या चुका करतात तुमच्या डोळ्यांचा मेकअप खराब

या चुका करतात तुमच्या डोळ्यांचा मेकअप खराब

डोळ्यांचा मेकअप अचूक झाला की, तुम्ही बाकी सगळा मेकअप कसा केला आहे याकडे अनेकदा फार लक्ष जात नाही. पण डोळ्यांचा मेकअप जरासा इथे तिथे झाला की, मात्र तुमचा सगळा लुक बदलतो. नकळतपणे अनेकदा डोळ्यांचा मेकअप करताना आपण काही चुका करतो. आता या चुका कोणत्या ते आपण जाणून घेऊया. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मेकअप करायला जाल त्यावेळी या चुका तुम्हाला कटाक्षाने टाळता येतील.

केसांसंदर्भात या आहेत 10 अफवा

प्रेपशिवाय मेकअप करण्याची घाई

साधारण मेकअपची सुरुवात आपण चेहऱ्याला प्राईमर लावून करतो. त्यामुळे चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये मेकअप जात नाही. पण हेच प्राईमर आपण डोळ्यांना लावायचे विसरुन जातो. डोळ्यांनाही प्राईमर आवश्यक असते. कारण डोळ्यांच्या आजुबाजूला घाम आल्यानंतर तुम्ही केलेला सगळा मेकअप विस्कटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचा सगळ्यात महत्वाचा भाग अर्थात डोळे यांना प्रेप करायला विसरु नका. 

*डोळ्यांसाठी एक खास प्राईमर मिळते तुम्ही ते वापरले तरी चालू शकते. त्यामुळे तुम्हाला अधिक चांगला रिझल्ट मिळेल. 

डोळ्यांवर येऊ देऊ नका क्रिस लाईन

अनेकांकडे कन्सिलर नसते त्यामुळे घरी असलेले फाऊंडेशनच आपण बरेचदा डोळ्यांना लावतो. डोळ्यांना फाऊंडेशन लावले तरी काही हरकत नाही. पण डोळ्यांकडील भाग संपूर्णपणे कोरडा असल्याशिवाय तुम्ही चेहऱ्याला आणि विशेषत: डोळ्याला बेस लावू नका. फाऊंडेशन डोळ्याला लावताना तुम्ही त्याला त्वचेमध्ये व्यवस्थित ब्लेंड करणे गरजेचे असते. जर तुम्ही ते काहीही न करता नुसतं हाताने फाऊंडेशन लावले तर तुमच्या क्रिस लाईनवर फाऊंडेशन साचण्याची शक्यता असते. ज्यामुळे आयशॅडो लावताना त्रास होतो. शिवाय तो नीट बसतही नाही. त्यामुळे डोळ्याला आणि डोळ्याखाली कन्सिलर किंवा फाऊंडेशन लावताना ते अगदी व्यवस्थित ब्लेंड करा.

आयशॅडो नको भारंभार

Instagram

आयशॅडो हे डोळ्यांच्या वर लावायचे असले तरी ते नीट लागणे महत्वाचे असते. आयब्रोजला चिकटेपर्यंत तुम्ही आयशॅडो लावू शकत नाही. ते लावण्याचीही एक पद्धत आहेय आयशॅडो नुसता लावला असे व्हायला नको. रंगाची निवड ते लावण्याची पद्धत ही देखील त्यामध्ये फार महत्वाची आहे.तुम्हाला आयशॅडो कसा लावायचा हे माहीत नसेल तर एखादा व्हिडिओ पाहा. अगदी बेसिक शेड लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

नवरात्रीसाठी एथनिक लुक करायचा असेल ट्राय तर फॉलो करा काजोलची स्टाईल

 

जर तुम्ही चांगल्या आयशॅडोच्या शोधात असाल तर MyGlamm चे हे आयशॅडो तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

Beauty

Manish Malhotra 9 in 1 Eyeshadow Palette - Rendezvous

INR 1,850 AT MyGlamm

आयब्रोज जाड दिसण्याचा हट्ट

Instagram

 हल्लीच्या ट्रेंडनुसार गडद आणि जाड आयब्रोज हे दिसायला अधिक सुंदर दिसतात. आता ज्यांचे आयब्रोज जाड नाही अशा लोकांसाठीही मेकअपच्या मदतीने आयब्रोज जाड करण्याची सोय आहे. पण आयब्रोज जाड हवे असा हट्ट असताना तुमचा चेहरा लहान आहे की मोठा हे देखील पाहणे फारच गरजेचे असते. जर तुमचा चेहरा लहान असेल आणि तुम्ही खूप जाड आयब्रोज करत असाल तर त्या तुम्हाला मुळीच चांगल्या दिसणार नाहीत. त्यामुळे तुमचा चेहरा आणि आयब्रोजचा रंग याचा विचार करुन आयब्रोजसाठी मेकअपची निवड करा. नाही तर तुमचा सगळा मेकअप व्यर्थ आहे. 

 

आयब्रोजसाठी आमच्याकडे आहे बेस्ट पर्याय नक्की ट्राय करा MyGlammचे हे प्रोडक्ट 

Beauty

LIT Brow Definer Pencil

INR 495 AT MyGlamm

आयलायनर, मस्काराचा थर नको

खूप जणांना विंग्ड किंवा काही स्टायलिश आयलायनर लावायला आवडतात. पण जर तुम्हाला ते लावता येत नसतील तर तुम्ही उगीचच करण्याचा प्रयत्न करु नका. लायनर अगदी पातळ आणि तुम्हाला येते तसे लावले तरी चालू शकेल किंवा तुम्ही आयलायनर लावण्याच्या सोप्या पद्धतीही शिकू शकता. 

मस्कारा बाबतीतही अगदी तसेच आहे. पापण्या मोठ्या दाखवण्याच्या नादात अनेकदा पापण्यांना इतका मस्कारा लावला जातो की, त्यामुळे पापण्या जड वाटू लागतात. त्यामुळे मस्कारा लावण्याची पद्धतदेखील तुम्ही जाणून घ्यायला हवी


आता आयमेकअप करताना या काही गोष्टींचे भान नक्की ठेवा आणि तुमचा डोळ्यांचा मेकअप कसा खुलून दिसेल याकडे अधिक लक्ष द्या.