हिवाळ्यात थंड गार वारा, कोरडे वातावरण आणि प्रखर सुर्यकिरण यामुले त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. जर तुमची त्वचा कोरड्या प्रकारची असेल तर थंडीत तुमच्या त्वचेचं सर्वात जास्त नुकसान होतं. अशा कोरड्या आणि रूक्ष त्वचेवर साध्या चोळण्यानेही ओरखडे उठतात. जर थंडीत त्वचेची योग्य निगा नाही राखली गेली तर त्वचेला जखमा होऊन त्यातून रक्त निघू लागते. यासाठीच हिवाळ्यात त्वचेची जास्त निगा राखण्याची आणि त्वचेला योग्य स्किन केअर प्रॉडक्ट लावण्याची गरज असते. हिवाळ्यात त्वचेचं संरक्षण कोल्ड क्रिमने केलं जाऊ शकतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत काही चांगल्या ब्रॅंडच्या कोल्ड क्रिम शेअर करत आहोत.
ब्युटी प्रॉडक्टमध्ये पॉंड्स कंपनी अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. त्यामुळे घराघरात पॉंड्सची उत्पादने आवर्जून वापरली जातात. शिवाय यामध्ये महिलांसाठी आणि पुरूषांसाठी असे निरनिराळे प्रकार नसल्यामुळे घरातील सर्वांनाच ही उत्पादने एकत्र वापरता येतात. हिवाळा सुरू झाला की पॉंड्सच्या कोल्ड क्रिमची मागणी वाढते. या क्रिमने तुमची त्वचा मऊ आणि मुलायम तर होतेच शिवाय हे क्रिम तुमच्या त्वचेत सहज मुरतं.
फायदे -
तोटे -
थंडी सुरू झाली की निवीया कंपनीची ही क्रिम सर्वांनाच हवी हवीशी वाटू लागते. याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये एक रिच, क्रिमी फॉर्म्युला असणारं मॉइस्चराझर वापरण्यात आलेलं आहे. शिवाय ही क्रिम युनिसेक्स असल्यामुळे पुरूष, महिला आणि मुलांना वापरता येऊ शकते. कुंटुबातील सर्वांच्याच त्वचेची काळजी घेण्यासाठी ही एक उत्तम कोल्ड क्रिम आहे. विशेष म्हणजे ही फक्त फेस क्रिम नाही त्यामुळे तिचा वापर संपूर्ण शरीरावरच्या त्वचेची निगा राखण्यासाठी करता येऊ शकतो.
फायदे -
तोटे -
हिवाळ्यात जर तुम्हाला तुमच्या त्वचेचं जास्तीत जास्त लाड करायचे असतील तर ही क्रिम अतिशय बेस्ट आहे. या क्रिमची अॅड गुगली वुगली वूश पाहून तुम्हाला याची कल्पना आलीच असेल. विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या त्वचेचं खोलवर पोषण करण्यासाठी अल्ट्रा नरिशिंग फॉर्म्युला वापरण्यात आलेली आहे. ज्यामुळे तुमचे थंड वातावरणापासून रक्षण होते. यामध्ये तुमच्या त्वचेच्या पोषणासाठी खास व्हिटॅमिन ए, सी आणि ईचे घटक वापरण्यात आलेले आहेत. शिवाय ही कोणत्याही वयाच्या महिलेला सूट होणारी एक कोल्ड क्रिम आहे. जर तुम्हाला पिंपल्स असतील तर मात्र या क्रिम ट्राय करायला हव्या.
फायदे -
तोटे -
हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही एखादं आयुर्वेदिक ब्युटी प्रॉडक्ट शोधत असाल, तर तुमच्यासाठी आयुरची ही कोल्ड क्रिम नक्कीच उपयोगाची आहे. यामध्ये खास नॉन ऑईली आणि नॉन स्टिकी फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. शिवाय यामध्ये कोरफड आणि व्हिटॅमिन ई देखील आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते आणि त्वचेचं योग्य पोषण देखील होतं. या क्रिममुळे तुमची त्वचा दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे ती हिवाळ्यातही जास्तीत जास्त वेळ मुलायम राहते.
फायदे -
तोटे -
यासोबतच नाईट क्रिम आणि स्लिपिंग मास्कमधला फरक ओळखण्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
हिवाळ्यात त्वचेचं संरक्षण होण्यासाठी तुम्ही एखादी वेगळी आणि सुंगधित कोल्ड क्रिम शोधत असाल तर डाबर गुलाबरीची ही कोल्ड क्रिम तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी परफेक्ट सोल्युशन वापरण्यात आलेलं आहे. यामुळे तुमची त्वचेचा मॉईस्चर बॅलन्स राखला जातो, त्वचेचं सरंक्षण होतं आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. त्वचेचा निस्तेजपणा, कोरडेपणा आणि थंडी मुळे झालेलं नुकसान कमी करण्यासाठी ही क्रिम उत्तम आहे. या क्रिममुळे तुमच्या त्वचेवर एक हेल्ही ग्लो निर्माण होतो. शिवाय यामध्ये नॉन स्टिकी आणि नॉन ऑईली फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. गुलाबरीची ही कोल्ड क्रिम व्हिटॅमिन ई आणि गुलाबाच्या अर्काने युक्त असल्यामुळे या क्रिम मुळे तुमची त्वचा मऊ आणि सुंगधित होते. या हिवाळ्यात ही क्रिम ट्राय करण्यास नक्कीच काही हरकत नाही.
