ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
हिवाळ्यात करा केळ्याचे फेशियल आणि करा कोरडेपणा दूर

हिवाळ्यात करा केळ्याचे फेशियल आणि करा कोरडेपणा दूर

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते का? अनेक उपाय करूनही तुम्हाला या समस्यांपासून जर सुटका मिळत नसेल तर तुम्ही केळ्याच्या फेशिअलने या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.  केळ्याचे फेशियल तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणाने करू शकता आणि या नैसर्गिक घटकाच्या मदतीने तुम्ही 10 मिनिट्समध्ये फेशिअल करून आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता. हिवाळ्यात केळ्याच्या फेशिअलचा खूप उपयोग होतो. त्वचा कोरडी आणि निस्तेज होत असेल तर केळ्याचे फेशिअल उत्तम. यामध्ये पोटॅशियम आणि विटामिन ए असते जे त्वचेला अधिक निरोगी आणि मॉईस्चराईज ठेवण्यास मदत करते. तसंच तुम्हाला त्वचा अधिक कोरडी, एजिंग झाल्यासारखी अथवा निस्तेज वाटत असेल तर केळ्याच्या फेशिअलचा फायदा तुम्ही करून घ्यायला हवा. आम्ही तुम्हाला कसा वापर करायचा ते या आर्टिकलमधून सांगत आहोत. केळ्याचे फेशिअल करण्यापूर्वी तुम्ही त्वचा क्लिंन्झरने स्वच्छ करून घ्या आणि नंतर चेहरा स्वच्छ करून आम्ही सांगितल्याप्रमाणे फेशिअल करा. 

केळ्याचा फेस स्क्रब

shutterstock

केळ्याचा हा फेसस्क्रब त्वचेवर असणारी सर्व घाण आणि धूळ, प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. तसंच डेड स्किन लेअर्स त्वचा निस्तेज करते आणि केळ्याचा फेसस्क्रब नैसर्गिक चमकम बनविण्यासाठी चांगला ठरतो आणि तुम्हाला अधिक चमक चेहऱ्यावर मिळवून देतो. केळ्याच्या सालामध्ये विटामिन बी 6 आणि बी 12, पोटॅशियम असते आणि याचा वापर स्क्रब्रिंगप्रमाणे चेहऱ्यावर आलेले मुरूमं, पिंपल्स आणि डाग काढून टाकण्यासाठीही करता येतो. 

ADVERTISEMENT

आवश्यक साहित्य 

  • 1 मोठा चमचा दुधाची पावडर
  • 1 मोठा चमचा रवा 
  • अर्धा  चमचा लिंबाचा रस 
  • 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
  • केळ्याचे साल 

बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये सर्व साहित्य एकत्र करून नीट मिक्स करा 
  • केळ्याचे साल कापून त्यावर हे स्क्रब मिक्स लावा 
  • या सालाने चेहरा स्क्रब करायला सुरूवात करा 
  • काही मिनिट्समध्येच एका सर्क्युलर मोशनमध्ये हळूहळू चेहऱ्यावर स्क्रब करा 
  • नंतर काही वेळ तसंच ठेवा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवा 

ब्युटी ट्रिटमेंटमध्ये असा करा गोल्डचा वापर, जाणून घ्या टिप्स

केळ्याचे मसाज क्रिम

दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही चेहऱ्याला चांगला मसाज करण्याची आवश्यकता आहे. फेस मसाज केल्याने त्वचेतील ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत मिळते आणि त्वचेवर चमक येते. 

ADVERTISEMENT

आवश्यक साहित्य 

  • अर्धे केळं 
  • 1 चमचा मध 
  • 2 चमचे लिंबाचा रस 
  • पाव लहान चमचा हळद पावडर 
  • दीड चमचा दही

बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

  • एका ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट करून घ्या 
  • ही पेस्ट घेऊन मसाज क्रिमप्रमाणे चेहऱ्याला लावा 
  • त्यानंतर चेहऱ्यावर सर्क्युलेशन मोशनमध्ये मसाज करा 
  • काही वेळानंतर क्रिम मुरू द्या आणि मग चेहरा धुवा 

लक्ष्मीपूजनासाठी हवा असेल इन्स्टंट ग्लो तर करा हे फेशिअल

केळ्याचा फेसपॅक

ADVERTISEMENT

Shutterstock

सर्वात शेवटची स्टेप म्हणजे केळ्याचा फेसपॅक. तुम्हाला त्वचा हिवाळ्यात कोरडी पडण्याचा आणि निस्तेज दिसण्याचा त्रास असेल आणि पिंपल्स येत असतील तर त्यावर हा उत्तम उपाय आहे. 

आवश्यक साहित्य 

  • ऑरेंज पील पावडर/बेसन/ चंदन पावडर – प्रत्येक 1 चमचा 
  • अर्धे केळं 
  • 1 चमचा मध
  • 2 चमचे लिंबाचा रस 
  • पाव लहान चमचा हळद पावडर 
  • दीड चमचा दही

बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • एका ब्लेंडरमध्ये केळं, मध, लिंबाचा रस, हळद पावडर आणि दही मिसळून पेस्ट करून घ्या
  • एका बाऊलमध्ये ही पेस्ट काढा आणि त्यात चंदन पावडर, बेसन अथवा ऑरेंज पील पावडर घाला आणि मिक्स करा 
    ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा 
  • साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग साध्या पाण्याने चेहरा धुवा 

ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

केळ्याचे फेशिअल करण्याचे फायदे

  • हे फेशिअल हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करते आणि त्वचा मॉईस्चराईज करते. तसंच बराच काळ हा मऊपणा टिकवून ठेवते 
  • केळ्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. केळ्याचे फेशिअल केल्याने तुम्हाला पिंपल्स असतील तर त्यापासून सुटका मिळते 
  • यामध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असल्याने एजिंग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच सुरकुत्या येत नाहीत आणि फाईन लाईन्सची समस्याही कमी होते

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT