केस सिल्की, स्मुथ आणि शाईनी दिसावे म्हणून अनेक जण शक्य असेल तेव्हा आपण हेअर स्पा करतो. हेअर स्पा करायचे म्हणजे किमान पाऊण तासाचा वेळ तरी आपल्याला काढावाच लागतो. आता स्पा करणार म्हणजे केसा विंचरुन त्याला हेअर स्पा क्रिम लावणे, मसाज करणे, स्टिम घेणे आणि हेअर वॉश करणे या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आल्या. पण कधी कधी इतका वेळ या ट्रिटमेंट्समध्ये घालवणे सगळ्यांनाच परवडणारे नसते. पण केसांच्या बाबतीत हलगर्जीपणा करुनही चालत नाही. म्हणूनच केसांची अशी एक ट्रिटमेंट आम्ही निवडली आहे जी इटपट तर होते पण तिचा केसांवरील इफेक्टही बराच काळ टिकतो .स्पा सारखीच असणारी ही हेअर ट्रिटमेंट मिनी हेअर स्पा म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. जाणून घेऊया अशाच केसांसाठीच्या पावरडोस ट्रिटमेंटविषयी.
ओले केस पुसण्यासाठी मायक्रो फायबर टॉवेल वापरण्याचे हे आहेत फायदे
केसांसाठी केली जाणारी ही पावरडोस ट्रिटमेंट फारच प्रसिद्ध ट्रिटमेंट आहे. केसांची समस्या ओळखून त्यानुसार पावडोसचे प्रोडक्ट निवडले जातात. केसांवर लावून केसांवर त्याचा मसाज केला जातो. साधारण 15 मिनिटांनी केस स्वच्छ धुतले जातात. कोरडे केस, केसगळती, कोंडा, तेलकट स्काल्प या सगळ्यासाठी पावरडोस ट्रिटमेंट करण्यास सांगितले जाते. पावरडोस ट्रिटमेंट ही इतकी ताकदीची असते की, या ट्रिटमेंटनंतर तुमचे केस लगेचच स्मुथ, सिल्की आणि शाईनी दिसू लागतात.
पावरडोस ट्रिटमेंट कोणीही करु शकतात. तुम्ही केसांना कलर केला असेल तरी देखील तुमच्या केसांसाठी अशी ट्रिटमेंट बेस्ट आहे. केसांना रंग केल्यामुळे अनेकदा केस कोरडे होतात. कोरड्या केसांची काळजी घेण्यासाठी ही उत्तम हेअर ट्रिटमेंट आहे. पावरडोस ट्रिटमेंट केल्यानंतर तुमच्या केसांचा रंग अधिक उठून दिसतो. केस चमकू लागतात.
कोणतीही हेअर ट्रिटमेंट म्हणजेच एखादा स्पा किंवा मिनी स्पा साधारण 15 दिवसांनी करायला काहीच हरकत नाही. जर तुमच्या केसांना सतत ही ट्रिटमेंट केला तरी तुमचे केस तेलकट होऊ शकतील. त्यामुळे तुम्ही महिन्यातून दोनदा शक्य असल्यास ही ट्रिटमेंट करा. ही ट्रिटमेंट पटकन होत असल्यामुळे याला फार वेळ लागत नाही. पावरडोस या ट्रिटमेंटचा खर्च हा साधारण 1500 रुपये इतका आहे.
आता सलोनमध्ये जाणार असाल तरर तुम्ही नक्कीच ही पावरडोस ट्रिटमेंट करुन पाहा.