बोट कापल्यावर करा हे झटपट उपाय मिळेल आराम

बोट कापल्यावर करा हे झटपट उपाय मिळेल आराम

बोट कापलं असं कोणी दुरुन जरी म्हटलं तरी अंगावर काटा येतो. कापलेलं बोट, त्यातून वाहणारं रक्त अशा गोष्टी किचनमध्ये काम करताना अनेकदा घडातात. पण महिला वर्गाला बोट कापल्यानंतरही काम करावीच लागतात. अशावेळी जखम पटकन भरावी आणि आराम मिळावा असे आपल्याला वाटते. बोट कापल्यानंतर तुम्ही कोणता उपाय करता? कोणत्या गोष्टीने तुम्हाला चटकन आराम मिळतो? काहींना बोट कापल्यानंतर करण्यासारखे सोपे उपाय माहीत असतील. पण तुम्ही कधी हे सोपे उपायही करुन पाहिले आहेत का?, जाणून घ्या हे सोपे उपाय करुया सुरुवात

पॉवरबॅंक जवळ नसेल तर या टिप्सने जास्त काळ टिकवा तुमच्या फोनची बॅटरी

कापूस जाळून लावणे

Instagram

 हो, पहिल्यांदा ऐकल्यानंतर  हा उपाय आपल्याला अगदीच विचित्र वाटेल पण हा उपाय खरंच चांगला आहे. बोट कापल्यानंतर तातडीने एखादा कापूस घ्या. तो आचेवर धरा. कापूस जाळल्यानंतर तो लगेचच पेट घेतो. थोडी आग कमी झाल्यावर तो गरम कापूसच कापलेल्या ठिकाणी घट्ट धरा. अर्थात असे करताना थोडासा चटका बसतो. पण कापलेल्या जागेतून रक्त थांबेपर्यंत आणि ती कापलेला तो भाग थोडासा जवळ येईपर्यंत असे करा. तुम्हाला जाणवेल की, तुमचा कापलेला भागाची त्वचा एकमेकाशी जोडली गेली आहे. दुसऱ्याच दिवशी तुम्हाला आराम मिळेल. हा उपाय एकदाच करा. कारण ते सतत करण्याची काहीच गरज नाही.

लिंबाच्या साली फेकू नका तर असा करा उपयोग

पेट्रोलिअम जेलीने मिळेल आराम

पेट्रोलिअम जेली ही देखील अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे.  पेट्रोलिअम जेली ही अँटीसेप्टिक असून ती जखम सुकवण्यास मदत करते. पेट्रोलिअम जेली लावण्याआधी तुम्ही ज्या ठिकाणी कापले आहे तो भाग पाण्याखाली धरा. पाण्याखाली धरल्यानंतर तुम्हाला थोडे झोंबेल. पण जखम स्वच्छ करुन घ्या. हात कोरडा करुन त्यावर पेट्रोलिअम जेली लावा. पेट्रोलिअम जेली लावल्यानंतर थोडावेळ काम करु नका. जेव्हा शक्य असेल तेव्हा ही जेली लावून ठेवा. 

मलम लावून मिळेल आराम

Instagram

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मलम मिळतात. पण सुरीने कापल्यानंतर तुम्ही कैलास जीवनसारखेच कोणतेही मलम लावू शकता. कारण त्यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळतो. तुमच्या त्वचेला थंडावा देऊन तुमची जखम भरुन काढण्याचे काम हे मलम करते. त्यामुळे जर तुम्हाला पहिले दोन पर्याय नको असतील तर तुम्ही अगदी आरामात हा पर्याय करु शकता. त्यामुळे अगदी काहीच दिवसात तुमची जखम भरुन निघेल. 

आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)

टाळा या चुका

 जर तुम्ही बोट कापल्यानंतर काही ठराविक चुका करत असाल तर त्या देखील तुम्ही टाळायला हव्यात. 

 बोट कापल्यानंतर कधीही ते बोट दुखते म्हणून पकडून ठेवू नका. त्यामुळे तो भाग सुजण्याची शक्यता असते. आणि नाहक जास्त रक्तही जाऊ शकते.  शिवाय असे करताना तुम्हाला अन्यही काही त्रास होण्याची शक्यता असते. 
अनेक जण बोट कापल्यानंतर बँडेज अजिबात लावू नका.  त्यामुळे रक्ताचा प्रवाहाला अडळा निर्माण होतो. 
आता बोट कापल्यावर असा मिळावा आराम