पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) सध्या अनेक स्पर्धक वेगवेगळ्या कारणाने गाजवत आहेत. ‘नागिन’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा म्हणजे पवित्रा पुनिया (Pavitra Punia). पवित्राचा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडत आहेच. पण पवित्राचा फॅशन सेन्सनेही प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. विशेषतः पवित्रा साडी नेसल्यावर घालत असणारे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स नक्कीच लक्ष वेधून घेत आहेत. पवित्रा घराबाहेर असतानाही फॅशन सेन्स तसाच चांगला कॅरी करते. त्यामुळे तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक असे फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने खूपच सुंदर बॅकलेस ब्लाऊज घातले आहेत. पवित्रा पुनियाचे हे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स (Backless Blouse Designs) तुम्हालाही नक्कीच भुरळ पाडतील. या ब्लाऊजमध्ये अधिक ग्लॅमरस दिसायला होईल यात काहीच दुमत नाही. तुम्हालाही पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालणं आवडत असेल तर तुम्ही नक्कीच असेल ब्लाऊज ट्राय करू शकता. पवित्रा पुनियाच्या या लुकवरून तुम्ही नक्कीच टिप्स घेऊ शकता.  आम्ही तुम्हाला यापैकी काही स्टाईल्स इथे सांगत आहोत. 

डबल स्ट्रिग्ज बॅकलेस ब्लाऊज

Instagram

बॅकलेस ब्लाऊजचा ट्रेंड नेहमीच हवाहवासा वाटतो. यामध्ये खास गोष्ट आहे की, तुम्ही तुमच्या स्टाईल आणि व्यक्तिमत्वानुसार ब्लाऊजला ट्रेंडी लुक देऊ शकता. डबल स्ट्रिग्ज बॅकलेस ब्लाऊजचे डिझाईन खूप आधीपासून चालत आले आहे. शिफॉनच्या साडीसह हे डिझाईन खूपच चांगले मॅच करते. तुम्ही घरी कोणत्या कार्यक्रमासाठी अथवा बाहेर पार्टीसाठीही हा लुक करून जाऊ शकता. हा लुक तुम्हाला बोल्ड दाखवतो. तसंच डबल स्ट्रिग्ज बॅकलेस ब्लाऊजसह तुम्ही हेव्ही ज्वेलरीदेखील ट्राय करू शकता आणि MyGlamm चे आयशॅडो वापरून तुम्हाला अधिक आकर्षक लुकही देता येईल. 

ऑक्टोबर हिटमध्ये सणासमारंभाला ट्राय करा स्टायलिश आणि आकर्षक ब्लाऊज

Beauty

Manish Malhotra 4 in 1 Eyeshadow Palette - Paparazzi

INR 1,250 AT MyGlamm

हॉल्टर नेक ब्लाऊज

Instagram

शिमर साडीह हॉल्ट नेक ब्लाऊजमध्ये पवित्रा अत्यंत हॉट दिसत आहे.  तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी  काही वेगळं करून पाहायचं असेल तर तुम्ही असा ब्लाऊज नक्कीच घालू शकता. पवित्रा पुनियाने विकेंड का वारसाठीही अशाच स्वरूपाचा ब्लाऊज घालून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पवित्राचे ब्लाऊज दिसायला खूपच आकर्षक आहेत आणि असा ब्लाऊज आपल्या वॉर्डरोबमध्येही असायलाच हवा असं वाटणं साहजिक आहे. या दिवाळीसाठी तुम्हाला नवा लुक हवा असेल तर तुम्ही नक्की हा लुक ट्राय करा आणि यासह MyGlamm ची लिपस्टिक नक्की वापरा. 

ट्रेंडी ब्लाऊज वापरून साडीला द्या क्लासी लुक

Make Up

MyGlamm K.Play Flavoured Lipstick

INR 499 AT MyGlamm

ऑफ शोल्डर ब्लाऊज

Instagram

तुम्हाला स्टायलिश लुक करायचा असेल तर तुम्ही पवित्रासारखा ऑफ शोल्डर ब्लाऊज वापरू शकता. ऑफ शोल्डर ब्लाऊजसह मॅचिंग साडी तुमचा लुक अधिक चांगला आकर्षक बनवते. तसंच हा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही स्टाईलच्या साडीवर कॅरी करू शकता. बॅकलेस ब्लाऊजप्रमाणेच ऑफ शोल्डरही सध्या ट्रेंडमध्ये आहे. बाजारामध्ये तुम्हाला अगदी असे रेडीमेड ब्लाऊज मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला वेगळा ब्लाऊज शिऊन घ्यायचीही गरज नाही. तुम्हाला अगदी मिसमॅच करूनही वेगळा लुक करता येऊ शकतो. पण तुम्हाला अगदी परफेक्ट फिटिंग हवे असेल तर तुम्ही असा ब्लााऊज शिऊन घ्या. 

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

बॅकलेस डिझाईन

Instagram

पार्टी वेअर साडीसह बॅकलेस डिझाईन्स तयार करून तुम्ही त्याच्याखाली एखाादी नॉट लावा अथवा स्ट्रिप्स लावा आणि हा ब्लाऊज घाला. असे बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला तयार मिळतात. तसंच तुम्हाला हवं तर तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन्स लेहंग्यासहदेखील वापरू शकता. केवळ साडीच नाही तर अशा तऱ्हेची वेगळी स्टाईलही तुम्ही घरच्या एखाद्या कार्यक्रमासाठी करू शकता. बऱ्याचदा आपण सणांसाठी असे फॅन्सी ब्लाऊज घेतो. पण तुम्हाला यावर्षी सणांसाठी काही वेगळं करून पाहायचं असेल तर त्यासाठी पवित्रा पुनियाचे हे डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक