाय स्तनांच्या सैलसरपणासाठी उपयुक्त ठरतात का?
हो. तुम्हाला जर आर्टिफिशियल काही नसेल तर तुम्ही अशा तऱ्हेने स्तनांच्या सैलसरपणाची काळजी घरातल्या घरात घेऊ शकता.
4. कोणते क्रिम यावर उपलब्ध आहे का?
बाजारामध्ये अनेक क्रिम्स उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला सैलसरपणा कमी करायचा असेल तर क्रिमपेक्षाही घरगुती उपाय अधिक चांगले आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक