लखनवी कुडते, पलाझो पँट्स दिवाळीसाठी आहे बेस्ट पर्याय

लखनवी कुडते, पलाझो पँट्स दिवाळीसाठी आहे बेस्ट पर्याय

दिवाळीत काय घ्यायचं हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. या दिवसात आपण खास करुन ट्रेडिशनलवेअर निवडतो. पण ट्रेडिशनल कपड्यांमध्येही काय घ्यायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी एक खास पर्याय आम्ही निवडला आहे.तो म्हणजे लखनवी कुडत्यांचा… आता अनेकांकडे लखनवी कुडते हमखास असतील. पण फेस्टिव्ह सीझनसाठी योग्य असे लखनवी कुडते किती जणांकडे आहेत? त्यावर पलाझो पँटस घालून तुम्ही यंदा फेस्टिव्ह फॅशन करु शकता. चला करुया सुरुवात 

या फेस्टिव्ह सीझनसाठी आयशॅडोचा गोल्डन रंग आहे पुरेसा, असा करा वापर

लखनवी कुडत्याची फॅशन

Instagram

लखनवी कुडत्याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्हाला लखनवी कुडते निवडायचे असतील तर तुम्ही त्याचे मटेरिअल आणि त्यावरील वर्क या गोष्टींचा विचार करायला हवा. त्याची निवड करताना तुम्ही यंदा काय निवडाल? त्याचा विचार करा. 


मटेरिअलची निवड:  लखनवी कुडते हे कॉटन आणि जॉर्जेट या मटेरिअलमध्ये मिळतात. फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही जॉर्जेट मटेरिअलचे लखनवी कुडते निवडले तर ते अधिक चांगले दिसतात. जॉर्जेटच्या कुडत्यांचा फॉल हा नेहमीच चांगला पडतो. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्ही जॉर्जेटच्या कुडत्याची निवड करा. या मटेरिअलमध्ये असलेले रंगही नेहमीच चांगले आणि उठून दिसतात. त्यामुळे या मटेरिअलचे कुडते निवडताना तुम्ही उत्तम रंगाची निवडही करा. तुमच्या स्किनटोनवर छान दिसतील असे रंग निवडा


पॅटर्न निवडताना: लखनवी कुडत्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे जसे पर्याय आहेत तसे पॅटर्न ही भरपूर मिळतात.. अनारकली, स्ट्रेटकट, ए लाईन, लाँग लेंथ, शॉर्ट लेंथ असे पर्याय मिळतात. पलाझो पँटसवर  खूप छान शोभून दिसतात. फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्ही जितक्या लांब लेंथचे कुडते निवडाल तेवढे ते जास्त चांगले दिसतात. लखनवी कुडत्यावर मल्टीकलर आणि प्लेन रंगामध्ये वर्क असलेले कुडते मिळतात.

या रंगाचे कपडे उजळवतात तुमचा स्किनटोन

पलाझो पँटसची फॅशन

Instagram

लखनवी कुडत्याबरोबर चुडीदार घालण्याची फॅशन फारच ट्रेंड होती. पण आता पलाझो पँटस या लखनवी कुडत्याला शोभून दिसतात. पलाझो पँटसमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. त्याची निवड करतानाही तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यायची आहे.


पलाझोचा घेर: पलाझोच्या बॉटममध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळू शकतात. स्कर्टप्रमाणे मोठे असलेले पलाझो हे मोठे दिसतात. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही खूप मोठा घेर असलेले आणि पायघोळ पलाझोचा घेर निवडू नका. उंची कमी असलेल्यांनी पलाझोचा कमी घेर आणि कमी उंची असलेले पलाझो पँटस निवडा. कारण त्यामुळे तुमची उंची चांगली दिसते. त्यामुळे उंची आणि तुमची शरीरयष्टी बघून तुम्ही या पँटसची निवड करा. 


पलाझोचे मटेरिअल: पलाझोमध्ये कॉटन आणि जॉर्जेट मटेरिअलमध्येही ही पलाझो मिळतात. जर तुम्ही जॉर्जेटचा कुडता निवडला असेल तर तुम्ही सिंथेटीक मटेरिअलमध्ये पलाझो निवडा. कारण याचा फॉल हा अधिक चांगला दिसू शकतो. 


त्यामुळे यंदा काहीच घ्यायचे नसतील तर लखनवी कुडते आणि पलाझो पँट्स नक्की ट्राय करा.

कॉटन पैठणी सध्या ट्रेंडमध्ये, गोल्डन आणि सिल्व्हर दोन्ही काठ दिसतात छान

Latest Trends: Indian

ADA Hand Embroidered Lucknow Chikan Regular Fit Cotton Kurta Kurti

INR 1,999 AT ADA Hand Embroidered

Latest Trends: Indian

SAADGI Embellished Kurta

INR 1,297 AT SAADGI