फायदे -
तोटे -
थंडीमुळे होणारं त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी जोविस हिमालयन चेरी कोल्ड क्रिम तुमच्या त्वचेवर एक सुरक्षित कवच तयार करते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ तर राहतेच शिवाय कोरडेपणामुळे त्वचेचं होणारं नुकसान कमी होतं. यामध्ये कोरफड. बदाम, ऑलिव्ह ऑईल, गाजर, व्हिटॅमिन ए, गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई सारखे आयुर्वेदिक घटक वापरण्यात आलेले आहेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं मुळापासून पोषण होतं. यातील पोषक घटकांमुळे तुमच्या त्वचेच्या पेशी मजबूत होतात आणि थंडीपासून त्यांचे योग्य पद्धतीने रक्षण होतं.
फायदे -
तोटे -
जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर ट्राय करा या अॅलोव्हिरापासून तयार केलेल्या क्रिम
खादी ग्रामोद्योगात तयार करण्यात आलेली सौंदर्य उत्पादने ही बऱ्याचदा आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेली असतात. त्यामुळे या उत्पादनांना चांगलीच मागणी आहे. खादीचं हे कैलाश खादी कोल्ड क्रिम तुम्ही सकाळी अंघोळीनंतर वापरल्यास त्वचेवर याचा चांगला परिणाम दिसून येतो. या क्रिममुळे तुमच्या त्वचेचं सुर्यकिरणांपासून संरक्षण तर होतंच. शिवाय तुमच्या त्वचेवरील एजिंगचे मार्क्स, सुरकुत्या, फाईन लाईन्सदेखील कमी होतात. ज्यामुळे तुम्हाला चिरतरूण सौंदर्य मिळू शकतं.
फायदे -
तोटे -
स्किन केअर प्रॉडक्टमध्ये हिमालया कंपनीचे प्रॉडक्ट सध्या चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे यंदा हिवाळ्यासाठी तुम्ही एखादी बेस्ट कोल्ड क्रिम शोधत असाल तर हिमायलाची ही नरिशिंग क्रिम तुम्ही नक्कीच वापरून पाहू शकता. या क्रिममध्ये त्वचेचं पोषण करण्यासाठी खास चेरी आणि कोरफडीचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं, निगा राखली जाते आणि संरक्षणही होतं. शिवाय ही क्रिम सर्वांसाठी आणि सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे.
फायदे -
तोटे -
ओरिफ्लेम कंपनीचे ब्युटी प्रॉडक्टही त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असून त्यामुळे त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. ओरिफ्लेमची इसेंशिअल कोल्ड क्रिम एक रिच आणि नरिशिंग मल्टी परपज कोल्ड क्रिम आहे. त्यामुळे तिचा वापर तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच शरीरावरच्या इतर भागावरही करू शकता. तुम्ही ही क्रिम दररोज वापरू शकता. शिवाय पुरूष, महिला आणि लहान मुलं असं कुटुंबातील सर्वांसाठी ही क्रिम उपयुक्त आहे. यामध्ये त्वचा मऊ होण्यासाठी बीवॅक्स, ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन्स वापरण्यात आलेले आहेत. ज्यामुळे थंडीच्या कोरड्या वातावरणापासून तुमचं संरक्षण होतं आणि त्वचा मऊ राहते.
फायदे -
तोटे -
थंडीत तुमच्या त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आणि निस्तेज होण्यापासून वाचवण्यासाठी अवॉन कोल्ड क्रिम मध्ये खास नरिशिंग फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊन त्वचेचं नुकसान होत नाही. यातील मॉईस्चराईझर तुमच्या त्वचेवर दिवसाचे 24 तास परिणाम करतं. शिवाय यामध्ये त्वचेला मऊपणा आणण्यासाठी बदामाचे तेल, व्हिटॅमिन्सचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं आणि योग्य निगा राखली जाते.
फायदे -
तोटे -
आयुर्वेदिक घटक आणि मॉर्डन सायन्सचा उत्तम मेळ घालत व्हिएलसीसीने या कोल्ड क्रिमची निर्मिती केलेली आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होतेच शिवाय त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. यासाठी यामध्ये आयुर्वेदिक हर्ब्स आणि तेलांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते, त्वचेचं पोषण होतं आणि हानिकारक घटकांपासून त्वचेचं संरक्षणदेखील होतं. तुम्ही ही क्रिम हिवाळ्यात नियमित वापरू शकता. सुर्यकिरणांपासून संरक्षण होण्यासाठी यात SPF 10 फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. कोरफड, द्राक्षांचा अर्क आणि बिया, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईल, मुलेठी, केशर आणि व्हिटॅमन ईमुळे तुमची त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.
फायदे -
तोटे -
कोल्ड क्रिममुळे त्वचा तेलकट होते. मात्र ज्यांची त्वचा मुळातच तेलकट असते अशा लोकांसाठी नॉन स्किटी आणि नॉन ऑयली फॉर्म्युला असलेल्या क्रिम वापरणं आवश्यक आहे. यासाठी हिमालया, डाबर आणि आयुर कंपनीच्या कोल्ड क्रिम बेस्ट आहेत.
पॉंड्स कोल्ड क्रिममध्ये रिच नरिशिंग फॉर्म्युला असल्यामुळे या क्रिममुळे त्वचा तेलकट होण्याची शक्यता असते. मात्र ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी नॉन स्टिकी आणि नॉन ऑइली फॉर्म्युला असलेल्या क्रिमची निवड करावी.
कोल्ड क्रिम आणि मॉईस्चराईझर यामध्ये एकाच प्रकारचे घटक वापरण्यात येतात. मात्र कोल्ड क्रिम या क्रिमबेस आणि थोड्या घट्ट असतात. तर मॉईस्चराईझर लोशन स्वरूपात असून ते थोडे पातळ असल्यामुळे त्वचेत लवकर मुरतात.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक