महात्मा गांधी यांच्याबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

महात्मा गांधी यांच्याबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला शांती आणि अंहिसेची शिकवण दिली. गांधीजीचे विचार आणि तत्वज्ञान आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. खरंतर आजकाल भांडण-तंट्याशिवाय माणसाचे कोणतेच काम पूर्ण होत नाही. मात्र एक काळ असा होता जेव्हा गांधीजींनी केवळ शांती आणि अंहिसेच्या मार्गाने इंग्रजांनाही भारत सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. गांधीजीच्या विचार आणि शिकवणीत खूप मोठी ताकद आहे. महात्मा गांधीच्या जंयती निमित्त आज आपण त्यांच्या आयुष्यातील अशा काही  गोष्टी जाणून घेऊ या ज्या प्रत्येक पिढीला माहीत असायलाच हव्या.

गांधीजींच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण गोष्टी -

 • गांधीजींना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी गांधीजीचे नाव पाचवेळा नॉमिनेट झाले होते. मात्र त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. 
 • गांधीजींबाबत एक गोष्ट ऐकून तर तुम्हाला फारच आश्चर्य वाढेल की महात्मा गांधी त्यांच्या जीवनात कधीच अमेरिकेत गेले  नव्हते आणि त्यांनी विमानातून प्रवासही केला नाही. 
 • गांधीजी लहानपणापासूनच अतिशय शांत आणि लाजाळू स्वभावाचे  होते. वयाच्या दहाव्या वर्षानंतर त्यांनी अनेक शाळा बदलल्या. एवढंच नाही तर ते कधी कधी शाळेतून पळूनही जात असत.
 • एकदा ट्रेन सुरू झाल्यावर त्यांची चप्पल खाली पडली तर त्यांनी त्यांची दुसरी चप्पलही खाली फेकून दिली होती. याचं कारण त्या दोन्ही चप्पला कुणाच्यातरी कामी येतील असं त्यांना वाटलं होतं.
 • गांधीजींनी लंडनच्या विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर ते भारतात येऊन वकिलीचा अभ्यास करू लागले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. पहिली केस आत्मविश्वास कमी असल्यामुळे ते हरले होते
 • गांधीजीचे लग्न त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षीच झाले होते. त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी या त्यांच्यापेक्षा एक वर्षांने मोठ्या होत्या. 
 • गांधीजींच्या लग्नाच्या विधींना एक वर्ष लागलं होतं ज्यामुळे ते एक वर्ष शाळेत जाऊ शकले नाही.
 • गांधीजींच्या आईचे नाव पुतलीबाई असं होतं. तर वडीलांचे नाव करमचंद. पुतलीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. गांधीजी या दोघांचे शेवटचे अपत्य होते.
 • गांधीजी भारतापेक्षा विदेशात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जास्त ओळखले जातात. देशभरात त्यांच्या नावाचे एकूण १०१ रस्ते आहे. भारतात यापैकी 53 असून परदेशात 48 आहेत. 
 • गांधीजींचे दात खोटे होते. ते त्यांची कवळी कपड्यांमध्ये ठेवत असत. फक्त जेवणासाठीच ते त्याचा वापर करत असत.
 • अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स गांधीजींचे खूप मोठे फॅन होते. गांधीजींवर असलेल्या प्रेमापोटी ते गोल फ्रेमचा चष्मा वापरत असत.
 • भारत स्वतंत्र झाल्यावर काही पत्रकारांनी गांधीजींना इंग्रजीतून प्रश्न विचारले होते तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितले होते आता माझा देश स्वतंत्र झाला आहे तेव्हा कृपया राष्ट्रभाषेत प्रश्न विचारा. 
 • महात्मा गांधी वेळेबाबत खूपच शिस्तप्रिय होते. त्यांना उशीर मुळीच चालत नसे. त्यांच्या हत्येच्या आधीदेखील त्यांना ते सभेसाठी उशीरा आले याबाबत चिंतेत होते.
 • दिल्लीतील बिडला भवन येथे त्यांची 30 जानेवारी 1948 साली सायंकाळी गोळी मारून हत्या करण्यात आली होती. महात्मा गांधीची अंतिम यात्रा आठ किलोमीटर लांब होती. आतापर्यंतची ही सर्वात मोठी अंतिम यात्रा आहे. गांधीजींना शेवटचा निरोप देण्यासाठी दहा लोक एकाजागी जमा झाले होते.
 • ज्या गाडीतून महात्मा गांधींना 1948 साली अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले. त्याच गाडीने नंतर 1997 साली मदर तेरेसा यांना नेण्यात आले होते.