सुंदर आणि नितळ त्वचा हे प्रत्येकीचं स्वप्न असतं मात्र त्वचेच्या अनेक समस्यांमुळे चेहऱ्यावर खड्डे निर्माण होतात. चेहऱ्यावर खड्डे निर्माण होण्यामागे त्वचेचे ओपन पोअर्स, पिंपल्स अथवा इतर अनेक त्वचेच्या समस्या कारणीभूत असू शकतात. मात्र या समस्येवर योग्य वेळीच उपाय करायला हवेत नाहीत ही समस्या अधिक दिसू लागते. एजिंगमुळे, त्वचा सैल पडल्यामुळे अथवा चुकीची ब्युटी ट्रिटमेंट केल्यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स उघडतात आणि पुन्हा बंद होत नाहीत. ज्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खड्ड्याप्रमाणे आकार दिसू लागतो. पिंपल्सवर केलेल्या उपचारांमुळेही त्वचेवर एक खोलगट भाग निर्माण होतो ज्याला आपण चेहऱ्यावरील खड्डे असं म्हणतो. अशा वेळी त्वचेला टाईट इफेक्ट देणारे आणि पोअर्स बंद करणारे उपचार केले राहिजेत. यासाठीच जाणून घ्या चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी क्रीम (Cheharyavaril Khadde) ची निवड कशी करावी आणि कोणत्या क्रीममुळे तुमचा चेहरा पुन्हा डाग विरहीत आणि नितळ दिसू लागेल. आम्ही सूचवलेल्या या क्रीम नियमित वापरल्यास तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोअर्स हळू हळू बंद होतील आणि चेहऱ्यावरील खड्डेदेखील कमी होत जातील.
चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी क्रीममध्ये कोरफड असणं खूप गरजेचं आहे. कारण कोरफड मध्ये तुमच्या त्वचेला टाईट करणारे गुणधर्म असतात. शिवाय कोरफड मध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे कोरफड तुमच्या त्वचेत खोलवर जाऊन त्वचेचं जीवजंतूंपासून रक्षण करते. लॅक्मे कंपनीचं हे अॅलो व्हेरा जेल हे शंभर टक्के नैसर्गिक कोरफडीपासून तयार करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी आणि त्वचेचे पोअर्स बंद करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. दैनंदिन वापरासाठी हे जेल तुमच्या खूप फायद्याचं ठरेल कारण ते चिकट नसल्यामुळे तुम्ही दिवसादेखील तुमच्या त्वचेसाठी वापरू शकता. चांगल्या परिणामासाठी रात्री झोपताना चेहरा स्वच्छ केल्यावर हे जेल चेहऱ्यावर लावा आणि झोपी जा. ज्यामुळे तुम्हाला सकाळी चेहऱ्यावर एक छान टवटवीतपणा दिसेल.
फायदे -
तोटे -
काया ही ब्युटी प्रॉडक्टची निर्मिती करणारी एक विश्वासार्ह कंपनी आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काया क्लिनिकचे कोणतेही उत्पादन नक्कीच वापरू शकता. कारण या कंपनीची उत्पादने निरनिराळ्या त्वचा प्रकारानुसार आणि अभ्यासपूर्वक तयार केलेली असतात. जर तुमची त्वचा तेलकट अथवा कॉम्बिनेशन प्रकारची असेल तर तुमच्यासाठी हे क्रीम अगदी बेस्ट आहे. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे तर कमी होतीलच शिवाय तुमच्या त्वचेच्या इतर अनेक समस्या यामुळे कमी होऊ शकतील. चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन आणि टॅन घालवण्यासाठीही हे क्रीम उपयुक्त आहे. शिवाय ते तुमच्या त्वचेत पटकन मुरतं आणि त्वचेवर योग्य परिणाम करू लागलं.
फायदे -
तोटे -
जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतील आणि त्यामुळे सतत चेहऱ्यावर व्रण अथवा मुरूम खड्डे निर्माण होतात. पिंपल्स आल्यावर केलेल्या चुकांचे हे परिणाम असतात. हे व्रण आणि चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी क्रीम वापरणं तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल. कारण यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरील जुन्या आणि नवीन पिंपल्स, त्यामुळे निर्माण होणारे व्रण, चेहऱ्यावरील खड्डे कमी सुधारणारे गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील अशा खड्ड्यांमुळे त्वचा ओबडधोबड आणि निस्तेज दिसू लागते. मात्र या जेलबेस क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरची ही समस्या नक्कीच कमी होऊ शकते.
फायदे -
तोटे -
एका आकर्षक काचेच्या बाटलीत असलेलं हे क्रीम प्रोव्हिटॅमिन सी, बी 2, बी 6, ए, विट - सी, विट - डी, विट - ई आणि अनेक नैसर्गिक घटकांनी युक्त आहे. रात्री वापरण्यासाठी उपयुक्त असलेल्या या पर्ल ब्युटी क्रिममुळे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे टॅन, मुरुमाचे व्रण आणि डाग, ओपन पोअर्स, पिगमेंटेशन, अंडर आय सर्कल्स अशा समस्या कमी होतात. शिवाय तुमच्या त्वचेवर एक उजळ आणि नॅचरल ग्लो दिसू लागतो. यातील घटकांमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. यासोबतच जाणून घ्या ओपन पोअर्स कमी करण्यासाठी नेमकं काय करावं.
फायदे -
तोटे -
मार्क्स गो हे क्रीम खास तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने मार्क्ससाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. गुलाबी रंगाच्या आकर्षक पॅकमधील या क्रीममुले तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्यावरील व्रण, चेहऱ्यावरील खड्डे कमी होतात. चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी क्रीम तुम्ही शोधत असाल तर हे तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते. शिवाय वापरण्यासाठीदेखील हे क्रीम अतिशय उपयुक्त आहे. लक्षात ठेवा पिंपल्सवर उपचार करण्यासाठी त्यांना अगदी नाजूकपणे हाताळा आणि या क्रीमचा वापर करा. काही घरगुती उपाय करूनदेखील तुम्ही तुमच्या पिंपल्सवरील डागांवर घरगुती उपचार करू शकता. सोबतच या क्रीमचादेखील वापर करा.
फायदे -
तोटे -
लोटस कंपनी काही दिवसांपासून ब्युटी प्रॉडक्टमध्ये फार लोकप्रिय होत आहे. या कंपनीचे अनेक प्रॉडक्ट हे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटकांपासून तयार करण्यात येतात. जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर ही क्रीम वापरणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. यासाठी चेहरा आधी नीट स्वच्छ करा आणि टोनर टोन केल्यावर त्यावर ही क्रीम लावा. यामध्ये तुमच्या त्वचेला पिंपल्सपासून मुक्त ठेवणारे घटक वापरण्यात आलेले आहेत.
फायदे -
तोटे -
चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी मॉईस्चराईझिंग क्रीम प्रमाणेच हे लाईटवेट क्रीम बेस फेसवॉशदेखील नक्कीच उपयुक्त आहे. कारण यामध्ये आहे त्वचेला मॉईस्चराईझ करणारे, री हायड्रेट करणारे आणि त्वरीत फ्रेश करणारे घटक. ही क्रीम मिल्क प्रोटिन, ग्लिसरिन, नारळाचे तेल, व्हिटॅमिन ई आणि लंडन क्लासिक सुंगधाने युक्त आहे. तुमच्या त्वचेचे ओपन पोअर्स स्वच्छ करून ती त्यांना मऊ आणि मुलायम करते. ज्यामुळे हळू हळू त्वचेवरील पिंपल्समुळे निर्माण झालेले खड्डे कमी होतात.
फायदे -
तोटे -
पिंपल्सची समस्या साधारणपणे तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचा प्रकार असलेल्या लोकांना जास्तप्रमाणात जाणवते. त्वचा पिंपल्समुक्त ठेवण्यासाठी त्वचेची रोमछिद्रे अथवा पोअर्स उघडी राहणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. या क्रीममधील झिंक ऑक्साईड तुमच्या त्वचेच्या ओपन पोअर्सना पुन्हा बंद करते आणि ग्लिसरिन त्वचेला मऊपणा देते. ज्यामुळे त्वचा मुलायम तर राहतेच शिवाय त्वचेवर पिंपल्स निर्माण होत नाहीत.
फायदे -
तोटे -
बायोटिक कंपनीचे ब्युटी प्रॉडक्ट नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात येत असल्यामुळे ते त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त आहेत. या क्रीममध्ये दारू हळद, छोटी दुधी, गंधपुरा, कडूलिंब यांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्ने स्कार्स तर कमी होतातच शिवाय त्यामुळे चेहऱ्यावरील निर्माण झालेले खड्डेदेखील हळूहळू कमी होत जातात. तुम्ही ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावर दररोज वापरू शकता.
फायदे -
तोटे -
तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स, व्रण आणि खड्डे यामुळे तुम्ही वैतागून गेला असाल तर हे क्रीम तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स बरे होतात आणि चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्रण, काळे डाग, चेहऱ्यावरील खड्डे कमी होतात. यासाठी यात खास आणि दुर्मिळ आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे चेहऱ्यावरच्या सर्व समस्या आपोआप कमी होत जातात. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी झाल्यामुळे पुन्हा एक्ने येण्याची समस्यादेखील कमी होते.
फायदे -
तोटे -