ADVERTISEMENT
home / Planning
लॉकडाऊनमध्ये करत असाल लग्न तर घ्या या गोष्टींची खास काळजी

लॉकडाऊनमध्ये करत असाल लग्न तर घ्या या गोष्टींची खास काळजी

या वर्षी कोरोना व्हायरस या महामारीने लोकांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरवलं आहे. या वर्षी ज्यांचे लग्न ठरविण्यात आले होते. त्यांना सगळ्यांनाच आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. पण आता हे असंच जगावं लागणार आहे हे जाणवल्यानंतर पुन्हा एकदा लग्नाच्या सरबराईला लॉकडाऊन काळात सुरूवात झाली आहे. इतकंच नाही तर काहींनी तर अगदी सुरूवातीलाही हिंमत दाखवत लॉकडाऊन आणि कोरोना काळात लग्न केले. ज्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छाही दिल्या. तर आता ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीत लग्नकार्याला सुरूवात झाली आहे. पण अशा वेळी काही खास गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. तुमच्यापैकी कोणी  लॉकडाऊनमध्ये लग्न करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास महत्त्वाच्या गोष्टी. 

लग्नाचे स्थळ करा निश्चित

Instagram

ही सर्वात पहिली आणि आवश्यक पायरी आहे. लॉकडाऊनमध्ये लग्न करायचं असेल तर अत्यंत मर्यादित पर्याय आता उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणते स्थळ उपलब्ध आहे ते आधीच नोंदणीकृत करून तुम्ही त्याप्रमाणे लग्नाची तारीख निश्चित करा. आपल्या बजेटच्या हिशेबानुसार सर्व हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि वेडिंग लॉन्सबद्दल नियमावलींनुसार चौकशी करा आणि त्यानुसार सर्व व्यवस्था करायला घ्या. लग्नात येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या सुरक्षेची काळजी तुमची आहे त्यामुळे या स्थळावर व्यवस्थित स्वच्छता आणि साफसफाई आणि सॅनिटायझेशन आहे की नाही याची काळजीही तुम्हीच घ्यायला हवी. शक्यतो कमी नातेवाईकांनाच आमंत्रण द्या. पण  जास्त नातेवाईक असतील तर योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारीही तुमचीच असेल. 

ADVERTISEMENT

कार्यक्रमांची यादी बनवा

Instagram

जर लग्न करायचं ठरवलंच आहे तर सर्व परंपरांनुसार आपल्या लग्नातील काय काय कार्यक्रम करायचे आहेत याची एक यादी बनवून घ्या. काही कार्यक्रम मुलाच्या घरी तर काही कार्यक्रम मुलीच्या घरी करा. हा दिवस एकदाच आयुष्यात येणार असतो त्यामुळे तो साजरा करायलाच हवा. हवं तर तुम्ही संगीत, मेंदी आणि हळदीसारखे कार्यक्रम एकाच छताखाली दोघांनीही व्यवस्थित व्यवस्थापना करून करा. तुम्ही अशा कार्यक्रमांना पॉटलक फंक्शनचे स्वरूपही देऊ शकता. तुम्हाला बाहेरून जास्त काही मागवायचे नसेल तर तुम्ही तुमच्याच नातेवाईकांमध्ये प्रत्येकाने एक पदार्थ तयार करून एकत्रित मस्त कार्यक्रम आखू शकता. 

पाहुण्यांची यादी करणे आवश्यक

हे काम जितकं आवश्यक आहे तितकंच कठीण आहे. आता 100 पाहुणे तुम्ही लग्नात बोलावू शकता. पण भारतीय लग्नांमधील संख्या  पाहता हा आकडा फारच कमी आहे. त्यामुळे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलावायचं हे निश्चित करणे कठीण आहे. त्यामुळे आधीपासूनच तुम्ही याची यादी बनवा. तुम्ही घरच्या माणसांमध्येच लग्न करा आणि बाकीच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉलचा कोड देऊन त्यांना लग्नात समाविष्ट करून घेऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या नातेवाईकांना तुम्ही बोलवा. म्हणजे सगळ्यांना भेटता येईल आणि गर्दीही होणार नाही आणि कोणाची नाराजीही राहणार नाही. 

ADVERTISEMENT

विभागून करा योजना

लग्नात लोक कमी येणार तर कामं पण कमी असतील असं अजिबात समजू नका. लॉकडाऊनमध्ये उलट अधिक कामं वाढली आहेत. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला त्याला झेपेल असं प्रत्येक काम वाटून देण्याची गरज आहे. अगदी सॅनिटायझेशनच्या व्यवस्थेपासून ते कपड्यांच्या खरेदी आणि इतर सगळ्या गोष्टींपर्यंत याची व्यवस्थित योजना आखायला हवी.

लावा थोडासा जुगाड

Instagram

डेकोरेशन आणि आऊटफिट्सवर तुम्ही जास्त खर्च करू नका. तर तुम्ही घराच्या गच्चीवर अथवा गार्डनमध्ये एखादा कार्यक्रम ठेवला असेल तर फुलांच्या माळा, पॉमपॉम्स अथवा फेअरी लाईट्सने याची सजावट करा. साडी नेसताना आपल्या आई अथवा आजीची साडी (तुम्हाला आवड असेल तर) तुम्ही नेसा अर्थात त्याला नवी डिझाईन देऊन तुम्ही नवा प्रयोगही करू शकता. कारण सध्या विंटेज फॅशनचा ट्रेंड चालू आहे.  

ADVERTISEMENT

नववधूकरिता नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स

कॅटरिंग (खाण्याची व्यवस्था)

या महामारीच्या काळात हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण भाग आहे. कारण याची योजना अत्यंत विचारपूर्वक करावी लागेल. तुम्ही या लॉकडाऊनमध्ये लग्न करत आहात हे लक्षात घ्या  आणि त्याप्रमाणे अत्यंत मर्यादित खाण्याचे पदार्थ ठेवा जेणेकरून अन्न फुकट जाणार नाही. वेटर्सपेक्षा सेल्फ सर्व्हिस हा पर्याय निवडा. हवं तर घरच्या घरी होम कुक अथवा हलवाईला याचे कंत्राट द्या. ज्याला पैशाची जास्त गरज आहे. जे अन्न उरेल ते गरजवंत संस्थांना अथवा गरजवंत लोकांना वाटा. 

घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे (Wedding Planning Tips In Marathi)

सॅनिटायझर काऊंटर

इतर सर्व काऊंटरसह आता सुरुवातीलाच सॅनिटायझरचा काऊंटर ठेवणं तुम्हाला आवश्यक आहेत. अशावेळी तुम्ही सॅनिटाईझर वाईप्सही वापरू शकता. MyGlamm चे सॅनिटाईझर वाईप्स तुम्ही वापरू शकता. आधी पाहुण्यांचं स्वागत गुलाबपाण्याने होत असे. पण आता सॅनिटायझर आणि फेसमास्क या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. तसंच लग्नाच्या ठिकाणी किमान 2-3 असे  काऊंटर लावणं गरजेचं आहे. जेणेकरून स्वच्छता आणि काळजी घेतली जाईल. काऊंटवर मास्कही ठेवावेत. एखादा मास्क विसरला अथवा  खराब झाला तर त्याला तो मास्क देता येऊ शकतो. 

ADVERTISEMENT

कोविडच्या काळात लग्न करताय, मग मेकअप आर्टिस्ट ठरवताना अशी घ्या काळजी

गिफ्ट्स

अशा वातावरणात मोठमोठी गिफ्ट्स ने-आण करणं अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे लग्नात गिफ्ट न ठेवणंच योग्य आणि तरीही गिफ्ट्स देण्याची इच्छा असेल तर ते त्यांनी एखाद्या संस्थेला देण्यासाठी G-Pay अथवा Phone Pay च्या सहाय्याने नावासह देण्याची विनंती तुम्ही करू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT