ADVERTISEMENT
home / Budget Trips
जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी ही आहेत मुंबईजवळची  बेस्ट ठिकाणं

जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी ही आहेत मुंबईजवळची बेस्ट ठिकाणं

2020 अनेकांचे फिरण्याचे कितीतरी प्लॅन रद्द झाले. आता साधारण 8 ते 9 महिने झाले आहेत. घराबाहेर म्हणावं तसं कोणीच बाहेर पडलेले नाही. विशेषत: कपल्सना हवी असलेली प्रायव्हसी या काळात खूप जणांना मिळाली देखील नाही. आता सगळे काही पूर्ववत होत असताना बाहेर जाण्याचे अनेक प्लॅन्स आखले जात आहेत. पण दूर कुठेही जाण्यापेक्षा जवळच्या जवळ कोणतीही काळजी न घेता फिरायचे असेल आणि मुंंबईजवळपासचे ठिकाण हवे असेल तर मुंबईपासून जवळ असलेल्या कर्जतमध्ये तुम्ही आपला वेळ जोडीदारासोबत घालवू शकता.

पिकनिकसाठी बेस्ट आहेत मुंबईतील ही ’25’ ठिकाणं (Picnic Places In Mumbai In Marathi)

कॅम्पिस्तान कर्जत (Campistan karjat)

कॅम्पिस्तान कर्जत (Campistan karjat)

Instagram

ADVERTISEMENT

जर तुम्ही कॅपिंग करणारे कपल असाल तर कर्जतमध्ये असलेले हे ठिकाण तुम्हाला फारच आवडेल. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडे लांब जात निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. तंबूत म्हणजे टेंडमध्ये राहण्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला या मध्ये घेता येईल. नदीच्या बाजूला असे तंबू बांधण्यात आलेले आहेत. एका ठराविक अंतरावर हे तंबू बांधण्यात आले असून तुम्हाला तुमचा निवांत वेळ घालवण्यात येईल. जेवणाची सोय असली तरी सेल्फ सर्व्हिस हा प्रकार असल्यामुळे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जेवणाचा आनंद घेता येतो 

टिप: कॅपेनसाठी हे बेस्ट असल्यामुळे तुम्हाला फाईव्हस्टार हॉटेलप्रमाणे सोयी मिळणार नाहीत. इथे कॉमन वॉशरुम बांधण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना हे आवडणार नाही. 

खर्च:  5,000/- ( दोघांसाठी) 

https://www.campistaan.com/

ADVERTISEMENT

खर्च कमी जास्त होऊ शकतो. 

महाराष्ट्रातील ही 10 ठिकाणं आहेत अजून अज्ञात पण अविस्मरणीय- Offbeat Places In Maharashtra

द वे साईड (The whey side)

द वे साईड (The whey side)

Instagram

ADVERTISEMENT

कर्जतमध्ये असलेले आणखी एक ठिकाण म्हणजे द व्हे साईड. ही एक लहान प्रॉपर्टी असून या ठिकाणी छान ट्री हाऊससारखी घरं बांधण्यात आली आहेत. एक छोटे स्विमिंग पूल आणि उत्तम जेवणाची सोय अशी ही प्रॉपर्टी आहे. येथील एक रुमही मोठी असून त्यामध्ये एकावेळी 4 ते 5  जणं सहज राहू शकतात. येथील रुममध्ये एसी, बाथरुम, पाणी योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला इथे राहता येईल. या ठिकाणचे जेवण एकदम मस्त आहे. तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारातील जेवण मिळेल. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ते करुही दिले जाते. पण येथील जेवण हे वाखाणण्यासारखे आहे.  

साधारण खर्च : 2,500/- ( दोघांसाठी)

https://www.makemytrip.com/hotels/the_whey_side-details-karjat.html

लिवियास रिसॉर्ट, कर्जत

कर्जतमधील आणखी एक रिसोर्ट म्हणजे लिविया रिसोर्ट. कपल्स आणि फॅमिली पिकनिकसाठी हे एकदम बेस्ट स्पॉट आहे. या ठिकाणी कपल्स आणि फॅमिलीसाठी वेगळी सोय केलेली आहे. स्विमिंग पूल, जेवणाची सोय असलेले असे ठिकाण आहे. याचा खर्चही फारच कमी आहे. याचे बुकिंग तुम्हाला त्यांच्या फेसबुक पेजवरुन करता येऊ शकते.  या प्रॉपर्टीचे फारसे फोटो दिसत नसले तरीदेखील तुम्ही त्यांच्याकडे व्हॉटसअॅपवरुन मागवून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

साधारण खर्च : 1,000 ते 2,000 हजार रुपये. 

हे काही पर्याय आहेत तुम्ही नक्कीच या ठिकाणी जाऊ शकता आणि जोडीदारासोबत आपला वेळ घालवू शकता. 

भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं (Best Treks In India In Marathi)

26 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT