चेहरा स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण आतापर्यंत नेहमीच पाहिल्या असतील. त्यातील स्क्रबिंग ही अनेकांना आवडणारी गोष्ट आहे. पण खूप काही चांगले करण्याच्या नादात आपण अनेकदा आपला चेहरा गरजेपेक्षा जास्त वेळा स्क्रब करतो. याचा परिणाम चेहरा चांगला होण्याऐवजी अधिक खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्ही चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त स्क्रब करत असाल तर तुमचा चेहऱ्याची त्वचाच तुम्हाला काही संकेत देईल. या संकेताकडे दुर्लक्ष करु नका. तर त्याची काळजी घ्या.
काहींच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत नाही. साधारण ठराविक कालावधीत त्यांना हा त्रास होतो म्हणजे पिरेड्स किंवा पोट साफ नसेल तर असा त्रास होणे अगदीच स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला त्वचेची योग्य काळजी घेऊनही पिंपल्स येत असतील तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात. अति स्क्रब केल्यामुळेही तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. हो हे अगदी खरं आहे. स्क्रब केल्यामुळे त्वचेवरील पोअर्स मोकळे होतात. पोअर्स सतत ओपन राहिल्यामुळे त्यात घाण जाते. त्यामुळेही पिंपल्स येतात. त्यामुळे जर तुम्हाला स्क्रब केल्यामुळे असा त्रास होत असेल तर तुम्ही स्क्रब करणे थांबवा.
त्वचा जळजळण्याचा त्रास अनेकांना अचानक होऊ लागतो. त्वचेवर खूप जास्त घर्षण झाले की, त्वचा जळायला लागते. स्क्रबमध्ये असलेले कण चेहऱ्याला घासतात. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचाही घासली जाते. त्यामुळे त्वचा ही जळजळत राहते. तुम्ही कशाचाही प्रयोग त्वचेवर केलात तरी हा त्रास तुम्हाला होतो. एखाद्या स्क्रबच्या वापरानंतर तुमची त्वचा मुलायम लागत असली तरी देखील त्यावरील पोअर्स स्क्रबमुळे ओपन झालेले असतात. जर तुम्ही सतत स्क्रब करत राहिलात तर तुमचे पोअर्स तसेच राहतात. शिवाय त्वचा नाजूक होते आणि जळजळत राहते.
अति स्क्रब करण्याचा आणखी एक परीणाम त्वचेवर होतो तो म्हणजे sensitivityचा जर तुम्ही सतत स्क्रबचा वापर करत असाल तर त्यानंतर चेहऱ्याला कोणते ब्युटी प्रोडक्ट वापरले तर ते ब्युटी प्रोडक्टही तुम्हाला त्रासदायक वाटू लागतात. ते चेहऱ्याला लावल्यानंतर त्वचा जळजळू लागते. त्यामुळे जर तुम्ही स्क्रब अति प्रमाणात करत असाल तर आताच ही सवय सोडा. कारण त्यामुळे तुमची त्वचा आकर्षक दिसायची सोडून ती अधिक निस्तेज दिसू लागते.
त्वचा सोलून निघण्याचा त्रास अनेकांना होतो. पण वातावरणानुसार त्वचा निघणे आणि एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा सातत्याने वापर केला तर असे होऊ शकते. पण स्क्रबचा अति वापर केला तर हा त्रास प्रकर्षाने आणि पटकन जाणवू लागतो. स्क्रबमुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जात असली तरी त्याच्या अतिवापरामुळे त्वचेवरील चामडी निघू शकते. त्यामुळे स्क्रबचा अति प्रयोग चेहऱ्यावर करणे टाळा.
आता जर तुम्हाला त्वचेसंदर्भातील या तक्रारी जाणवत असतील तर तुम्ही आताच त्याचा वापर नियंत्रणात आणा.
जर तुम्ही त्वचेसाठी चांगले फेसवॉश शोधत असाल कर MyGlamm चे प्रोडक्ट नक्की करा ट्राय