सकाळी पोटभर नाश्ता केला की चिडचिड होत नाही. पण तोच तोच नाश्ता करायचादेखील कंटाळा येतो. आपल्याकडे पोहे, उपमा, खिचडी, शिरा, डोसा, इडली आणि सँडविच हा अगदी सर्वसामान्य नाश्ता आहे. पण तुम्हाला नाश्त्यामध्ये काही वेगळा पदार्थ हवा असेल तर तुम्ही त्यासाठी हेल्दी आणि चविष्ट मूग टोस्टदेखील ट्राय करू शकता. मूग टोस्ट हा चविष्ट असून शरीरासाठी पोषक तत्व देणारादेखील ठरतो. शाकाहारी व्यक्तींसाठी अंडे पाव हा नाश्ता करणं शक्य नसतं. अशा व्यक्तींसाठी अंड्यातील काही पोषक तत्व तुम्हाला मूगामधून मिळतात. त्यामुळे त्यांना हा नाश्ता करता येऊ शकतो. मूगडाळीत प्रोटीन असते. त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन तुम्हाला मूग टोस्टमधून मिळते आणि शरीराला ऊर्जाही मिळते. तसंच याची चवही वेगळी असते आणि तुम्हाला नेहमीच्या चवीपेक्षा वेगळा नाश्ता हवा असल्यास, तुम्ही हा नाश्ता नक्की तुमच्या ब्रेकफास्टच्या यादीत समाविष्ट करून घेऊ शकता. जाणून घेऊया या चविष्ट आणि तितक्याच हेल्दी नाश्त्याची रेसिपी.
चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य
मूग टोस्ट बनविण्यासाठी तुम्हाला घरातल्या वस्तूंचा वापर करून घेता येतो. यासाठी लागणारे साहित्य काय आहे पाहूया -
झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)
मूग टोस्ट बनविणे अत्यंत सोपे आहे. म्हणजे तुम्ही सकाळच्या घाईतही हा नाश्ता बनवू शकता. हा नाश्ता बनविण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. फक्त तुम्ही मूगडाळ किमान एक तास आधी भिजत घालावी.
सूचना - तुम्हाला मूग टोस्ट झटपट तयार व्हायला हवा असेल तर मूगडाळ आधी काही तास भिजत घालणं अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हाला पुढची कृती पटकन करून झटपट टोस्ट बनवता येईल. हे नक्की लक्षात ठेवा.
कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक