ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
घरात लावा स्नेक प्लांट, होतील अनेक फायदे - जाणून घ्या

घरात लावा स्नेक प्लांट, होतील अनेक फायदे – जाणून घ्या

घरामध्ये अनेक असे इनडोअर प्लांट्स लावले जातात ते फेंगशुई अथवा अन्य सजावटीच्या दृष्टीने घरामध्ये लावण्यात येतात. काही प्लांट्स असे आहेत जे आरोग्याच्या दृष्टीने लावण्यात येतात. यापैकीच एक आहे स्नेक प्लांट. हे त्या रोपांपैकी एक आहे जे घरामध्ये दिसायला अधिक आकर्षक दिसते आणि हवा सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो. स्नेक प्लांट घरामध्ये लावण्याचे बरेच फायदे  आहेत. नक्की याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.  

स्नेक प्लांट म्हणजे काय?

canva

स्नेक एक सामान्य हाऊसप्लांट आहे ज्याला सन्सेविया ट्रफिसिआटादेखील म्हटलं जातं. हे मुख्यत्वे आशिया आणि आफ्रिकन रोप आहे. यावर नेहमी गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची पाने येतात. याची पाने ही वरच्या दिशेने वाढतात आणि तलवारीनुसारच दिसतात.  तसंच हे दिसायला बऱ्याचदा आर्टिफिशियल झाडाप्रमाणे दिसते. स्नेक प्लांटचा उपयोग बरेचदा सजावटीसाठी करण्यात येतो.  कारण दिसायला हे खूपच सुंदर असते.  तसंचा याचा रंग अधिक आकर्षक असतो.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे  याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही. पण या झाडांची पाने थोडी विषारीही असतात त्यामुळे मुलांना यापासून दूर ठेवावे लागते. त्याचा काय फायदा असतो ते  पाहूया.  

ADVERTISEMENT

स्नेक प्लांट रात्रभर हवा फिल्टर करून घेते

काही अन्य घरगुती उत्पादनाप्रमाणे स्नेक प्लांट घराच्या आतील हवा अर्थात इनडोअर एअर फिल्टर करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे सुंदर दिसणाऱ्या झाडामध्ये एक विशिष्ट गुण आहे. रात्री झाडातून येणारा कार्बन डायऑक्साईडचा बदल हे ऑक्सिजनमध्ये करते. त्यामुळे बेडरूममध्ये सजावट करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. हवेत स्वच्छता आणि ऑक्सिजन आणण्यासाठी याचा उपयोग होतो. 

विषारी प्रदूषण हटविण्यासाठी उपयुक्त

Canva

स्नेक प्लांट विषारी घटक अर्थात विषारी प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. याचे योगदान लहान असले तरीही स्नेक प्लांट कार्बन डायऑक्साईड, फॉर्म्युलाडिहाईड, जायलिन आणि टोल्युनिसहित कॅन्सर निर्माण करणाऱ्या विषारी प्रदूषकांना हटविण्याचे काम करते. हानिकारक विषारी पदार्थ शोषून ते काढून टाकण्याची क्षमता यामध्ये आहे. स्नेक प्लांट हवेतील अलर्जीविरोधातील एक प्रभावी कार्य करणारे रोप आहे. 

ADVERTISEMENT

झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

जास्त काळजी घ्यावी लागत नाही

स्नेक प्लांट घरात ठेवल्यानंतर इतर रोपांप्रमाणे याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. याच कारणामुळे घरामध्ये याचा जास्त वापर करण्यात येतो. स्नेक प्लांट घरात लावल्यानंतर त्याची जास्त काळजी करावी लागत नाही. घराच्या आता आणि बाहेर दोन्ही ठिकाणी कोरड्या जागी हे झाड व्यवस्थित जगते आणि वाढते. तुम्हाला घराच्या आत हे झाड लावायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. याला सतत पाणी घालावे लागत नाही. सतत उन्हात ठेऊ नका. 

घरच्या झाडांची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants In Marathi)

जास्त पाणी देणे नुकसानकारक

या रोपाला जास्त पाणी घालणे नुकसानकारक आहे. हे झाड तुम्हाला जगवायचे असेल तर त्यासाठी सुक्या ठिकाणी हे झाड तुम्ही लावाे.  जास्त पाणी याचे मूळ खराब करतात. तसंच स्नेक प्लांटमध्ये तेव्हाच पाणी घाला जेव्हा  याची माती पूर्ण सुकते. अन्यथा हे झाड खराब होते. 

ADVERTISEMENT

घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)

उन्हाखाली ठेवणे योग्य नाही

स्नेक प्लांटवर प्रत्यक्ष ऊन येईल असे ठेऊ नका. यासाठी अप्रत्यक्ष ऊन चांगले आहे. हे झाड तुम्ही घरात आणि बाहेर कुठेही लाऊ शकता. याला कुठे ठेवायचे याचा जास्त विचार करण्याची गरज भासत नाही. पण घरात बेडरूमध्ये ठेवणं जास्त योग्य कारण हे हवा फिल्टर करते आणि ऑक्सिजन देण्यास मदत करते. लिव्हिंग रूमची शोभा वाढविण्यासाठीही याचा फायदा होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT