जाणून घ्या सॉफ्ट ग्लॅम मेकअपविषयी (Soft Glam Makeup)

जाणून घ्या सॉफ्ट ग्लॅम मेकअपविषयी (Soft Glam Makeup)

मेकअपचे अनेक वेगळे ट्रेंड कायम येत असतात. कधी #cutcreaseeye कधी #smokeyeyes कधी आणखी काही वेगळे. सध्या मेकअपमध्ये एक नवा ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे सॉफ्ट ग्लॅम मेकअपचा (Soft Glam Makeup). आता हा मेकअपचा प्रकार म्हणजे नेमकं काय आणि तो कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया. पण सुरुवात करण्याआधी मेकअपचा हा प्रकार फार काही वेगळा नाही. त्यामुळे तुम्ही मेकअपच्या साहित्याची भीती नाही तुमच्याकडे असलेल्या साहित्यातूनच तुम्हाला हा मेकअप लुक करता येतो. चला तर जाणून घेऊया या मेकअप लुकविषयी 

डोळे लहान असतील तर असा करा डोळ्यांचा मेकअप (Makeup Tips For Small Eyes In Marathi)

सॉफ्ट ग्लॅम मेकअप म्हणजे काय?

 सॉफ्ट ग्लॅम मेकअप हा अगदी चेहऱ्यावर दिसूनही न दिसल्यासारखा असतो. यामध्ये न्यूड रंगाचा वापर केला जात नाही. तर तुमच्याकडे असलेल्याच मेकअपच्या गोष्टींचा वापर केला जातो. हिरवा, काळा, करडा, गुलाबी, केशरी रंगाचा आयशॅडो आणि लिपस्टिक यांचा वापर करण्यात येत असला तरी देखील हा मेकअप करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. सॉफ्ट ग्लॅम मेकअपचे उद्दिष्ट चेहऱ्यावर ग्लो आणणे, चेहरा फ्रेश दाखवणे, चेहऱ्यावर मेकअप असूनही तो अगदी सॉफ्ट दिसणे हा असतो. म्हणूनच याला सॉफ्ट ग्लॅम ( Soft Glam Makeup) असे म्हणतात. 

असा करा सॉफ्ट ग्लॅम मेकअप

Instagram

  • सगळ्याच आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • तुमच्याकडे असलेल्या फाऊंडेशन घ्या. जर तुमच्या फाऊंडेशनमध्ये आधीपासूनच शीर(Sheer) असेल तर फार उत्तम.
  • कारण त्यामुळे या मेकअपला हवा असलेला ग्लो तुम्हाला मिळतो.  जर तुमच्याकडे शीर फाऊंडेशन नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फाऊंडेशनमध्ये थोडे मॉश्चरायझर घाला. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला ग्लो मिळतो. जो सॉफ्ट ग्लॅम मेकअपसाठी अपेक्षित असतो.
  • कन्सिलरचा उपयोगही या मेकअप लुकमध्ये प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे गरज असेल त्याच ठिकाणी तुम्ही कन्सिलरचा उपयोग करा. भारंभार कन्सिलर लावू नका. 
  • डोळ्यांचा मेकअप करताना तुम्हाला अगदी कमीत कमी मेकअप करायचा आहे. तुम्ही निवडलेली शेड भारंभार लावू नका. तुमच्या त्वचेलगत हा शेड चांगला दिसेल इथपर्यंतच त्याचा वापर करा. गडद रंगाचा प्रयोग करताना या गोष्टीची खबरदारी अधिक घ्या. 
  • आयब्रोज फिल करतानाही हलक्या हाताने जास्त गडद न करता आयब्रोज फिल करा. 
  • डोळ्यांना काजळ आणि मस्कारा लावून घ्या. (खूप मस्कारा आणि काजळ लावू नका)
  • मेकअप लुकचा हायलाईट करणारी गोष्ट म्हणजे ब्लशरआणि कॉन्टोरींग. कॉन्टोरींग चुकीचे झाले तर त्याचे डाग चेहऱ्यावर दिसतात. फाऊंडेशननंतर तुम्ही त्याचा वापर त्वरीत करा. मेकअप ब्रशच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर ते अगदी व्यवस्थित ब्लेंड करा. 
  • ब्लशरचा उपयोग करताना तुम्ही एक स्ट्रोक किंवा दोन स्ट्रोक करा. खूप गडद रंगाचा प्रयोग करु नका. 
  • तुम्हाला आवडेल त्या लिपस्टिकचा प्रयोग तुम्ही अगदी बिनधास्त करु शकता. पण लिपस्टिक लावतानाही तुम्ही ती चेहऱ्यावरील मेकअपचा विचार करुन लावा. 

सॉफ्ट ग्लॅम मेकअप हा तुम्हील दररोज करु शकता. शिवाय यामध्ये थोडीशी व्हरायटी आणून हा मेकअप ब्राईडलाही करता येतो. 

 घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

जर तुम्ही नव्याने मेकअप घेणार असाल तर MyGlamm उत्पादित प्रोडक्ट नक्की वापरुन पाहा.

 

Beauty

Total Makeover FF Cream Foundation Palette - Cappuccino

INR 1,450 AT MyGlamm

Beauty

Powder Magic Eyeshadow Pencil - Amethyst

INR 950 AT MyGlamm