सोनाक्षी सिन्हाचे हे मेकअप लुक तुम्हीही करा ट्राय या दिवाळीसाठी

सोनाक्षी सिन्हाचे हे मेकअप लुक तुम्हीही करा ट्राय या दिवाळीसाठी

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी हा असा सण आहे जो आपोआप घरात उत्साह आणि अप्रतिम वातावरण निर्माण करतो. नवे कपडे, नवी फॅशन,  नवा साज हे सर्व करण्यसाठी एक वेगळाच उत्साह संचारतो. दिवाळीसाठी आपण नेहमीच पारंपरिक कपडे घालण्याचा प्रयत्न  करत असतो.  कारण इतर वेळी नक्कीच आपण वेगवेगळे आधुनिक कपडे घातले तरीही दिवाळीला पारंपरिक कपडे घालून त्यावर मस्त मेकअप करून मिरवण्याचा साजच काही वेगळा आहे.  या दिवाळीला नक्की कसा मेकअप लुक आपण ट्राय करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्ही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हे लुक या सणासाठी नक्कीच करून पाहू शकता. या दिवाळीला तुम्हाला जर काही वेगळा लुक हवा असेल तर तुम्हाला आम्ही इथे सोनाक्षी सिन्हाचे तीन लुक देत आहोत.  त्यापैकी कोणताही लुक तुम्हाला या दिवाळीसाठी करता येईल.

या फेस्टिव्ह सीझनसाठी आयशॅडोचा गोल्डन रंग आहे पुरेसा, असा करा वापर

मॅट लिपस्टिक लुक

Beauty

MyGlamm LIT Liquid Matte Lipstick

INR 395 AT MyGlamm

दिवाळीसाठी ब्राईट रंगाचे आऊटफिट तुम्ही जर घालणार असाल तर तुम्ही गडद रंगाचा मेकअप करायला हवा. सोनाक्षी सिन्हाचा हा मेकअप तुम्ही पाहिलात तर तुम्हाला यामध्ये शायनिंग लिपस्टिकऐवजी मॅट लिपस्टिक लावलेली दिसते. मॅट लिपस्टिक सणासुदीला एक वेगळाच लुक मिळवून देते. मुळात कोणाचंही लक्ष वेधून घेते. सध्या मॅट लिपस्टिकचा ट्रेंडही चालू आहे. त्यामुळे तुम्ही अगदी लाईट MyGlamm आयशॅडोसह काळे आयलायनर वापरा आणि तुमच्या ड्रेसनुसार गडद मॅट लिपस्टिकचा वापर करा. हा लुक तुम्हाला अधिक आकर्षक दाखविण्यास मदत करतो. तसंच तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वासही जागवतो. दिवाळीला जर कुठे बाहेर जाणार असाल तर नक्की हा लुक तुम्ही करून पाहा.

फेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim

शिमरी आय मेकअप

Beauty

Manish Malhotra 9 in 1 Eyeshadow Palette - Enchanté

INR 1,850 AT MyGlamm

हा मेकअप फक्त पार्टीला करता येतो असा काही जणींचा समज आहे. मात्र असं अजिबात नाही. या सणासुदीला तुम्ही ब्राईट रंगाच्या आऊटफिटसह शिमरी आय मेकअप करून पाहा. सोनाक्षी सिन्हाच्या या शिमरी लुकमध्ये तिने परफेक्ट फाऊंडेशन बेस लावला आहे. त्यानंतर तिने निळ्या रंगाचा शिमरी मेकअप केला आहे. वेगळ्या लुकसाठी तुम्ही हा मेकअप नक्की करून पाहू शकता. तुम्हाला निळा रंग आवडत नसेल तर तुमच्या ड्रेसच्या रंगाप्रमाणे तुम्ही रंगाची निवड करू शकता. फक्त अगदी भडक शिमरी मेकअप करू नका. अन्यथा ते दिसायला चांगले दिसणार नाही. अगदी सोबर आणि सुंदर शिमरी मेकअप करून करा तुमची दिवाळी साजरी.

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

विंग लायनर लुक

सोनाक्षी सिन्हा बऱ्याचदा विंग लायनर लुकमध्ये दिसते. सोनाक्षी नेहमी डोळ्यांच्या किनाऱ्यापासून विंग आयलायनर करते. सोनाक्षी सिन्हाप्रमाणे या दिवाळीला तुम्ही विंग्ड आयलायनरला लुक करू शकता. परफेक्ट फाऊंडेशन बेस लावा. त्यावर न्यूड आयशॅडो लावा आणि मग विंग आयलायनर लावा. तुमच्या आवडीची लिपस्टिक त्यावर लावा आणि अप्रतिम लुक तयार. पण सणासुदीला सहसा गडद लिपस्टिकचा वापर करा. न्यूड शेड ऑफिस लुक अथवा अन्य लुकसाठी चांगली दिसते. आकर्षक दिसण्यासाठी गडद लिपस्टिक अधिक चांगली.

Beauty

CLEAN BEAUTY CHAMOMILE LIQUID EYELINER

INR 850 AT MyGlamm

हे तिनही लुक तुम्ही या दिवाळीला करून पाहू शकता. तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर अथवा कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करणार असाल तर या वर्षी असा मेकअप करून व्हा तयार.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक