अनेकांच्या दिवसांची सुरुवात ही सकाळी सकाळी केस विंचरुन होते. दिवसातून किमान दोनवेळा तरी केस विंचरायला हवे. पण काहींना सतत केस विंचरायची सवय असते. जर तुम्ही अगदी तासातासाने काही कारण नसताना जर केस विंचरत असाल तर तुम्ही केसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही सवय फारच चुकीची आहे. केस सतत विंचरल्यामुळे नेमके काय नुकसान होऊ शकतात ते आपण जाणून घेऊया.
केस विंचरण्याचा सगळ्यात पहिला फायदा असा की, केस विंचरल्यामुळे तुमच्या स्काल्पवर असलेले तेल आणि मॉईश्चर संपूर्ण केसांमध्ये पसरण्यास मदत होते. हे मॉईश्चर आवश्यक असलेल्या घटकांपैकी आहे. पण जर तुम्ही दोनपेक्षा अधिक वेळा केस विंचरत असाल तर त्यामुळे तुमचे केस रुक्ष होऊ शकतात. एखादी गोष्ट सतत केल्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी तुमचे नुकसान होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केसांचे अति विंचरणे. केसांच्या मुळांना सतत धक्का दिल्यामुळे त्यातील पोषण मुल्ये कमी होऊन केसांचे टोक रुक्ष व्हायला लागतात.
आपण इतर कशालाही जितके जपत नाही तितके केसांना मनापासून जपते. केस गळतीपेक्षाही कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी असेल तर ते आहे केस तुटणे. अगदी क्षुल्लक कारणावरुन केस तुटले की, जिवाला लावून राहते. अनेकांना केस विंचरताना पाहणे म्हणजे त्रास करुन घेण्यासारखे असते. कारण ते केस विंचरत आहेत की, केसांसोबत धोबीपछाड करत आहेत. हे अनेकदा कळत नाही. सतत केस विंचरल्यामुळे केस तुटण्याच्या तक्रारी अधिक वेळा जाणवतात. कारण नसताना केस विंचरल्यामुळे केसांची मूळ तर दुखावली जातातच. शिवाय काही केस विंचरताना अर्ध्यातच तुटतात.
केस विंचरताना कोणताही कंगवा वापरुन चालत नाही. अनेकांना बारीक कंगव्याने केस विंचरायला आवडतात. कारण त्यामुळे केसांच्या गाठी सोडण्यास मदत होते असे अनेकांना वाटते. केसांच्या गाठी सोडवण्यासाठी जरी हे कंगवे योग्य असले तरी देखील त्यांचा सतत वापर करणे केसांसाठी फारच त्रासदायक असते. तुमचे केस पातळ असो किंवा जाड केसांसाठी तुम्ही मध्यम आकाराच्या किंवा मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करणे नेहमीच चांगले.
केसांबद्दल असे नेहमी म्हटले जाते की, केस जितक्या वेळा विंचराल तितकी त्याची चमक अधिक टिकून राहते पण यात काहीही तथ्य नाही. केस सतत विंचरल्यामुळे केसांवरील नॅचरल ऑईल्स केसांमध्ये मिसळून केसांना चमक मिळत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. त्यामुळे केसांची चमक घालवायची नसेल तर केस सतत विंचरु नका. केसांमध्ये गुंता झाला असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हाताने केसांचा गुंता सोडवायचा प्रयत्न करा.
त्यामुळे केसांची चमक टिकून राहील.
आता केस सतत विंचरण्यापूर्वी तुम्ही केसांना होणारे नुकसानही लक्षात घ्या.