चेहऱ्याला कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावताना काही जणांना खूप काळजी घ्यावी लागते. अनेकांना कोणत्याही केमिकल्स असलेले स्किनकेअर प्रोडक्ट चालत नाहीत.अशावेळी घरीच असलेल्या नैसर्गिक गोष्टींमधून स्किनकेअर करणे अनेकांना आवडते. तुम्हालाही नैसर्गिक घटकांचा उपयोग करुन त्वचेची काळजी घ्यायला आवडत असेल तर तुम्ही फळांचा उपयोग करुनही त्वचेची काळजी घेऊ शकता. फळांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्माचे फायदे त्वचेसाठी कसे फायदेशीर असतात ते आता जाणून घेऊया.
चवीला गोड असे हे फळ अनेकांच्या आवडीचे आहे. पण तुमच्या त्वचेला तजेला देण्यासाठी हे एक चांगले फळ आहे. अननसाचे अगदी एक काप यासाठी पुरेसे आहे. घरीच अननस सोलत असाल तर अननसाच्या कडा टाकून देऊ नका. त्याही तुम्हाला स्किनकेअरमध्ये वापरता येतात. अननसामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. जे त्वचेच्या खोलवर जाऊन त्वचा खुलवते. यामधील अॅसिडीक घटक चेहऱ्यावरील लव कमी करण्यास मदत करतात. कोणत्याही त्वचेसाठी अननस हे फायद्याचे असते.
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावा ‘पालक फेसमास्क’
केळ हे अगदी घरी हमखास मिळणारे फळ आहे. केळ हे बारमाही मिळणारे फळ पोटाच्या आरोग्यापासून ते अनेक गोष्टींसाठी चांगले असते.यामध्ये व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमि B6 असते. हे दोन्ही गुणधर्म केसांच्या आणि त्वचेसाठी अधिक चांगले असतात. एखादे केळं घरी जास्त पिकलं असेल आणि ते तुम्ही खाणार नसाल तर ते केळं कुस्करुन त्यात काहीही न घालता तुम्ही ते सरळ चेहऱ्याला लावा आणि मसाज करा. 5 ते 10 मिनिटं चेहऱ्यावर केळ्याचा अर्क ठेवून द्या. जर तुम्हाला चेहरा धुताना कोमट पाण्याने धुवा.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्यासाठी हा मास्क मस्त आहे. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्ही याचा वापर करु नका.
अनेक स्किनकेअर प्रोडक्टमध्ये पपईचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन C ने युक्त असलेली पपई तुमच्या त्वचेला तजेला आणण्याचे काम करते. पपई एक्सफोलिएट करण्याचे काम करते. पपईचे सत्व डॅमेज त्वचा सुधारण्याचे काम करते. त्वचेवरील पोअर्स स्वच्छ करुन पोअर्समध्ये अडकलेली घाण काढण्यास पपई मदत करते. शिवाय पपई कोलॅजनला बुस्ट करण्याचे काम करते.
पपई हे फळ कोणत्याही त्वचेसाठी चांगले आहे त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त वापर करु शकता.
पाण्याने भरलेलं असं कलिगंड पोटभरीचे असते. उन्हाळ्यात हे फळ अगदी आवर्जून खाल्ले जाते. कलिगंड त्वचेसाठी फारच फायदेशीर असते. कलिंगडाचा उपयोग तुम्ही त्वचेसाठी करणार असाल तर तुमची त्वचा खूप चांगली होते. कलिंगडाची एक फोड घेऊन स्मॅश करुन चेहऱ्याला लावा. कलिंगडामध्ये असलेले व्हिटॅमिन E तुमच्या त्वचेतील कोलॅजन वाढण्यास मदत करते. त्यामुळे कलिंगडाची एक फोडही तुमच्यासाठी पुरेशी आहे.
आता घरीच असलेल्या फळांचा उपयोग करुन त्वचेला तजेला आणा.
जर तुम्ही चांगल्या स्किनकेअरच्या शोधात असाल तर MyGlammच्या या प्रॉडक्टचा उपयोग करु शकता.