चारकोल मास्क लावताना तुम्ही करता या चुका

चारकोल मास्क लावताना तुम्ही करता या चुका

त्वचेवरील मृत त्वचा, ब्लॅक हेड्स काढून त्वचेला ग्लो आणण्याचे काम चारकोल मास्क करते. चारकोलचे गुणधर्म असलेला हा फेस मास्क खूपच प्रसिद्ध आहे. पण चारकोल मास्क लावल्यानंतर तो व्यवस्थित निघत नाही अशी अनेकांची तक्रार असते. पण तुम्ही आणलेला चारकोल मास्क चांगला आहे का? आणि तुम्ही तो नीट लावत आहात की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहेत. चारकोल मास्कचे फायदे पाहता तो वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चारकोल मास्क लावण्याची योग्य पद्धत माहीत हवी. चला तर जाणून घेऊया चारकोल मास्क लावण्याची योग्य पद्धत

घरच्या घरी या सोप्या पद्धतीने काढता येतील ब्लॅकहेड्स

चारकोल मास्क म्हणजे काय?

Instagram

चारकोल अर्थात कोळशाचे गुणधर्म असलेला हा मास्क त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकतो. त्वचेरील इम्पयुरीटीज काढून टाकतो काढून टाकतात. शिवाय पोअर्समध्ये अडकलेले ब्लॅकहेड्स काढून टाकतात. यामधील अँटी-ऑक्सिडंट चेहऱ्यावरील तैलीय घटक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. इतर कोणत्याही पील ऑफ मास्कप्रमाणेच असतो. हा मास्क काळ्या रंगाचा असून  त्यामध्येही वेगवेगळे घटक मिळतात. 

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात चारकोल ब्युटी उत्पादनं, काय आहेत फायदे

असा लावा चारकोल मास्क

Instagram

चारकोल मास्क नीट लावायचा असेल तर तो लावण्याची योग्यपद्धत ही तुम्हाला माहीत हवी. जर तुम्ही मास्क योग्य पद्धतीने लावला तर तो योग्य पद्धतीने काढता  येईल 


  •  चेहरा स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ चेहऱ्यावर मास्क लावल्यामुळे तो पोअर्समधून धूळ आणि माती काढण्यास सक्षम होते. त्यामुळे फेसवॉश करुन मगच मास्कचा प्रयोग करा
  • आता एका भांड्यात मास्क काढून घ्या.( यामुळे तुमचा वेळ वाया जाईल असे तुम्हाला वाटेल.) मास्क ट्युबमध्ये असताना त्यामध्ये एअरबबल तयार झालेले असतात. ते एका ब्रशच्या मदतीने एकत्र करुन तुम्हाला तो मास्क एकत्र करुन घ्यायचा आहे. 
  • ब्रशनेच मास्क लावणे हे उत्तम असते. मास्क चेहऱ्याला लावण्याआधी केस बांधून घ्या. कारण केस मोकळे असतील किंवा चेहऱ्यावर आलेले असतील तर हा मास्क केसांमध्ये जाऊन अडकतो आणि तो काढणे खरंच कठीण होऊन जाते. त्यामुळे एखादा हेअरबँड बांधून घ्या. 
  • तुम्हाला चेहऱ्यावर केस खूप जास्त केस असतील तर केसांच्या कडांना व्हॅसलीन लावा. कारण त्यामुळे मास्क चिकटणार नाही.
  •  ब्रशने मास्क लावताना तो एका दिशेने लावा. डोळ्यांच्या जवळ आणि आयब्रोजपासून थोडे दूर लावा. 
  • मास्क लावल्यानंतर चेहरा रिलॅक्स ठेवा आणि तो पूर्ण वाळू द्या. कपाळ, गाल येथे मास्क वाळण्यासाठी थोडा वेळ लागतो.
  • मास्क काढताना एकाच दिशेने काढत या ही दिशा खालून वर असायला हवी. जेणेकरुन चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघण्यास मदत होते. 

आता चारकोल  मास्क लावताना ही योग्यपद्धत अवलंबा चारकोल मास्क लावा आणि चेहरा ग्लो करा. 

मिल्क पावडरने मिळवा नितळ त्वचा (Milk Powder For Face In Marathi)

 चांगल्या ब्युटी प्रोडक्टच्या शोधात असाल तर तुम्ही @MyGlammचे हे प्रोडक्ट वापरु शकता आणि तुमचे  सौंदर्य खुलवू शकता

Beauty

GLOW Iridescent Brightening Sheet Mask

INR 199 AT MyGlamm