साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना

साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना

ऑफशोल्डर ड्रेस सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. याला थोडासा आणखी वेगळेपणा देत आता बाजारात सर्रास ऑफशोल्डर साड्यांचे ब्लाऊजही दिसतात. पण एखादी फॅशन आहे म्हणून ती कोणत्याही साड्यांवर करुन चालत नाही. पैठणी, नारायणपेठ, सिल्क, पटोला, इरकल, बनारसी अशा कितीतरी साड्यांची जगभरात ख्याती आहे. पण त्या सगळ्यांवर ब्लाऊज निवडताना त्या साडीचा लुक कमी तर होणार नाही ना! ही काळजी घेणे फार आवश्यक असते. त्यामुळे साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊजची निवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. ही निवड कशी करावी आणि कोणत्या साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊज टाळावा याची महत्वपूर्ण माहिती

असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक

ऑफशोल्डर म्हणजे काय?

Instagram

खांद्याच्या खाली  म्हणजे ऑफशोल्डर कोणत्याही ड्रेसची बाही ही खांद्यावर न येता दंडापर्यंत येते त्याला ऑफशोल्डर असे म्हणतात. ऑफशोल्डरमध्ये ड्रेस, ब्लाऊज, गाऊन असे वेगवेगळे प्रकार मिळतात. ड्रेस किंवा टॉपच्या बाबतीत ऑफशोल्डरची निवड करताना फार काही वाटत नाही. पण ब्लाऊजच्या बाबतीत ब्लाऊजची निवड करताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. 

साडी नेसत नसाल तरीही तुमच्याकडे हवेत या हे पॅटर्नचे ब्लाऊज

 

साड्यांवर ऑफ शोल्डर ब्लाऊज निवडताना

Instagram

  • पैठणी किंवा हेवी बॉर्डरच्या साड्यांवर नेहमीच पारंपरिक ब्लाऊज चांगले दिसतात. अशा  महागड्या आणि जड साड्यांवर ऑफ शोल्डर ब्लाऊजची मुळीच निवड करु नका. कारण याचे ब्लाऊज पीस वाया जातात. शिवाय त्याचा लुकही खराब होतो. 
  • ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये तुमचे खांदे जर मोठे असतील तर ते पटकन उठून दिसतात. जर तुम्हाला तुमचे हात थोडे जाड आहेत हे जाणवत असतील तर तुम्ही ऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना थोडा विचार करा. कारण अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यामुळे तुम्ही थोडे जाड दिसू शकता. 
  • जर तुमच्याकडे एखादी डिझायनर साडी किंवा सिल्क साडी असेल तर अशा साड्यांवर तुम्हाला ऑफशोल्डर ब्लाऊज घालण्यास काहीच हरकत नाही. कारण अशा सांड्यांचे काठ हलके असतात ( डिझायनर सांड्यांमधील जड काठाच्या साड्यावंर असे ब्लाऊज निवडताना ती साडी नीट नेसता येणे गरजेचे असते). या साड्यांचा गेटअप ऑफशोल्डर ब्लाऊजमुळे अधिक चांगला दिसतो. 
  • ऑफशोल्डर ब्लाऊजमध्ये अनेक वेगळे प्रकार असतात.मोठ्या बाह्यांच्या आणि पट्टीच्या अशा आकारात ते ब्लाऊज बनतात. आता तुम्ही कोणता पॅटर्न निवडता त्यावर साड्यांची निवड अवलंबून आहे. 
  • जर तुम्ही कॉटन साड्यांचे चाहते असाल तर अशा काही साड्यांवरही ब्लाऊज ही चांगले दिसतात.
  • मिसमॅच ब्लाऊज घालत असाल तरी तुमच्या काही पारंपरिक साड्यांवर हे अशाप्रकारचे ब्लाऊज घालू शकता. पण असे करतानाही तुम्ही जाड काठांच्या साड्यांवर असे ब्लाऊज घालू नका त्याचा गेटअप जातो. 
  • शरारा, गरारा किंवा स्कर्ट ब्लाऊड अशा प्रकारच्या ड्रेसेसवर असे ब्लाऊज हमखास उठून दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही ऑफशोल्डर ब्लाऊजची डोळे बंद करुन निवड केल्यास चालू शकेल. 
  • स्टाईल म्हणून ऑफशोल्डर ब्लाऊज घालणे आणि ते कॅरी करणे यामध्ये फरक आहे त्यामुळे ब्लाऊजची निवड करताना तुम्ही ते कॅरी कसे करता याकडे अधिक लक्ष द्या. 

आता ऑफशोल्डर ब्लाऊजची निवड करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

Fashion

Grey Blouse In Satin With Fancy One Shoulder Neckline Online

INR 4,140 AT Kalki Fashion

Fashion

Red Off Shoulder Solid Tube Top

INR 519 AT Purplicious