ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
#WFH मधील आळशीपणा त्वचेसाठी त्रासदायक, जाणून घ्या कसा

#WFH मधील आळशीपणा त्वचेसाठी त्रासदायक, जाणून घ्या कसा

घरात राहून काम करणे हे अनेकांना आवडते. गेल्या काही दिवसांपासून घरातून काम करताना आपल्या अनेक सवयी बदलून गेल्या आहेत. दिवसभर काम आणि घर असे सगळे मॅनेज करताना अनेकांच्या तारेवरची कसरत होत आहे. तर काही जणांना या #WFH ने आळशी करुन टाकले आहे. एका जागी तासनतास बसताना कोणतीही काळजी घेतली जात नाही,असेही अनेकांच्या बाबतीत होत आहे. केस न विंचरणे, कोणतेही स्किनकेअर प्रोडक्ट न वापरणे असे सगळे सर्रास सुरु आहे. घरात असतानाही अनेकांना त्वचेच्या समस्या भेडसावत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का?तुमच्या या छोट्या छोट्या चुकाच तुमची त्वचा खराब करण्यास कारणीभूत आहेत. जाणून घेऊया कारण आणि उपाय

तुमच्याही स्तनांजवळ येतात पिंपल्स ही आहेत कारणं

या कारणामुळे #WFH त्वचेसाठी पडत आहे भारी

वर्क फ्रॉम होम करताना

Instagram

ADVERTISEMENT
  • हल्ली काम करताना एका जागेवरुन उठण्याचा अनेकांना कंटाळा आहे. त्यामुळे लॅपटॉप समोर घेऊनच आपण आपला नाश्ता- जेवण करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी एक हात ताटात आणि एक हात लॅपटॉपवर सुरुच असतो. अन्नाचे काही कण त्यामुळे लॅपटॉपमध्ये अडकतात. जे पुन्हा बोटांवरुन तुमच्या त्वचेवर इतरत्र पसरतात. त्याचा परिणाम तुम्हाला पिंपल्स येतात. 
  • फोन, लॅपटॉप असे सगळे गॅजेट तुम्ही स्वच्छ करुन वापरत नसाल तर त्याचाही त्रास तुम्हाला होण्याचीव शक्यता असते. मोबाईल सतत आपल्या जवळ असतो. त्याची स्क्रिन जर स्वच्छ नसेल तर त्यामुळेही पिंपल्स येतात. 
  • एका जागी तासनतास बसताना स्किनकेअर असते हे आपण विसरुन जातो. घरात कुठे आली धूळ?आणि घाण असे म्हणत अनेक जण फेसवॉश करणे, त्वचेची काळजी घेणे सोडून दिले आहे. पण हीच तुमची मोठी चूक आहे कारण घरात राहूनही तुम्हाला त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण ज्या पद्धतीने तुमच्या पोटाला भूक भागवण्यासाठी योग्य खुराक लागते तसे त्वचेलाही आवश्यक आहे. त्वचेसाठी तुम्ही फेसवॉश, मॉश्चरायझरचा उपयोग करायलाच हवा त्यामुळे त्वचेतील मॉश्चरायझर टिकून राहते.
  •  डोळे हा चेहऱ्यावरील महत्वाचा आणि तुमच्या चेहऱ्याला आकर्षक करणारा घटक आहे. जर तुम्ही जास्त काळासाठी काम करत असाल तर तुमच्या डोळ्यांवर  ताण येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या वाढतात. 
    कामाचा ताण हा देखील तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहे  त्यामुळे तुम्ही कामातून ब्रेक घेऊन थोडा ताण कमी करायचा प्रयत्न करा. 

परफेक्ट मेनीक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब

अशी घ्या त्वचेची काळजी

त्वचेची काळजी

Instagram

 त्वचेची काळजी घेणे म्हणजे फार फॅन्सी काम नाही. तुम्ही अगदी आरामात त्वचेची काळजी घेऊ शकता. 

ADVERTISEMENT
  1. सकाळी उठल्यानंतर आठवणीने एकदा तरी फेसवॉश करा. 
  2. त्यानंतर जर तुम्ही आंघोळ करणार असाल तर आंघोळीनंतर एखादे फेस क्रिम किंवा मॉश्चरायझर लावायला विसरु नका. 
  3. फेसऑईल चेहऱ्याला लावणार असाल तर ते काही काळानंतर चेहऱ्याला तेलकट करते. त्यामुळे तुम्ही चेहऱ्याला काही वेळानंतर टिपत राहा. एक स्वच्छ रुमाल किंवा टॉवेल आपल्यासोबत कायम ठेवा. 
  4. प्रत्येकाला साधारण 8 ते 9 तासांची ड्युटी असते. त्यामध्ये तुम्ही दोनवेळा तरी तुमच्या स्किनकेअरसाठी उठा.
  5.  योग्यवेळी फेसवॉश आणि ते नाही जमले तर तुम्ही पाण्याने चेहरा धुवू शकता. 

आता #WFH करत असताना थोडी काळजी घ्या अन्यथा तुम्हाला त्वचेच्या समस्या अधिक जाणवू लागतील.

या रंगाचे कपडे उजळवतात तुमचा स्किनटोन

22 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT