ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

तुमचे डोळे जर लहान असतील तर मेकअप केल्यानंतर ते अधिक लहान दिसू लागले तर समजून जा की, तुम्ही चुकीचा मेकअप केला आहे. प्रत्येकाच्या  डोळ्यांचा आकार हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक डोळ्यासाठी मेकअफ करताना वेगवेगळा मेकअप लुक करावा लागतो. तुमचे डोळे जर लहान असतील आणि तुम्हाला जर परफेक्ट आय मेकअप लुक करून हवा असेल तर तुम्हाला आम्ही इथे योग्य मार्गदर्शन देणार आहोत. तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर सुंदर मेकअप करण्याचा तितकाच हक्क आहे आणि तुम्हालाही हा मेकअप खूप चांगल्या तऱ्हेने फ्लॉंट करता येईल. पण लहान डोळ्यांचा मेकअप परफेक्ट करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडतो. तर लहान डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो तशा काही गोष्टी फॉलो करता यायला हव्यात. तुम्ही असा मेकअप केल्यास, तुम्हाला उत्तम मेकअप जमू शकेल आणि तुमचे डोळेही तितकेच सुंदर दिसतील. पाहूया नक्की काय काय करायचे. यासाठी तुम्ही MyGlamm ची उत्पादनेही वापरू शकता. आम्ही तुम्हाला यासाठी उत्तम उत्पादनांची लिंकदेखील या लेखाद्वारे देत आहोत.

                                                       वाचा – डोळ्यांखाली येणाऱ्या खाजेसाठी जाणून घ्या घरगुती उपाय

लहान डोळ्यांच्या महिलांनी अशा प्रकारे लावा आयलायनर

बऱ्याचदा आयलायनर लावल्यानंतर लहान डोळे असणाऱ्या महिलांच्या डोळ्यांच्या आकारामुळे लायनर लावलं आहे कळूनच येत नाही. मग अशावेळी एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही आयलायनर लावलेत तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आयलायनर दिसूनही येईल. तुमचे डोळे लहान असतील तर तुम्ही आयलायनरचा पातळ थर डोळ्यांना लावा. जर तुम्ही हेव्ही लेअर लावलात तर तुमचे डोळे अधिक लहान दिसून येतील. त्यामुळे तुम्ही लायनर लावताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.. तसंच तुम्ही डोळ्यांना काजळ थोड्या जाड थराचे लावलेत तर तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसतील. लायनर आणि काजळ कॉम्बिनेशन तुमच्या डोळ्यांना उठावदार दाखविण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. 

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

ADVERTISEMENT

लहान डोळ्यांवर लावा असा मस्कारा

लहान डोळ्यांच्या महिलांनी नेहमी हेव्ही मस्कारा आपल्या पापण्यांवर लावावा. हेव्ही मस्कारा तुम्ही लावल्यास तुमच्या पापण्यांमुळे डोळे अधिक मोठे दिसण्यास मदत मिळते. तसंच डोळे अधिक सुंदर दिसतात. पापण्या थोड्या मस्कारा लाऊन कर्व्ह करून घेतल्यास त्या अधिक सुंदर दिसतील. त्यामुळे लहान डोळे अधिक उठावदार दिसतील.

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

पांढऱ्या काजळाचा करा उपयोग

ज्या महिलांचे डोळे लहान आहेत त्यांनी काळ्या काजळ पेन्सिलऐवजी पांढऱ्या काजळाचा उपयोग मेकअप करताना करावा. यामुळे तुमचे डोळे मोठे दिसण्यास मदत मिळते. तुम्ही तुमच्या डोळ्यांवर हा प्रयोग एकदा नक्की करून पाहा. तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल. तसंच पांढऱ्या काजळाने तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसण्यासही मदत मिळते. 

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

ADVERTISEMENT

आयशॅडोचा असा करा वापर

तुमचे डोळे लहान असतील तर तुम्हाला आयशॅडो दिसत नाही असं वाटतं. त्यामुळे तुम्ही जर आयशॅडो वापरायचे की नाही या विचारात असाल तर तुम्हाला आयशॅडो वापरण्याची एक सोपी आणि उत्तम पद्धत आम्ही सांगत आहोत. तुमचे डोळे लहान असल्यास, तुम्ही आय मेकअपसाठी लाईट शेडच्या आयशॅडोचा वापर करा. गडद रंगाचे आयशॅडो वापरल्याने तुमचे डोळे अधिक लहान दिसतात. पण डोळ्यांचा आकार मोठा दिसायला हवा असेल तर लाईट रंगाचे आयशॅडो पॅलेट तुम्ही वापरा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT