सुरकुत्या म्हणजे सैल पडल्यामुळे त्वचेवर पडलेल्या घड्या... वयानुसार त्वचेतील कोलेजीनची निर्मिती मंदावते आणि त्यामुळे त्वचा सैल पडून सुरकुत्या दिसू लागतात. आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरूण वयातही सुरकुत्या दिसू शकतात. कोरड्या त्वचेवर सुरकुत्या फार लवकर दिसू लागतात. सुरकुत्या पडण्याची सुरुवात सर्वात आधी गळा आणि मानेपासून होते. कारण गळ्यावरची त्वचा चेहऱ्यापेक्षा थोडी सैल आणि लवचिक असते. ज्यामुळे सुरकुत्यांवर उपाय करताना फक्त चेहऱ्याचा विचार करून चालणार नाही, यासाठी तुम्ही तुमच्या मानेवरच्या त्वचेदेखील पुरेशी काळजी घ्यायला हवी.
या ब्युटी टिप्समुळे फक्त तुमच्या मानेवरील सुरकुत्या कमी होतील असं नाही तर यामुळे तुमच्या मानेवरील त्वचेचा पोतदेखील सुधारेल.
त्वचा हायड्रेट आणि मऊ ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेला नियमित ऑईल मसाजची गरज असते. यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी ऑलिव्ह ऑईल, नारळाचे तेल, बदामाचे तेल अशा फेस ऑईलने चेहरा आणि मानेवर मसाज करा. कोमट तेल आणि बोटांचे स्ट्रोक यामुळे तुमच्या मानेवरील त्वचेचं रक्ताभिसरण सुधारेल आणि मानेवरच्या त्वचेला तजेलदारपणा येईल.
बऱ्याचदा आपण चेहरा एक्स्फोलिएट करताना मानेकडे दुर्लक्षच करतो. पण असं करु नका नियमित एखाद्या चांगल्या फेस स्क्रबने मानदेखील स्वच्छ करा. सक्युलर मोशनमध्ये फेस स्क्रबने मसाज केल्यामुळे त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण आणि मेकअपचे कण निघून जाण्यास मदत होईल. मात्र यानंतर चेहरा आणि मानेवरच्या त्वचेवर चांगलं मॉईस्चराईझर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहील.
सुर्याची अतिनील किरणं त्वचेल खोलवर जातात आणि त्वचेचं नुकसान करतात. यासाठी नियमित त्वचेवर चांगल्या गुणवत्तेचं आणि जास्त SPF असलेलं सनस्क्रिन लावा. सनस्क्रिनने तुमचा चेहरा, मान, हात कव्हर केले तर तुमची त्वचा कायम सुरक्षित राहील.
फेसमास्क शीट वापरताना मास्क चेहऱ्यावर लावल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या पॅकमध्ये थोडं जास्तीचं सीरम उरलेलं आहे. असं हे जास्तीचं सीरम फेकून देण्यापेक्षा तुमच्या मानेवर लावा. हे सीरम लावून मानेवर मसाज केल्यामुळे चेहऱ्याप्रमाणे तुमच्या मानेवरही इंस्टंट ग्लो दिसेल. शिवाय मानेवरची त्वचा मऊ राहील आणि सुरकुत्या पडणार नाहीत.
सुरकुत्या पडण्यामागचं महत्त्वाचं कारण हे त्वचा कोरडी आणि निस्तेज असणं असू शकतं. यासाठी सुरकुत्या पडू नयेत यासाठी नियमित त्वचा मॉईस्चराईझ करा. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्हाला मॉईस्चराईझरचा वापर न चुकता करणं गरजेचं आहे. यासाठी दररोज सकाळी अंघोळ केल्यावर आणि झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यावर चेहरा, मान आणि हात-पाय व्यवस्थित मॉईस्चराईझ करा. ज्यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास चांगली मदत होईल.
चेहरा आणि मानेची त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यासाठी मायग्लॅमचं हे स्किन केअर रूटिन अवश्य फॉलो करा. या क्लिंझर, टोनर आणि मॉईस्चराईझरमुळे तुमच्या त्वचेला मऊपणा आणि ग्लो दोन्ही मिळेल. तुम्हाला हे प्रॉडक्ट कसे वाटले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर सांगा.