व्यायामाआधी आणि नंतर कशी घ्यावी त्वचेची काळजी

व्यायामाआधी आणि नंतर कशी घ्यावी त्वचेची काळजी

वर्कआऊटचा तुमच्या शरीर आणि मनावर सारखाच परिणाम होत असतो. कारण यामुळे घामावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते. पण याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का ? कारण तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या त्वचेवर घामाचा खूप थर जमा होत असतो. या घामामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स बंद होण्याची शक्यता असते. म्हणूनच व्यायामानंतर त्वचा योग्य पद्धतीने स्वच्छ करणं आवश्यक आहे. मात्र व्यायाम केल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो ज्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसू लागतो. पण काहिही असलं तरी व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर त्वचेची योग्य काळजी घ्यायलाच हवी. यासाठीच  आम्ही तुमच्यासोबत अशा काही सोप्या टिप्स फॉलो करत आहोत. ज्या तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटिनमध्ये जरूर समाविष्ट करू शकता.

व्यायाम करण्यापूर्वी मेकअप करू नका -

तुम्हाला  वाटेल ही एक सामान्य गोष्ट आहे आणि ती आम्हाला माहीत आहे. असं म्हणत या  गोष्टीकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण लक्षात ठेवा मेकअपसह व्यायाम केल्यामुळे तुमच्या त्वचेचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. व्यायामासाठी तुम्हाला शारीरिक कष्ट घ्यावे लागतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स मोकळे होत असतात. अशा वेळी या पोअर्सच्या माध्यमातून तुमचा  मेकअप त्वचेच्या खोलवर जाऊन सेट होऊ शकतो. असं झाल्यास पिंपल्स, तेलकट त्वचा अशा अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय वर्कआऊट करताना तुमच्या त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा या पोअर्सच्या माध्यमातून होत असतो. मात्र मेकअपमुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स बंद राहतात आणि त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा कमी होतो. तुम्हाला अगदीच बिनामेकअप जीममध्ये जाणं शक्य नसेल तर चेहऱ्यावर मॉईस्चराईझर अथवा सनस्क्रीन लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेला लाईट कव्हरेज मिळेल आणि तुम्हाला  रिलॅक्सही वाटू शकेल.

Beauty

Immortelle Unisex Oil Make-Up Remover

INR 2,090 AT L'Occitane

टोनर पॅड तुमच्या जवळच ठेवा -

वर्कआऊट करताना टोनर आणि कॉटन पॅड अथवा टोनरमध्ये भिजवलेले टोनर पॅड तुमच्या जवळ अवश्य असू द्या. तुमच्या त्वचेच्या प्रकार आणि गरजेनुसार याचा वापर तुम्ही अधुनमधुन करू शकता. टोनर पॅटमुळे तुम्हाला तुमच्या त्वचेवर जमा झालेली अतिरिक्त धुळ, प्रदूषण पुसून टाकता येईल. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि मऊ राहील.

Beauty

Glow Tonic To-Go Pads

INR 1,598 AT PIXI

वर्कआऊटनंतर चेहरा स्वच्छ धुवा -

ही एक अतिशय सोपी आणि पटकन करण्यासाठी युक्ती आहे. व्यायाम झाल्यावर लगेचच तुमचा चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील घाम आणि त्यातून निर्माण होणारे जीवजंतू नष्ट होतील. व्यायामानंतर यासाठीच अंघोळ करणं फार गरजेचं आहे. पण तुमची जीम घरापासून फार दूर असेल तर घरी जाऊन अंघोळ करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुण्यास विसरू नका.

Beauty

WIPEOUT GERM KILLING FACE WASH

INR 119 AT MyGlamm

चेहऱ्याला सतत हात लावू नका -

व्यायाम करताना तुम्ही जीममधील अनेक उपकरणांना हात लावता. ज्या उपकरणांना याआधी अनेकांनी हात लावलेला असू शकतो. जर तुम्ही घरीच व्यायाम करत असाल तरी बाहेरील प्रदूषणाचा संपर्क व्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांना होत असतो. यासाठीच व्यायाम करताना अथवा झाल्यावर तुमचे हात चेहऱ्यावर लावू नका. कारण यातून तुमच्या हातावरचे बॅक्टेरिआ तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेला लागू शकतात. यासाठीच व्यायाम झाल्यावर लगेचच हात धुवा ज्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या -

आपल्या शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. व्यायाम करताना तुमच्या शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असते. म्हणूनच व्यायाम केल्यावरही सतत तुम्हाला पाणी पिण्याची गरज असते. ज्यामुळे तुमच्या शरीराला लागणारी पाण्याची गरज पूर्ण होते. पाण्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि तजेलदार राहते. यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.