प्रत्येक महिलेकडे मेकअपचे अगदी बेसिक सामान असतेच. कधीतरी मेकअप करु या विचाराने अनेकदा आयशॅडो पॅलेट, लिपस्टिकचे वेगवेगळे रंग, हायलायटर, काजळ, मस्कारा अशा गोष्टी घेतल्या जातात. मेकअपच्या साहित्यामधील काही गोष्टी या आपण वापरुन संपवू शकतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या जास्त वापरल्या जात नाहीत आणि एक्सपार्ड झाल्या की, वापरण्याचीही भीती वाटते. अशी मेकअपमधील गोष्ट म्हणजे ‘आयशॅडो’ अगदी बेसिक रंगाचे पॅलेट घेतले आणि ते फक्त तुम्ही वापरणार असाल तर ते जास्त वापरले जात नाही. त्यामुळे ते भरभर संपण्याचा प्रश्नच नसतो. आयशॅडो पॅलेट एक्पायर्ड झाले की, ते टाकून देण्याची इच्छा अनेकांना नसते. अशावेळी तुम्ही या पॅलेटमधील रंगाचा उपयोग करुन काही वेगळ्या गोष्टी करु शकता. जाणून घेऊया या जुन्या आयशॅडो पॅलेटचा उपयोग नेमका कसा करायचा.
हो, तुम्ही वाचत आहात ते अगदी खरं आहे. तुमच्या जुन्या आयशॅडो पॅलेटचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या आवडीची नेलपेंट अगदी आरामात आणि कमी कष्टात बनवू शकता.
साहित्य. जुने आयशॅडो पॅलेट, बेस नेलपेंट (ट्रान्सफरंट नेलपेंट), पेपर, नेलपुशर
कृती :
पावडर आयशॅडो लावायला तसे अनेकांसाठी कंटाळवाणे काम असते कारण खूप जणांना त्यासाठी ब्रश शोधा आणि चेहऱ्यावर सांडलेले त्याचे कण काढणे नकोसे होते. त्यामुळेही अनेकदा पावडर आयशॅडो पडून राहतात. पण जर तुम्ही त्याला क्रिम बेस दिला तर असे आयशॅडो वापरणे ही सोपे होऊन जाते.
साहित्य: तुमच्या आवडीचा आयशॅडो, मॅट क्रिम प्राईमर, एखादा छोटा डब्बा
कृती:
जर तुम्हाला या वर सांगितलेल्या दोन्ही पद्धतींचा वापर करुन पॅलेट खराब करायचे नसेल तर तुम्ही या रंगाच पेंट म्हणूनही उपयोग करु शकता. एखादे चित्र काढून त्यावर ग्लिटरच्या आयशॅडोने केलेले रंग अधिक उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेही याचा वापर करु शकता
आता आयशॅडो पॅलेट किंवा आयशॅडो फेकण्यापूर्वी त्याचा असा वापर नक्की करा.
DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स
जर तुम्ही उत्तम आयशॅडो पॅलेटच्या शोधात असाल तर तुम्ही MyGlammचे प्रोडक्ट नक्की ट्राय करा.