दिवाळसणाच्या खरेदीला जोरदार सुरूवात झालेली दिसत आहे. पण सर्वांना यंदा दिवाळीत एकाच गोष्टीची चिंता आहे की असा उत्साह साजरा करणं योग्य आहे की अयोग्य. कारण दिवाळी म्हटलं की खरेदी, गेट टु गेदर, दिवाळी पार्टी, फराळ पार्टी हे सर्व काही ओघाने आलंच. कारण दिवाळीला वर्षाचा सण असं म्हटलं जातं. गोरगरिबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या परिने सण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच यंदा कोरोनाच्या काळातही हा सण तितक्याच उत्साहात साजरा करायचा असेल तर या काही टिप्स अवश्य फॉलो करा.
दिवाळी सण म्हणजे कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची संधीच असते. एरव्ही कामानिमित्त सर्वजण बिझी असतात मात्र दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाच्या काळात असलेले सोशल डिस्टंसिंगचे आणि किती लोकांनी एकत्र यावं या नियमानुसार तुमची छोटी दिवाळी पार्टी ऑर्गनाईझ करा. घरच्या घरी अगदी मोजक्या लोकांमध्ये तुम्हाला पार्टी करता येईल. यासाठी स्वच्छतेचे सर्व नियम काटोकोरपणे पाळा. ज्यामुळे कुटुंब, मित्रमंडळींसोबत तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल. ज्यामुळे खूप महिन्यांपासून आलेला कोरोनाचा आणि लॉकडाऊनचा आलेला कंटाळा नक्कीच दूर होईल.
गेले कितीतरी महिने वर्क फ्रॉम होम करून तुम्ही नक्कीच कंटाळून गेला असाल. जर तुमचा मित्रपरिवार खूप मोठा असेल अथवा तुम्ही एकमेकांपासून खूपच दूर राहत असाल तर व्हिडिओ अथवा झूम कॉलवरून तुम्ही दिवाळीची आनंद लुटू शकता. ज्यामुळे कमीत कमी तुम्ही तुमच्या मित्र अथवा नातेवाईकांना समोरासमोर प्रत्यक्ष पाहू शकता. दिवाळीचं गिफ्ट तुम्ही त्यांना कुरिअरच्या माध्यमातून पाठवू शकता.
जर यंदा दिवाळीत नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुमचं घर मस्त सजवा, स्वतः छान ड्रेसअप व्हा आणि सोशल मीडियावर अथवा इन्स्टाग्रामवर लाईव्ह जा, छान इन्स्टा स्टोरी तयार करा, सेलिब्रेशनचा छोटा व्हिडिओ तयार करा. ज्यामुळे तुम्ही केलेलं सेलिब्रेशन, दिवाळी पूजा, फराळ, तयारी सर्वांसोबत तुम्हाला शेअर करता येईल. एखादा दिवाळी व्लॉग या निमित्ताने तयार करायला काहीच हरकत नाही. ज्यामुळे तुम्हाला घरातच आनंदी आणि उत्साही वाटेल.
दिवाळीच्या उत्साह साजरा करण्यासाठी जर सर्वच घराबाहेर पडले तर सोशल डिस्टंसिंग पाळणं नक्कीच शक्य नाही. शिवाय यातून कोरोनाचा धोका कमी होणार नाही. यासाठीच सुरक्षित मार्ग म्हणजे तुम्हाला हवी ती शॉपिंग ऑनलाईन करा. ऑनलाईन शॉपिंगचा फायदा हा होतो की खरेदी करताना तुम्हाला तुमच्या बजेटचा योग्य अंदाज येतो आणि विचारपूर्वक नियोजन केलं तर भरपूर शॉपिंग करता येते. त्यामुळे या मार्गाने तुमची यंदाची शॉपिंग नेहमीपेक्षा जास्त आणि बजेटमध्ये होईल.
दिवाळीसाठी घर सजवणं ही एक छान आणि उत्साह वाढवणारी प्रक्रिया आहे. दरवर्षी काम आणि इतर गोष्टींमुळे जर तुम्ही दिवाळीसाठी विकतचा फराळ, कंदिल, पणत्या, सजावटीचे सामान आणत असाल. तर यंदा तसं करू नका त्यापेक्षा यासाठी DIY पद्धत वापरा. दिवाळीची सजावट आणि फराळ करण्यासाठी घरीच नवनवीन प्रयोग करा. होममेड आणि स्वतः केलेल्या वस्तू पाहण्यात, त्या वापरण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. ज्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू शकता. यासाठी यंदा दिवाळीचा फराळ, मिठाई, कंदिल,उटणं, पणत्या, रांगोळी सर्व काही स्वतःच्या हाताने तयार करा.
घराची स्वच्छता करताना सर्व वस्तू निर्जंतूक करण्यासाठी मायग्लॅमचे वाईप आऊट उत्पादन वापरा