मुलांच्या त्वचेची घ्या खास उटण्याने काळजी, होईल त्वचा मऊ

मुलांच्या त्वचेची घ्या खास उटण्याने काळजी, होईल त्वचा मऊ

आपण स्वतः आपल्या त्वचेची काळजी नक्कीच घेऊ शकतो.  पण आपल्या मुलांच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जाते आहे की नाही हे आपल्यालाच पाहावे लागते. खेळताना कदाचित चेहऱ्यावर जमा झालेली धूळ आणि माती किती त्वचेवर परिणाम करते हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्या मुलांच्या त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. तसं तर बाजारामध्ये अनेक महागडी उत्पादने मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला मिळतात.  पण तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या त्वचेची काळजी नैसर्गिक पद्धतीनेच घ्यायची असेल तर तुम्हाला या उटण्याचा वापर करून ते नक्कीच करता येईल. अभिनेत्री जुही परमारने हे खास उटणे आपल्या मुलीसाठी आपण वापरतो असे सांगितले आहे. तिने सोशल मीडियावर याबद्दल सगळी माहितीही शेअर केली आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही या उटण्याचा वापर करून आपल्या मुलांच्या त्वचेची नैसर्गिक पद्धतीने नक्कीच काळजी घेऊ शकता. हे घरगुती उटणे कसे बनवायचे पाहूया. 

उटण्यासाठी साहित्य आणि बनविण्याची पद्धत

Shutterstock

 • 1 मोठा चमचा बेसन 
 • 1 मोठा चमचा कच्चे दूध
 • अर्धा चमचा गुलाबपाणी 

पद्धत 

एका बाऊलमध्ये या तिनही गोष्टी मिक्स करून घ्या आणि त्याची  पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट मुलांच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि हातापायावर लावा. या घरगुती उटण्याचा हातावर सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही उपयोग करा. साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. त्यानंतर पुन्हा हलक्या हातांनी रगडून तुम्ही हे काढा.  मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घाला. या उटण्याचा तुम्ही मुलांसाठी नियमित वापर केल्यास, तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. तुम्ही किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग मुलांच्या त्वचेवर करू शकता. यामुळे मुलांची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम तर होईलच त्याशिवाय अंगावरील धूळ आणि मातीही निघून जाईल. 

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

त्वचेसाठी बेसनाचे फायदे

Shutterstock

 • तुमच्या मुलांची त्वचा तेलकट असेल तर त्यासाठी बेसनाचा वापर करणे उत्तम ठरते. इतकंच नाही तर मुलांची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहते
 • बऱ्याच मुलांच्या चेहऱ्यावर केस असतात. हे केस  तुम्ही बेसनाच्या या उटण्याने घालवू शकता. रोज या बेसनाच्या उटण्याचा वापर केल्यास, नैसर्गिकरित्या केस निघून जातील. फक्त त्वचेवर बेसन जोरात घासू नका याकडे लक्ष द्या
 • घराच्या बाहेर मुलं खेळायला जातात आणि उन्हामुळे त्यांची मान काळी पडते अर्थात टॅनिंग होतं. वेळेवर याकडे लक्ष दिलं तर मान काळी पडणं  बंद होऊ शकतं.  त्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

त्वचेच्या संसर्गापासून हवी आहे सुटका, तर वापरा घरगुती उटणे

त्वचेसाठी दुधाचे फायदे

Shutterstock

 • कच्चे दूध त्वचेसाठी वरदान ठरते. तसं तर दुधाचा वापर त्वचा टाईट करण्यासाठी होतो. मुलांची त्वचा अधिक कसदार होते. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर कच्च्या दुधाचा वापर हा मॉईस्चराईजरचे काम करतो. 
 • कच्चे दूध हे नैसर्गिक स्किन टोनर आहे. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी कच्चे दूध अतिशय फायदेशीर ठरते. इतकंच नाही तर दूध टिश्यूज मजबूत करते आणि त्वचेमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणते
 • खेळताना मुलांंच्या चेहऱ्यावर धूळ आणि माती चिकटते. साधारण पाण्याने चेहरा धुतल्यास, स्किन पोअर्समध्ये लपलेली धूळ आणि मातीचे कण स्वच्छ होत नाहीत. अशा वेळी कच्च्या दुधाचा फेस क्लिंन्झर म्हणून उपयोग करा. तुम्ही कापसाने कच्चे दूध चेहऱ्याला लाऊन चेहरा स्वच्छ करा.  मुलांचा चेहरा अधिक तजेलदार दिसतो
 • कच्च्या दुधामध्ये ब्लिचिंग घटक असतात. हे त्वचेत निर्माण  होणारे मेलेनिन हार्मोन नियंत्रित करण्याचे  काम करतात. नियमित स्वरुपात त्वचेवर कच्चे दूध लावल्याने रंगही उजळतो

लॉकडाऊनच्या काळातही त्वचेवरील ग्लो कायम ठेवायचा आहे, मग करा हे नैसर्गिक उपाय

त्वचेसाठी गुलाबपाण्याचे फायदे

Shutterstock

 • गुलाबपाण्याची सुगंध चांगला असल्याने मुलांना आवडतो.  गुलाबपाण्यात त्वचा उजळवण्याचे गुण असतात. मुलांच्या चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने रंग  उजळतो 
 • त्वचेचा पीएच बॅलेन्स ठेवण्यासाठी गुलाबपाण्याचा फायदा मिळतो 
 • गुलाबपाण्यात अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटक असतात. यामुळे नियमित वापर केल्यास, कोणत्याही इन्फेक्शनचा धोका राहात नाही 
 • गुलाबपाण्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडी पडत नाही 

तुम्हीदेखील हे उटणे मुलांसाठी वापरू शकता. तुमच्या मुलाची त्वचा अधिक संवेदनशील असल्यास आधी डॉक्टरांशी बोलून घ्या आणि मगच याचा वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक