ब्रश की हाताची बोटे, चेहऱ्यावर फेसपॅक लावण्यासाठी काय आहे उत्तम

ब्रश की हाताची बोटे, चेहऱ्यावर फेसपॅक लावण्यासाठी काय आहे उत्तम

चेहऱ्यावर एखादा  फेसपॅक लावण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत. एक म्हणजे सिलिकॉन ब्रश वापरणं, दुसरं म्हणजे सिंथेटिक केस असलेला ब्रश वापरणं आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे सरळ हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर फेसपॅक लावणं. फेसपॅक लावण्यासाठी हाताच्या बोटांचा वापर करणं हे सोपं, स्वस्त जरी असलं तरी ते तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित नक्कीच नाही. कारण हातावर जीवजंतू असतील तर ते केवळ तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतात असं नाही तर ते फेसपॅकमधून त्वचेत खोलवर जाण्याची शक्यता असते. काहीवेळा यासाठी सिंथेटिक केस असलेला ब्रश वापरणं हा परफेक्ट पर्याय आहे असं तुम्हाला वाटू शकतं. पण या ब्रशचे केस जर व्यवस्थित स्वच्छ नाही केले तर त्यात उडकून बसलेल्या जुन्या प्रॉडक्टच्या  कणांमधूनही बॅक्टेरिआ पसरू शकतात. मग उरलेला एकच पर्याय आहे तो म्हणजे सिलिकॉन ब्रशने फेसपॅक लावणे. हा पर्याय सर्वात बेस्ट आहे याचं कारण असं की त्यासा केसंही नसतात आणि ते बोटांपेक्षा जास्त स्वच्छ असतो. सिलिकॉन ब्रश यासाठीच एक बेस्ट ब्युटी टूल म्हणून प्रसिद्ध आहेत. जाणून घ्या अधिक माहिती...

Shutterstock

सिलिकॉन ब्रश कसे वापरावे -

तुम्ही यापूर्वी कधी फेसपॅक लावण्यासाठी स्पॅट्युलाचा वापर केला असेल तर सिलिकॉन ब्रश अगदी तसाच असतो. हा ब्रश वापरणं अगदी सोयीचं आहे कारण तो वजनाला हलका असतो. त्यावर असलेला वरचा भाग हा सिलिकॉनचा असल्यामुळे वापरण्यास त्रास होत नाही. शिवाय यामुळे तुमचे प्रॉडक्ट वाया न जाता  त्वचेवर फेसपॅक एकसमान लागतो. बऱ्याचदा हाताने फेसपॅक लावतानाही काही प्रमाणात प्रॉडक्ट एकाच जागी जास्त लागण्याची शक्यता असते. कधी कधी ते तुमच्या नखातच अडकून बसते. त्याचप्रमाणे सिथेंटिक ब्रशच्या केसांमध्ये फेसपॅक अडकून बसल्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाया  जातो. शिवाय तुम्हाला तुमची हात, नखं, सिंथेटिक ब्रशचे केस स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याउलट सिलिकॉन ब्रश तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने बेस्ट ठरतात. तुम्ही साध्या पाण्याने ते धुवू शकता आणि ते स्वच्छ करण्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत. तुम्ही टॉवेलने ते स्वच्छ पुसू शकता ज्यामुळे ते बराच वेळ ओलेही राहत नाहीत. अशा पद्धतीने सिलिकॉन ब्रश वापरण्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका कमी जाणवतो. 

Beauty

Cala Soft Silicone multicolour Facial Brush

INR 740 AT Cala

जर तुम्हाला नखं वाढवण्याची आवड असेल, जास्त कष्ट घेण्याची तयारी नसेल तर फेसपॅक लावण्यासाठी सिथेंटिक ब्रश अथवा बोटांचा वापर करण्याऐवजी सिलिकॉन ब्रशचा वापर करा. कारण ते स्वस्त आहेत, त्यांना स्वच्छ करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत शिवाय ते वापरणं खूप सोपं आहे. बऱ्याच फेस प्रॉडक्टसोबत असे स्पॅट्युला फ्री मिळतात त्याचाही वापर तुम्ही फेसपॅक लावण्यासाठी करू शकता. शिवाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलिकॉन ब्रश ऑनलाईन खरेदीदेखील करू शकता.  तुमचे ब्युटी टू्ल्स कोणतेही असोत ते निर्जंतूक करण्यासाठी मायग्लॅमचे वाईप आऊट प्रॉडक्ट नक्की वापरा.

Beauty

WIPEOUT SANITIZING SPRAY

INR 199 AT MyGlamm

Beauty

Flat Foundation Brush

INR 1,150 AT MyGlamm