मेकअपमध्ये वेगवेगळे ट्रेंड हे कायम येत असतात. विशेषत:डोळ्यांच्या मेकअपमध्ये अनेकदा आपण वेगवेगळी व्हरायटी पाहिली असेल. कारण आयलायनर, मस्कारा, आयशॅडो लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कायमच येत असतात. सध्या डोळ्यांच्या मेकअपमधील #cutcrease लायनर हा प्रकारची चलती आहे. शिका कटकारेज आयलिनर मेकअप टिप्स लहान डोळ्यांसाठी. या लुकमधील तुम्ही फोटो आधी पाहिले असतील तर तुमच्या घरी असलेल्या मेकअपमधूनच तुम्हाला हा नवा #cutcrease मेकअप कसा करता येईल ते आज आपण जाणून घेऊया.
#cutcreaseeyemakeup करायचा असेल तर तुम्ही वर सांगितलेल्या काही गोष्टी एकत्र ठेवा. कारण यातील सगळ्या गोष्टी तुम्हाला या मेकअप लुकसाठी लागणारच आहेत.
सगळ्यात सगळा चेहरा स्वच्छ करुन घ्या. चेहऱ्याला मेकअप प्राईमर लावून घ्या.
डोळ्याला कन्सिलर लावून डोळ्याला एक बेस्ड न्यूड रंग लावून घ्या.
#cutcrease डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी तुम्हाला थोडा गडद रंगाची निवड करणयाची गरज असते. त्यामुळे तुम्ही तो गडद रंग निवडल्यानंतर तो संपूर्ण डोळ्या लावून घ्या.
हा रंग तुमच्या डोळ्यांच्या क्रिसपर्यंत लावून घ्या. हा रंग तसाच राहण्यापेक्षा तुम्ही तो ब्लेंड करा.
आता डोळ्यांच्या आतल्या बाजूने क्रिसपर्यंत पण डोळ्यांच्या थोडेसे हात अगदी हलक्या हाताने कन्सिलर लावा.
आता ते कन्सिलर लावल्यानंतर ते वाळल्यानंतर तुम्हाला त्या रंगाला सुट होणारा दुसरा रंग त्या भागाला लावायचे आहे. असे करताना तुम्हाला डोळ्यामध्ये दोन वेगळ्या शेड दिसतील.
कन्सिलरमुळे हा फरक तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतो. आता तुम्ही तुम्हाला हवे अशा पद्धतीचे आयलायनर लावून घ्या.
A post shared by Rashmi Sunam (@makeupbyrashmi__) on
#cutcrease मेकअप करताना तुम्हाला रंगाची निवड ही फार महत्वाची असते. कारण तुम्ही रंग कोणता निवडता त्यावर काही गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही रंग चुकीचा निवडला तर तुम्हाला हवा असलेला लुक तुम्हाला मिळू शकणार नाही.
जर तुम्ही कन्सिलर न लावता असा मेकअप करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा लुक मिळवणे थोडे कठीण जाते. त्यामुळे तुम्ही हा लुक मिळवण्यासाठी कन्सिलरचा उपयोग करा.
हा मेकअप करताना तुम्हाला ब्रशचा वापर करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही ब्रश शिवाय कशाचाही वापर करु नका.
हा एक पार्टी मेकअपचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही असा कुठेही करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी हा आयलुक करणार आहात याचाही विचार करा.
आता तुमच्या खास कार्यक्रमांसाठी तुम्ही नक्कीच #cutcrease आयमेकअप नक्की करुन पाहा.