मैत्रिणीच्या लग्नासाठी तयार होताना या गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर बिघडेल लुक

मैत्रिणीच्या लग्नासाठी तयार होताना या गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर बिघडेल लुक

लग्नकार्याला सध्या जोरदार सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या काळात रखडलेले विवाहसोहळे आता लॉकडाऊननंतर पार पडत आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि नियमांचे पालन करत आमंत्रितांच्या यादीवर कडक बंधन आलं असलं तरी लग्नाचा थाटमाट नेहमी सारखाच आहे. जर तुमच्या बहीणीचे अथवा एखाद्या बेस्ट फ्रेंडचं लग्न ठरलं असेल तर या काळात तुम्हाला लग्नाची मौजमजा लुटण्याती संधी नक्कीच मिळेल. अशा वेळी एखाद्या खास लग्नासाठी तयार होताना या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा नाहीतर तुमचा पूर्ण लुकच खराब होऊ शकतो. कारण बऱ्याचदा लग्नकार्यात फॅशनबाबत केलेल्या या चुका महागात पडतात. यासाठी जाणून घ्या लग्नकार्यासाठी तयार होताना आमंत्रितांनी कोणत्या चुका करू नयेत.

पांढरे अथवा काळे कपडे घालणे -

बऱ्याच लोकांना पांढरा आणि काळा खूप आवडत असतो. त्यामुळे कुठेही जाताना ते याच रंगाचे कपडे निवडतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जाणार असता तेव्हा पांढरा अथवा काळा रंगाचे कपडे मुळीच परिधान करू नये. कारण लग्नकार्यात पांढरा आणि काळा रंग शोभून दिसत नाही. काळा रंग शुभ कार्यासाठी वर्ज्य असल्यामुळे तो वापरू नये आणि पांढरा रंग हा खूपच फिकट असतो त्यामध्ये तुमचे फोटो चांगले येत नाहीत. यासाठी लग्नकार्यात जाताना लाल, पिवळा, हिरवा असे पारंपरिक आणि गडद रंग निवडा.

एकाच रंगाचा पूर्ण आऊटफिट वापरणे -

जर तुम्हाला लग्नात उठून दिसायचं असेल तर एकाच रंगसंगतीचा आऊटफिट वापरू नका. तुमच्या ड्रेस अथवा साडीमध्ये कॉम्बिनेशन असायला हवं. कारण  त्यामुळे तुमचा आऊटफिट उठावदार दिसतो. रंगसंगती ही कोणत्याही आऊटफिटमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या आऊटफिटचे रंग जाणिवपूर्वक निवडा. एकाच रंगाचा पूर्ण सूट वापरल्यामुळे तुमच्या उंची आणि व्यक्तिमत्वामध्ये उठावदारपणा दिसत नाही. यासाठीच वेडिंग आऊटफिट निरनिराळ्या रंगाच्या रंगसंगतीत तयार केले जातात. 

डेनिमचे आऊटफिट घालणे -

काही  लोकांचे डेनिमवर विशेष प्रेम असतं. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात त्यांना डेनिम लुक करणं आवडू शकतं. मात्र एक लक्षात ठेवा तुम्हाला जीन्स अथवा डेनिम आऊटफिट्स कितीही आरामदायक वाटत असले तरी ते लग्नकार्यात वापरू नयेत. कारण वेडिंग फंक्शनसाठी तुम्ही गडद रंगाचे, एथनिक लुक असलेले कपडे घातले तर ते नक्कीच शोभून दिसतं. त्यामुळे लग्नकार्यात कपडे आरामदायक असण्यासोबत शोभून दिसतील असेच निवडावे.

हेव्ही गोल्ड ज्वैलरी वापरणे -

लग्नकार्य म्हटलं की दागदागिन्यांची हौस ही आलीच. मैत्रीण अथवा बहीणीच्या लग्नात तुम्ही साडी, लेंगा वापरणार असाल तर दागदागिने त्यावर सूट होतील असेच निवडा. सोन्याची ज्वैलरी कितीही मौल्यवान असली तरी ती प्रत्येक आऊटफिटवर चांगली दिसेल असं नाही. त्यामुळे तुमचे आऊटफिट कसे आहेत त्यानुसार तुमची ज्वैलरी निवडा. शिवाय जर गळ्यात हेव्ही नेकलेस असेल तर इतर ज्वैलरी कमी घाला ज्यामुळे तो नेकपीस उठून दिसू शकेल. 

अती सैल अथवा अती घट्ट कपडे -

कोणत्याही लग्नासाठी तयार होताना आधी तुम्ही कपडे तुमच्या फिटिंगचे आहेत का याची ट्रायल घ्यायला हवी. कारण तुमचे वजन नेहमी कमी जास्त होत असते. अशा वेळी त्यानुसार साडीवरचे ब्लाऊज अथवा लेंग्याचं फिटिंग कमी जास्त करणं गरजेचं आहे. लग्नात अती ढगळ अथवा अती घट्ट कपडे घातल्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. 

Beauty

LIT Lip & Eye Sparkles - Crown Jewels

INR 445 AT MyGlamm