नवरंगामध्ये न्हाऊन निघाल्या आहेत मराठी तारका

नवरंगामध्ये न्हाऊन निघाल्या आहेत मराठी तारका

नवरात्री म्हटली की नवरंगांना  विशेष महत्त्व असते. यामध्ये आपल्या मराठी तारकाही मागे नाहीत. आपल्य अदांनी आणि आपल्या फॅशनने चाहत्यांना आपलंसं करून घेणाऱ्या मराठी तारकांनी यावर्षीदेखील नवरंगात न्हाऊन निघायचे ठरवले आहे. अगदी पहिल्या दिवसांपासूनच काही जणींनी केलेल्या खास शूटचे फोटो आता व्हायरल होत आहेत. यापैकी काहींनी विशेष थीम घेऊन फोटो शूट केलं आहे तर काहींनी आपल्या आवडीसाठी फोटोशूट करून  या नवरात्रीसाठी ही खास फॅशन तुमच्यासाठी आणली आहे. पाहूया या सुंदर मराठी तारकांचे अप्रतिम फोटो. 

प्रिया बापट

View this post on Instagram

Long Post Alert 🔈‼️ Hi तुम्हा सर्वांना माझं साडी प्रेम परिचीत आहे. मला खरंच वाटतं की saree is one of the most graceful attire. या Covid -19 च्या काळात सगळ्याच व्यवसायांना मोठा फटका बसलाय. तसंच तो कापडउद्योगालाही बसला. माझी बहिण श्वेता गेली १० वर्ष Fashion आणि Textile क्षेत्रात काम करत्ये. तिची Sawenchi @sawenchi ही स्वत:ची Brand आहे. गेले काही दिवस ती अनेक कारीगरांच्या संपर्कात आहे आणि त्यातून झालेल्या चर्चेतून श्वेताने पुन्हा एकदा या Brand वर काम करणं सुरू केलं. आणि यात मी सुध्दा तिच्याबरोबर “बाराबरकी Partner” झाले आहे. So... here we are. Sawenchi तर्फे आम्ही घेऊन येत आहोत handloom साड्यांचं collection. चंदेरी, महेश्वरी, काॅटन सिल्क, अजरक print मोडाल सिल्क अशा अनेऽऽऽऽऽक प्रकारच्या साड्या. आमच्या Insta page ला जरूर like करा, shopping करा आणि तुमचे photo share करा. Let’s celebrate the saree love #sareelovers #sawenchi . @sawenchi ❤️ . So all of you know my love for sarees. And I truly believe that saree is one of the most graceful attire. In these difficult times of Covid -19 many people approached me to support weavers and small business. I kept buying stuff from few of them, I also promoted new designers on my page. But somewhere I felt doing just that isn’t enough. And that’s when my sister Shweta who has been working in the fashion and textile industry for past 10 years approached me to join hands with her brand “Sawenchi”. India has a legacy of textile. And my association with Sawenchi is purely to promote and extend our support to Indian weavers and craftsman. Join us on our Insta and FB page. To shop, and To celebrate #sareelove. #sawenchi

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

प्रिया बापट आणि साडी हे कॉम्बिनेशन अप्रतिमच असतं. आपले अनेक साडीतील फोटो  प्रिया नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. यावेळीदेखील प्रियाने आपला खास नवरात्रीतील लुक शेअर केला आहे. पहिल्या दिवशी राखाडी रंगाची साडी तर दुसऱ्या दिवशी केशरी रंगाची साडी प्रियाने शेअर केली आहे. अत्यंत साधा पण  तितकाच उठावदार असणारा हा लुक नक्कीच लक्ष वेधून घेत आहे. अगदी किमान मेकअप आणि किमान दागिन्यांमधील असणारा तिचा हा लुक नक्कीच आपण या नवरात्रीला फॉलो करू शकतो. 

रीना अगरवाल

रीना सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव्ह आहे आणि आपले फोटो नेहमीच रीना शेअर करत असते. रीनाने नवरंगांची उधळण करणारे फोटो शेअर करायचे ठरवले असून पहिल्या दिवशी अगदी राखाडी रंगाच्या ड्रेसमधील डेलिकेट असणारा लुक लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये रीना एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसत असून तिच्यावरील नजर हटत नाहीये.  तर दुसऱ्या दिवशीचा केशरी रंग हा साडीमध्ये रीनाने फोटो शेअर करत दर्शवला आहे. साधा पण  तितकाच आकर्षक असणारा हा लुक तुम्हीही घरच्या घरी नक्कीच ट्राय करू शकता. 

रीनाच्या ‘इन्स्टा लाईव्ह’ चा बोलबाला... चक्क भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलची हजेरी

सोनाली कुलकर्णी

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी तर नेहमीच साडीमधील फोटो शेअर करत असते. केशरी साडीतील तिचा हा फोटो व्हायरल झाला असून अगदी मराठमोळा खण साडी, बोरमाळ आणि कानातल्यांमधील हा लुक चाहत्यांच्या मनात घर करून बसला आहे. आता पुढे अजून कोणकोणते वेगळे रंग नवरात्रीच्या निमित्ताने खुलवून दाखवणार आहे याची नक्कीच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

सोनाली कुलकर्णी या डान्स शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

रूपाली भोसले

एकीकडे मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेतील संजना म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी रूपाली दुसऱ्या बाजूला मात्र नवरात्रीच्या या खास फोटोशूटमध्ये अप्रतिम दिसत आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक स्त्री मध्ये असणारे दुर्गाचे रूप दाखवत दुसऱ्या  दिवशी पार्वतीचे  रूप केशरी रंगात धारण  केले आहे. रूपालीच्या या नवरंगामध्ये आता पुढे  अजून किती आणि कसे अवतार दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

ऋतुजा बागवे

मालिका आणि नाटकांमधून घराघरात पोहचलेला मराठी चेहरा अर्थात ऋतुजा बागवे. प्रतिपदा क्लोदिंगसाठी ऋतुजाने केलेले शूट हे सध्या व्हायरल होते आहे. अतिशय फॅशनेबल अशा वेगळ्या अवतारात ऋतुजाने ही राखाडी रंगाची साडी अप्रतिमरित्या कॅरी केली आहे. ऋतुजाचा हा लुक तरूणींना नक्कीच भावला आहे. तिच्या  सोशल मीडिया अकाऊंटवरही या लुकला पसंती दर्शवली जात  आहे. 

अमृता खानविलकरचे हे मेकअप लुक नक्की करा ट्राय

 

तेजस्विनी पंडित

गेल्यावर्षीपासून तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या वेळी एक वेगळी थीम  घेऊन फोटोशूट सुरू केले आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यंदा आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून कोरोनायोद्ध्यांना आदरांजली देत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने डॉक्टरांमधल्या ‘दैवी’ भावनेला आदरांजली दिल्यावर नवरात्रीच्या दुस-या दिवशी पोलिसांनी कोरोना काळात केलेल्या अभूतपूर्व योगदानाला आदरांजली दिली आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत असून त्याची प्रशंसाही केली जात आहे.

नवरात्रीच्या फोटोशूटच्या फक्त तयारीसाठी तेजस्विनीला लागले 27 तास

 

मोनालिसा बागल

आपल्या अभिनयाने लक्ष वेधणाऱ्या मोनालिसा बागलच्या फोटोंनीदेखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. राखाडी रंगाच्या अप्रतिम अशा ड्रेसमध्ये असणारी मोनालिसा वेगळीच दिसत आहे. तसंच दुसऱ्या  दिवशीच्या ग्लॅमरस केशरी रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनीही लक्ष वेधून घेतलं आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक