ADVERTISEMENT
home / Natural Care
फेस्टिव्ह सीझनमध्ये साबुदाण्याच्या फेसपॅकने त्वचा करा चमकदार

फेस्टिव्ह सीझनमध्ये साबुदाण्याच्या फेसपॅकने त्वचा करा चमकदार

उपवासाच्या दिवशी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी साबुदाण्याचे  पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे सर्वांचे फेव्हरेट असतीलच. मात्र साबुदाणा तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहे हे  तुम्हाला माहीत आहे का? साबुदाण्यापासून तयार केलेल्या फेसपॅकमुळे तुमची त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेवर नैसर्गिक ग्लोही येतो. तेव्हा यंदा नवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा खिचडी करताना थोड्या साबुदाण्याचा फेसपॅकही तयार करा. त्यासाठी साबुदाणा त्वचेसाठी  का उपयुक्त आहे आणि त्यापासून फेसपॅक कसा तयार करावा हे जरूर जाणून घ्या.

साबुदाणा त्वचेसाठी का आहे उत्तम –

साबुदाण्यामध्ये लोह, कॅलशिअम, तांबे, सेलेनिअम, व्हिटॅमिन बी 6, सोडिअम पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे ते तुमच्या शरीराप्रमाणेच त्वचेसाठी उत्तम ठरते. शिवाय साबुदाण्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असते. ज्याचा तुमच्या सैल त्वचेला घट्ट करण्यासाठी फायदा होऊ शकतो. साबुदाण्याच्या फेसपॅकमुळे त्वचेचं रक्ताभिसरण सुधारतं , ज्यामुळे त्वचेला पुरेसं ऑक्सिजन मिळतं आणि त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते. ज्यामुळे घरच्या घरी तयार केलेला साबुदाण्याचा फेसपॅक तुमच्या स्किनकेअर मध्ये नक्कीच असायला हवा. कारण हा उपाय स्वस्त आणि जास्त फायदेशीर आहे. यासाठीच जाणून घ्या साबुदाण्यापासून फेसपॅक कसा तयार करावा. 

असा तयार करा साबुदाणा होममेड फेसपॅक

साहित्य – 

ADVERTISEMENT
  • एक चमचा साबुदाणा
  • एक ते दोन चमचे लिंबाचा रस
  • एक चमचा ब्राऊन शुगर
  • एक चमचा मुलतानी माती
  • दोन चमचे गुलाबपाणी


फेसपॅक तयार करण्याची पद्धत –

  • एका पॅनमध्ये साबुदाणा आणि लिंबाचा रस ओता आणि ती पॅन गॅसवर ठेवा
  • मंद आचेवर मिश्रण मऊ होईपर्यंत गरम करा
  • थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • ब्राऊन शुगर मिसळून या मिश्रणाची एक जाडसर पेस्ट तयार करा
  • या पेस्टमध्ये मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळून एक छान फेसपॅक तयार करा
  • चेहरा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या
  • चेहरा आणि मानेवर एकसमान पद्धतीने हा फेसपॅक लावा
  • वीस ते तीस मिनीटांनी पाण्याने चेहरा धुवून टाका
  • चेहरा धुण्यासाठी कोमट अथवा साध्या पाण्याचा वापर करा
  • चेहरा स्वच्छ पुसा आणि चेहऱ्यावर एखादं चांगलं मॉईस्चराईझर लावा

साबुदाणा फेसपॅकसाठी लागणारं सर्व  साहित्य तुम्हाला घरीच उपलब्ध होऊ शकतं शिवाय हा फेसपॅक तयार करणं हे अतिशय सोपं काम आहे. त्यामुळे यंदा सणासुदीला सुंदर दिसण्यासाठी फार काळ काढण्याची तुम्हाला नक्कीच गरज लागणार नाही.

त्वचेची निगा राखण्यासाठी हा साबुदाण्याचा फेसपॅक उत्तम आहे कारण जितकं तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिक घटकांचा वापर करून काळजी घ्याल तितकीच तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर दिसेल. मात्र फेस्टिव्ह सिझन म्हटला की थोडं आकर्षक दिसणं आणि नटणं, थटणं  हे आलंच. यासाठी या सणासुदीला मायग्लॅमचे ब्युटी प्रॉडक्ट वापरा ज्यामुळे तुम्ही नक्कीच ग्लॅम दिसाल. उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मायग्लॅमच्या खास ऑफरचा नक्कीच फायदा करून घ्या. तेव्हा वाट कसली पाहताय आताच मायग्लॅमचे प्रॉडक्ट ऑर्डर करा सुरूवात करा या खास लिपस्टिकपासून

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

ADVERTISEMENT

आकर्षक दिसण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स

18 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT