ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
पॉवरबॅंक जवळ नसेल तर या टिप्सने जास्त काळ टिकवा तुमच्या फोनची बॅटरी

पॉवरबॅंक जवळ नसेल तर या टिप्सने जास्त काळ टिकवा तुमच्या फोनची बॅटरी

लॉकडाऊनआधी मुलांना मोबाईल फोनपासून लांब ठेवणारे पालक आता ऑनलाईन शिक्षणासाठी स्वतःच मुलांच्या हातात मोबाईल फोन देऊ लागले आहेत. कोरोनाच्या  काळात मोबाईल फोनची गरज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सारखीच वाढली आहे. या काळात कित्येक महिने एकमेकांपासून दूर असलेल्या लोकांसाठी मोबाईल फोन म्हणजे जणू एखाद्या जीवलग मित्रासारखाच झाला आहे. फक्त बोलण्यासाठीच नाही तर साधा अर्लाम लावण्यासाठी, न्यूज पाहण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आणि अगदी मुलांना शिक्षणाचे धडे देण्यासाठीही आजकाल मोबाईल अत्यंत गरजेचा आहे. अशा वेळी घराबाहेर असताना दिवसभर मोबाईल व्यवस्थित सुरू राहावा यासाठी त्याची बॅटरी टिकवणं म्हणजे एक कसरतीचंच काम झालं आहे. कारण तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही तुमचा फोन पटकन चार्ज करू शकता मात्र बाहेर असताना तुम्हाला फोनची संपत आलेली बॅटरी टिकवूनच ठेवावी लागते. कारण फोन हे संपर्क साधण्याचे महत्वाचे साधन आहे. याबाबत आता काळजीचं काहीच कारण नाही कारण बाहेर असताना जर तुमच्याजवळ पॉवरबॅंक नसेल तर तुम्ही या ट्रिक्स वापरून बॅटरी सेव्ह करू शकता.

ब्लू टुथ आणि लोकेशन सर्व्हिस बंद ठेवा –

फोनमध्ये अनेक फिचर असतात. त्यापैकी ब्लू टुथ आणि लोकेशन सर्व्हिसचा तुम्हाला नक्कीच फायदा  होतो. पण जेव्हा या  फिचर्सचा वापर करत नसाल तेव्हा ते फिचर्स बंद ठेवा ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपणार नाही. ब्राईटनेस कमी करूनही तु्म्ही तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता.

नको असलेले बॅकग्राऊंड अॅप बंद ठेवा –

मोबाईलमध्ये आजकाल सर्व अॅप डाऊनलोड करणं ही काळाची गरजच आहे. कारण कुठल्या अॅपची तुम्हाला कधी गरज लागेल हे सांगता येणार नाही. पण बाहेर असताना जर तुमची बॅटरी लो असेल तर सर्व बॅकग्राऊंड अॅप बंद ठेवा. कारण अॅप्समुळे तुमच्या फोनचं प्रोसेसर सुरू राहतं. सहाजिकच यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी वापरली जाते. प्रोसेसर युझ कमी करून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी सेव्ह करू शकता. 

ADVERTISEMENT

लाईव्ह वॉलपेपर सेट करू नका –

सध्या निरनिराळ्या टाईप्सच्या वॉलपेपर्सचा ट्रेंड आहे. फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर सेट केल्यामुळे तुम्हाला फोन वापरताना फ्रेशनेस मिळू शकतो. मात्र जर तुमची बॅटरी संपत आली असेल आणि तुम्ही फोन लवकर चार्ज करू शकत नसाल तर हे लाईव्ह वॉलपेपर अनसेट करा. कारण यामुळे तुमच्या डिस्प्लेची हाअर फ्रिक्वेंसी अपडेट होते. ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी कमी होऊ शकते. 

डिस्प्ले फिचर बंद ठेवा –

तुमच्या डिस्प्ले फिचरमध्ये अनेक गोष्टी असतात ज्यांचा  तुम्हाला फायदा होतो. तारिख, वेळ, बॅटरी किती उरली आहे, एखादे अपडेट तुम्हाला यातून लगेच समजते. मात्र जर तुम्हाला बाहेर असताना फोनची बॅटरी टिकवायची असेल तर हे फिचर्स काही काळासाठी बंद ठेवा. पावर सेव्हिंग मोड ऑन करून तुम्ही हे सर्व फिचर्स बंद ठेवू शकता. 

तेव्हा त्या या टिप्स फॉलो करा आणि वाचवा तुमच्या फोनची बॅटरी. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

जाणून घ्या स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू कराल (How To Start A Blog In Marathi)

असे स्वच्छ करा फोन कव्हर्स, इअरफोन आणि चार्जिंग कॉड

ADVERTISEMENT

प्रत्येक मुली गॅजेटबाबत करतात या चुका

01 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT