आपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट करत असतो ती सफल व्हावी अशीच आपली इच्छा असते. आपल्या आजूबाजूलाही अनेक यशस्वी आणि सफल लोक असतात. अशावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या भाषेतील मेसेज आपल्याला हवे असतात. कधी कधी आपल्याकडे शब्द नसतात. मग त्यासाठी आम्ही तुमची मदत करत आहोत. वेगवेगळ्या सुखाच्या क्षणी असे अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश (congratulations messages in marathi) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. अभिनंदन शुभेच्छा या मनापासून देतात हे जरी खरं असलं तरीही त्याला शब्दांची साथ लाभल्यावर असे अभिनंदन शुभेच्छा संदेश पटकन मनापर्यंत पोहचतात. या अभिनंदन शुभेच्छा (congratulations wishes in marathi) समोरच्या व्यक्तीचा दिवसही अगदी आनंदी करून टाकतात. असेच काही अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश आम्ही तुम्हाला इथे देत आहोत ज्याचा तुम्ही नक्की आपल्या कुटुंंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी उपयोग करू शकता.
आपल्याकडे अगदी लहानसहान गोष्टींचेही अभिनंदन करण्याची पद्धत आहे. आपली भारतीय संस्कृती ही अप्रतिम असून सतत काही ना काही कोणाचं चांगलं झालं की अभिनंदन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. अशावेळी अभिनंदन शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. अशावेळी आपल्या भाषेत दिलेल्या शुभेच्छा अधिक पटकन पोहचतात. असेच काही अभिनंदन शुभेच्छा संदेश मराठीत.
1. मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. तुझ्या यशाबद्दल अभिनंदन
2. आमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले. तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. यशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन
3. आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन. तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन
4. असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तू त्यातलीच एक आहेस याचा मला अभिमान आहे. तुझ्या या यशाबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन
5. तू एक उत्तम माणूस असून तुला जगातील प्रत्येक आनंद मिळायला हवा या मताची मी आहे. त्यामुळे तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन
6. मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस. उशीरा का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं. तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन
7. कोणतीही सुरूवात करताना शुभेच्छांची नक्कीच गरज असते आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर असतील. नव्या कामाच्या या सुरूवातीसाठी तुझे अभिनंदन. असेच यशाचे शिखर गाठ.
8. आजकाल नोकरीमध्ये पटकन प्रमोशन मिळणं हे कठीणच झालं आहे. पण तुझ्या कामाने हे सिद्ध केलंस की काहीही अशक्य नाही. नव्या जबाबदारीकरिता मनापासून अभिनंदन. तू ही जबाबदारी लिलया पेलशील याची मला पूर्ण खात्री आहे.
9. इतका प्रसिद्ध पुरस्कार मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुझ्या मेहनतीने तुला हा पुरस्कार मिळाला आहे आणि पुढेही असेच पुरस्कार मिळत राहू दे याबद्दल शुभेच्छा
10. प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन. तुला कल्पनाही करता येणार नाही इतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे
घरात बाळाचा जन्म होणं यासारखा दुसरा आनंद नाही. हा आनंद सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असतो. विशेषतः बाळाच्या आईवडिलांसाठी. बाळाच्या आईवडिलांचे करा अशाप्रकारे अभिनंदन. मराठीतून अभिनंदन
1. नव्या बाळाचे झाले आगमन, आई - बाबांचे हार्दिक अभिनंदन आणि बाळाला शुभार्शिवाद
2. तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेल्या या नव्या बाळाचे स्वागत आणि तुम्हा दोघांचे आई - वडील झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन. बाळाला जन्माच्या हार्दिक शुभेच्छा
3. नऊ महिन्यांपासून वाट पाहून अखेर आज तो दिवस उजाडलाच. आज आपल्या आयुष्यातील खास दिवस आणि क्षण. नव्या बाळाच्या जन्मदिनी आपले हार्दिक अभिनंदन
4. ओठांवर हसू गालावर खळी, आपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी. मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन
5. कृष्णाचा यशोदेला ध्यास, आई - बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आहे खास. पुत्ररत्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून अभिनंदन शुभेच्छा
6. आजपर्यंत केवळ होते घर. बाळाच्या येण्याने झाले आहे गोकुळ. नवजात बाळाच्या जन्मानिमित्त आई - वडिलांचे हार्दिक अभिनंदन
7. पहिली बेटी धनाची पेटी. कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन
8. इटुकले पिटुकले ते इवलेसे हात, गोबरे गोबरे लाल गाल, गोड गोड किती छान, सर्वांची आहे छकुली लहान. घरात आलेल्या नव्या बाहुलीसाठी तुमचे हार्दिक अभिनंदन
9. नवजात बाळाची सदैव भरभराट होवो आणि घरात नेहमी आनंद द्विगुणित होत राहो हीच इच्छा आणि नव्या आई - वडिलांचे हार्दिक अभिनंदन. लवकरच ठेवा बाळाचे छान छान नाव.
10. बाळ घरात फक्त आणि फक्त आनंदच आणणार आहे. आई आणि वडिलांचे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
पदवी मिळणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचा अनुभव आणि आनंद काही वेगळाच. अशाच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासठी खास मराठीतून अभिनंदन शुभेच्छा संदेश.
