आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

वजन कमी करायचं म्हणजे आहारात अनेक बदल करावे लागतात. त्यातल्या त्यात भारतीय डाएटचा विचार केला तर अशा आहारातून ‘गहू’ वगळून अजिबात चालत नाही. गव्हामध्ये असलेल्या ग्लुटेनमुळे वजन कमी करण्यास अडथळा येतो. पण गहू आहारात ठेवूनही तुम्ही वजन कमी करु शकता. आता गव्हाचा नेमका कोणत्या पद्धतीने समावेश केल्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील याची महत्वाची माहिती आज जाणून घेऊया.

वजन कमी करायचं आहे मग नियमित खा ‘भाकरी’

गव्हामध्ये काय असते?

Instagram

गहू हे असे अन्नधान्य आहे ज्याचा समावेश भारतीय आहारात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. गव्हापासून बनवलेल्या पोळीचा आहारात अगदी हमखास उपयोग केला जातो. प्रत्येक भारतीय जेवणात भाजी- पोळी ही असतेच. आता पोळी बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असली तरी देखील त्यात असलेले काही पौष्टिक घटकही शरीराला आवश्यक असतात. त्यामुळेच गहू हे काही केल्या टाळता येत नाही. गव्हाच्या पौष्टिक घटकांचा विचार केला तर गव्हामध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळासाठी भरल्यासारखे वाटते. पण पोळीमध्ये म्हणजेच गव्हामध्ये असलेल्या फायबरचीही तुमच्या शरीराला तितकीच गरज असते. पण पोळीचे सेवन अति केल्यामुळेही तुमच्या शरीरातील साखर वाढून तुम्हाला काही त्रास होण्याची शक्यता असते.

वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

असा करा गव्हाचा तुमच्या आहारात समावेश

Instagram

गहू हे काही केल्या तुम्हाला डाएटमधून काढून टाकता येत नसतील तरी काही हरकत नाही तुम्ही काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा इतका त्रास होणार नाही. 

  • गव्हापासून तयार केलेल्या पोळ्या तुम्ही खात असाल तर त्याची संख्या कमी करा. म्हणजे तुम्ही सकाळी गव्हाच्या पोळ्या खात असाल तर त्या खाण्यास काहीच हरकत नाही. पण दिवसाच्या सगळ्या वेळांमध्ये तुम्ही पोळी खाऊ नका
  • दोन पोळ्या या कोणत्याही व्यक्तिसाठी पुरेशा असतात. एका मिलमध्ये तुम्ही पोळ्या खात असाल तर दुसऱ्या मिलमध्ये पोळ्या टाळता आल्या तर फारच उत्तम 
  • पोळ्या नुसत्या खात असाल तर  असे करु नका. त्यापेक्षा तुम्ही पोळ्या भरपूर सॅलेड आणि भाज्यांसोबत खा. म्हणजे तुमच्या पोटात गव्हासोबत डाएटरी फायबरही जाते. भाज्या पोटात गेल्यास त्या शरीराला प्रोटीन देण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही पोळ्यांसोबत भाजीही खा. 
  • हल्ली डाएट करणाऱ्यांसाठी बाजारात वेगळ्यापद्धतीने तयार करण्यात आलेले गव्हाचे पीठही मिळते. ज्यामध्ये ग्लुटेनचे प्रमाण हे तुलनेने कमी असते. शिवाय यामध्ये संपूर्ण गहू नाही तर अन्य काही घटकांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे तुम्ही त्याची निवड केली तरी चालेल
  • गव्हाच्या पिठामध्ये शक्य असेल तर हाय प्रोटिन अशी अन्नधान्य मिसळण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळेही तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो. या शिवाय तुम्ही ब्राऊन ब्रेड, पास्ता अशा गोष्टींचा समावेश करु शकता. 

डाएट करताना तुम्हाला लगेचच सगळ्या गोष्टी सोडण्याची गरज नसते. काही गोष्टी तुम्ही नीट जाणून घेतल्या तर तुम्हाला अगदी आरामात त्याचा समावेश आहारात करता येतो. 

वजन कमी करण्याठी पनीरपेक्षा तोफू का आहे चांगले