ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
नवरात्रीसाठी यावर्षी ट्राय करा अरेबिक स्मोकी आय लुक

नवरात्रीसाठी यावर्षी ट्राय करा अरेबिक स्मोकी आय लुक

महिलांना मेकअप हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही वेगवेगळ्या प्रकारचे नवे मेकअप ट्रेंड आणि त्याचा वापर करून बघणे हे तर महिलांना आवडतेच. आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि मग नवरात्रीचे स्टेटस (navratri status in marathi) सोशल मीडियावर दिसायला सुरूवात होईल. मग यावर्षी  नवरात्रीला तुम्हाला जर वेगळा लुक करून पाहायचा असेल तर तुम्ही अरेबिक स्मोकी आय लुक नक्की ट्राय करू शकता. दरवेळी तोच तोच लुक ठेवण्यापेक्षा  हा लुक थोडा वेगळा आणि अधिक आकर्षक आहे. तुम्हीही कुठेही हा लुक करून गेलात तर नक्कीच चारचौघींमध्ये अधिक उठून दिसाल यात शंका नाही. सध्या अरेबिक मेकअपचा ट्रेंड आहे. अरेबिक मेकअपमध्ये बोल्ड लिप्स आणि स्मोकी आईज यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येते.  खरं तर अधिकाधिक तरूणींना गडद ओठ, बोल्ड मेकअप जास्त आवडतो. तुम्ही कोणत्याही पार्टी अथवा नवरात्रीच्या खास समारंभाला जाणार असाल तर नक्की हा अरेबिक स्मोकी आय लुक तुम्ही ट्राय करायला हवा. 

असा करा अरेबिक मेकअप (How to do Arabic Makeup)

अरेबिक मेकअप कसा करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. मेकअप सुरू करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर तुम्ही क्लिन्झिंग मिल्क लावा आणि चेहरा स्वच्छ  करून घ्या. क्लिन्झिंग मिल्क वापरल्याने त्वचा आतूनही स्वच्छ  होते. त्यानंतर त्वचेवर टोनर लावा. टोनर वापरल्याने मेकअप करून चेहऱ्याला नुकसान पोहचत नाही. हा मेकअप हेव्ही  असल्याने चेहऱ्याला नुकसान पोहचण्याची  शक्यता असते. त्यामुळे टोनरचा वापर करा. टोनर लावल्यानंतर चेहऱ्यावर फाऊंडेशन लावा. फाऊंडेशन लावल्यावर चेहऱ्याला गुलाबी रंगाचा ब्लशर लावा. याने तुमचा चेहरा अधिक आकर्षक दिसेल. तसंच हा मेकअप थोडा हेव्ही असतो.  त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर तुमच्याकडे पटकन लक्ष जाते. यासाठी तुम्ही MyGlamm मधील मनिष मल्होत्राचे 9 in 1 आयशॅडो पॅलेट नक्की वापरू शकता.

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

आय मेकअप अर्थात स्मोकी आय लुक (Smokey Eye Look)

अरेबियन मेकअपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आय मेकअप. अरेबियन आय मेकअप वेगवेगळ्य रंगात तुम्हाला पाहायला मिळतो. याचा वेगवेगळा वापर करण्यात  येतो. तुम्हाला स्मोकी आय लुक हवा असेल तर त्यासाठी नक्की काय करायचे ते आपण जाणून घेऊया.  

ADVERTISEMENT
  • डोळ्यांच्या आतल्या बाजूच्या कॉर्नरला सिल्वर आयशॅडो लावा आणि मध्ये गोल्डन आणि बाकी बाजूला तुम्ही घातलेल्या कपड्यांना मॅच होणारे डार्क अर्थात गडद आयशॅडो लावा
  • परफेक्ट लुक मिळविण्यासाठी तुम्ही काळ्या रंगाच्या आयशॅडोने डोळ्यांच्या आजूबाजूला कोटिंग करून घ्या 
    असं केल्यामुळे तुमचे डोळे परफेक्ट स्मोकी दिसतील आणि डोळे लहान असतील तर मोठेदेखील दिसतील
  • यानंतर तुम्ही आयब्रोच्या खाली डोळ्यांवर खालच्या बाजूने गोल्ड शेडने हायलाईट करा 
  • त्यानंतर डोळ्यांवर लायनर आणि मस्कारा लाऊन तुमचा स्मोकी आय लुक पूर्ण करा 

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

सर्वात शेवटी लिप मेकअप अर्थात लिपस्टिक लावण्यात येते. अरेबिक मेकअपमध्ये डोळ्यांच्या मेकअप पासून ते अगदी ओठांच्या मेकअपपर्यंत लक्ष देण्यात येते. अरेबिक मेकअप करत असाल तर ओठांवर बरेचदा बोल्ड अर्थात गडद लिपस्टिकचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या रंगाचा ड्रेस घातला आहे ते बघून त्याप्रमाणे त्या शेड्सनुसार लिपस्टिकचा रंग निवडा. 

घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
14 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT