आपल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेची भावपूर्ण पोस्ट

आपल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेची भावपूर्ण पोस्ट

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असते. सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या केल्यापासून तर अंकिताने अगदीच वाईट दिवस बघितले आहेत. पण त्याची सर्वात जास्त झळ बसली ती अंकिताचा होणारा नवरा विकी जैनला. विकी आणि अंकिता गेले काही वर्ष एकत्र आहेत आणि लवकरच दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.  विकी हा उद्योजक असून त्याने अंकिताला नेहमीच साथ दिली आहे आणि सुशांत गेल्यानंतरही विकी अंकिताच्या मागे ठामपणाने उभा राहिला आणि त्याने तिच्यावरील आपले प्रेम सिद्ध केले आहे. आता अंकिताने  विकीबरोबर एक फोटो पोस्ट करत त्याच्याविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

नेहमी त्वचा सुंदर दिसण्यासाठी वापरा अभिनेत्री राधिका आपटेचा ब्युटी फंडा

तुझ्यासाठीच्या भावना शब्दात मांडता येणं कठीण - अंकिता

अंकिताने खूपच भावनिक होत विकीसाठीचे प्रेम व्यक्त केले आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विकीसहित आपला फोटो पोस्ट करत विकीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. अंकिता आणि विकी गेले काही वर्ष एकमेकांबरोबर आहेत आणि अंकिताने आपलं विकीसह नातं लपवून ठेवलेलं नाही. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र अचानक सुशांतच्या जाण्याने अंकिताच्याही आयुष्यात एक वादळच आलं. पण त्याही परिस्थितीत विकीने अंकिताला साथ दिली. या सगळ्यातून बाहेर येते आता अंकिताने विकीविषयी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. ‘तुझ्यासाठी माझ्या मनात काय भावना आहेत हे मी शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. आमच्या दोघांना मी एकत्र पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच विचार येतो आणि तो म्हणजे देवाचे आभार. माझ्या आयुष्यात मित्र, जोडीदार आणि माझा जिवलगा म्हणून तुला घेऊन आल्याबद्दल आभार. नेहमी माझ्याबरोबर राहिल्याबद्दल तुझे आभार. माझ्या सगळ्या समस्या तू तुझ्या मानल्याबद्दल आणि नेहमी मला गरज असताना तू माझ्यासह कायम राहिल्याबद्दल आभार. कायम मला पाठिंबा दिल्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. मला आणि माझ्या परिस्थितीला समजून घेतल्याबद्दल विशेष धन्यवाद. आणि मला तुझी माफीही मागायची आहे कारण तुला माझ्यामुळे जे सहन करावं लागलं, झळ बसली ती तुला बसावी हे तुझ्या वाट्याला कधीच येणं योग्य नव्हतं. तुझ्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. (I Love you)’ अशा भावनापूर्ण शब्दामध्ये अंकिताने विकीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

काजल अग्रवालने शेअर केले लग्नातले काही खास क्षण

मित्रमैत्रिणींनी अंकिताला दिले लव्ह इमोजी

अंकिताला या इंडस्ट्रीमध्ये अनेक मित्रमैत्रिणी आहेत आणि नेहमीच अंकिताबरोबर सगळे ठाम उभे राहिले आहेत. तिच्या या भावनिक पोस्टनंतर अंकिताच्या अनेक मित्रमैत्रिणींनी तिला लव्ह इमोजी दिले आहेत. अंकितासाठी गेले काही महिने खूपच चढउताराचे होते. मात्र त्यानंतरही तिला अनेकांनी पाठिंबा दिला. इतकंच नाही तर अंकिताचा होणारा जोडीदार विकी जैन नेहमीच तिच्याबरोबर उभा राहिला. विश्वास असला की कोणतंही नातं निभावता येतं याचा एक पायंडा घालून देत या दोघांनी आपल्या भक्कम प्रेमाचा आदर्शच जणू काही घालून दिला आहे. अंकिता आणि विकीला चाहते मनापासून शुभेच्छा देत असून आता तरी अंकिताच्या आयुष्यात आनंद यावा असंही म्हणत आहेत. अंकिता आणि विकीच्या लग्नाकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.  लवकरच या दोघांच्या लग्नाची घोषणा होईल असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. 

सोनम कपूरने हॅलोविनसाठी केला मर्लिन मुनरो लुक, सोशल मीडियावर झाली ट्रोल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक