नखांचे क्युटिकल काढून घरीच वाढवा नखांचे सौंदर्य

नखांचे क्युटिकल काढून घरीच वाढवा नखांचे सौंदर्य

सुंदर नखं वाढवून त्याला नेलपेंट लावायला तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी आजचा विषय हा फारच महत्वाचा आहे. कारण नखं सुंदर तेव्हाच दिसतात जेव्हा नखं स्वच्छ असतात. नखांच्या स्वच्छतेबाबत सांगायचे झाले तर नखांवरील क्युटीकल हे नखांवर एक थर जमा करतात त्यामुळे नखांवरील चमक कमी होते. त्यामुळे तुम्ही वेळच्या वेळी नखांवरील क्युटीकल काढून टाकायला हवे. नखांवरील क्युटीकल काढणे हे फार सोपे नाही. कारण विशेष काळजी घेत तुम्हाला ते काढावे लागतात. नखांवरील हे क्युटीलक वेळोवेळी काढून नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी या काही ट्रिक्स येतील कामी

त्वचेचं नुकसान न करता असा काढा डोळ्यांवरचा मेकअप

गरम पाण्यात भिजवा हात

Instagram

मेनिक्युअर करताना नखांवरील क्युटीकल काढण्यासाठीच हात पाण्यात भिजवले जातात. क्युटीकल क्लिनर असेल तर फारच उत्तम. कारण त्यामुळे सैल पडलेले क्युटीकल काढण्यास मदत होते. एका भांड्यात हाताला सहन होईल इतके गरम पाणी घ्या. हात थोडावेळ पाण्यात बुडवून ठेवा. संपूर्ण हात बुडवायचा नसेल तर फक्त बोटे बुडवा आणि साधारण 10 मिनिटांनी नखांवरील क्युटीकल घासून अगदी सहजपणे काढून टाकता येतात. जर शक्य असेल तर तुम्ही क्युटीकल कटरच वापर केला तरी चालेल. तुम्हाला अगदी हळुवारपणे ते काढता येईल. क्युटीकल काढताना खूप जोर लावू नका.

केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग

मॉश्चरायझरचा करा उपयोग

Instagram

जर तुम्हाला रोजच्या रोज काळजी घ्यायची असेल आणि नखांवर क्युटीकल वाढू द्यायचे नसतील तर तुम्ही मॉश्चरायझरचा उपयोग करु शकता. आंघोळीच्या आधी तुम्ही नखांना मॉश्चरायझर लावा आणि मग आंघोळीला जा.  त्यामुळे क्युटीकल सैल होतात आणि नखांवरुन निघण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला नखांवर क्युटीकल वाढू द्यायचे नसतील तर तुम्ही हे अगदी हमखास करुन पाहायला हवे.

व्हॅसलिनचा करा वापर

Instagram

व्हॅसलिनचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा असा की, तुमच्या नखांवरील क्युटीकल काढण्यास ते फारच उपयुक्त आहे. क्युटीकल क्रिम नसेल तर तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता. नखांवर व्हॅसलिन पसरवून घ्या. नखांवर चोळत मसाज करत राहा.  त्यामुळे क्युटीकल नरम पडतात. नखांवरुन क्युटीकल निघण्यासही मदत मिळते. या शिवाय व्हॅसलिनमधील इतर गुणधर्म नखांना चमकवण्याचे काम देखील करते. नखांवरील चमक वाढल्यामुळे नखं अधिक हेल्दी दिसतात. त्यामुळे व्हॅसलिन लाणे तुमच्या नखांसाठी फारच फायदेशीर असते.

या टिप्सने ओळखा तुमचे जेड रोलर खरे आहे की ड्युप्लिकेट

नखांवरील क्युटीकल काढताना

  • नखांवरील क्युटीकल काढताना तुम्हाला काळजी घेणे फार गरजेचे असते.नखांच्या हाताजवळील त्वचा फार नाजूक असते. जर तुम्ही खूप जोर लावून क्युटीकल काढायला गेलात तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. 
  • क्युटीकल काढण्याची घाई मुळीच करु नका. त्वचा सौल झाली की, ती तुम्हाला नक्कीच दिसते. तेथील त्वचा फुगून येते. ती काढण्यासाठी तुम्ही  मेनिक्युअरमधील पुशरचा उपयोग करा. 
  • मेनिक्युअरच्या पुशरला खूप धार असते त्यामुळे तुम्ही फार जपून त्याचा वापर करा. 

आता नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांवरील क्युटीकल अशा पद्धतीने काढून टाका.

Beauty

GLOW IRIDESCENT BRIGHTENING MOISTURISING CREAM

INR 1,595 AT MyGlamm