1. भरघोस यशाबद्दल अभिनंदन. आज तू स्वतःला सिद्ध करत पदवीधर झालीस याबद्दल मनापासून अभिनंदन
2. आयुष्य आता खऱ्या अर्थात सुरू होईल. आयुष्याचे नवे धडे गिरविण्यासाठी आता सज्ज होणार. पदवी प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
3. अप्रतिम यश! चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. तुझ्या या यशाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा
4. पदवीधर होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन
5. अशीच स्वप्नाला गवसणी घालत राहा. पदवीधर होणं ही स्वप्नं गाठण्याची पहिली पायरी आहे आणि त्यामध्ये यश प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन
6. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदवी आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे. पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन
7. आयुष्यात अनेक वळणं येत असतात. त्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे पदवी प्राप्त करणं आणि यामध्ये तू मिळवलेलं यश हे अप्रतिम आहे. यशाबद्दल अभिनंदन
8. नव्या जबाबदारी घेण्यासाठी आता तू नक्कीच तयार असशील. पदवी मिळविल्यावर आता नव्या जबाबदाऱ्या पार पाडायला सज्ज हो. खूप खूप अभिनंदन
9. स्वतःवर विश्वास ठेवल्याने आणि मेहनतीमुळेच हे घडलं आहे. पदवी मिळविल्याबद्दल अभिनंदन
10. यशाची पहिली पायरी पार केल्याबद्दल अभिनंदन. पदवीधर झाल्यानंतर आता पुढील वाटचालीस शुभेच्छा!
प्रत्येक टप्प्यावर यशप्राप्ती करत आपण पुढे जात असतो. अशावेळी नक्की कोणत्या शब्दात आपल्या जवळच्या व्यक्तीचे अभिनंदन करायचे असा प्रश्न पडतो. त्यासाठी खास यशप्राप्ती अभिनंदन मेसेज
1. यश मिळवशील यामध्ये आम्हाला कधीही कोणताही संशय नव्हता. तुझ्या बुद्धिमत्तेवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास होता. यशप्राप्तीसाठी मनापासून अभिनंदन
2. तू केलेल्या अप्रतिम कामाबद्दल तुझे अभिनंदन. हे यश तुला मिळायलाच हवे होते. नवा रेकॉर्ड प्रस्थापित करून यश मिळविल्याबद्दल अभिनंदन
3. प्रेरणात्मक काम हे नेहमीच यशाला जन्म देत असते आणि तू हे करून दाखवलं आहेस. पुन्हा एकदा कामातून नवा जन्म घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
4. कधीही हार न मानता कायम स्वतःला पुढे पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा दिल्याबद्दल आणि त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन
5. तुला मनापासून अभिनंदन शुभेच्छा. तुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा
6. आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो
7. पहिल्यांदा त्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, मग तुझ्यावर हसले आणि मग तुझ्याशी भांडले...पण तरीही यश तुलाच मिळालं. आता तू स्वतःला सिद्ध करत हे यश मिळवलं आहेस आणि त्यासाठी मनापासून अभिनंदन
8. तुझे हे यश पाहून मला नक्कीच आश्चर्य वाटणार नाही कारण यासाठी लागलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. तुझ्या या यशाबद्दल तुझे अभिनंदन
9. जर एखाद्या कामासाठी ऑस्कर पुरस्कार द्यायचा असता तर मी नक्की तुझे नाव सुचवले असते. तुला मिळालेल्या सर्व यशाबद्दल तुझे अभिनंदन
10. आपल्या सहकाऱ्यांनाही आपल्या यशामध्ये कसे सामावून घ्यायचे आणि यश कसे मिळवायचे हे तुझ्याकडूनच शिकायला हवे. मनापासून अभिनंदन
दोन व्यक्तींच्या मनोमिलनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे साखरपुडा. मराठीतून साखरपुड्याच्या अभिनंदन शुभेच्छा खास तुमच्यासाठी.
1. साखरपुड्याबद्दल अभिनंदन! तुम्हा दोघांची जोडी अत्यंत शोभत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा
2. यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच असू शकत नाही की तुम्ही दोघांनी साखरपुडा केला. दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि तुमचा जोडा असाच कायम राहो
3. साखरपुड्याच्या या दिवशी तुमचे अभिनंदन आणि जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो हीच इच्छा
4. परफेक्ट जोडा म्हणून नेहमीच तुमच्याकडे पाहिलं जातं आणि आता तुम्ही साखरपुडा करून हे सिद्ध केलं आहे. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन
5. तुमच्या प्रेमळ आणि अप्रतिम आयुष्यासाठी शुभेच्छा. साखरपुड्यासाठी अभिनंदन. नांदा सौख्य भरे
6. भावी नवरा आणि नवरीला मनापासून शुभेच्छा. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि वर्षानुवर्षे असेच प्रेमात राहा
7. साखरपुड्यासाठी अभिनंदन, नेहमी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करा आणि असेच सुखी राहा
8. आजपासून एका नव्या बंधनात बांधले गेल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. लवकरच संसाराला सुरूवात होईल त्यासाठी दोघांनाही शुभेच्छा
9. हा दिवस तुम्हा दोघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तुम्ही दोघांनीही एकत्र पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत आहेत. साखरपुड्यासाठी अभिनंदन
10. तुझ्या सगळ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवोत. तुझ्या साखरपुड्याच्या निमित्ताने आम्हालाही खूपच आनंद झाला आहे. मनापासून अभिनंदन
प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि अगदी महत्त्वाचा टप्पा असतो. नवा संसार थाटणं हे स्वप्नंच असतं. अशा स्वप्नपूर्तीसाठी अभिनंदन शुभेच्छा.
1. प्रेमाचे नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपण हे गुपित तुमच्य सुखी संसाराचे, संसाराच्य या नव्या वाटचालीसाठी अभिनंदन शुभेच्छा
2. तुम्हा दोघांनी पाहिलेली सर्व स्वप्नं पूर्ण व्हावीच हीच इच्छा. लग्नासाठी अभिनंदन
3. लग्नासाठी अभिनंदन. तुमचं आयुष्य प्रेमाने भरलेले राहो आणि आजन्म तुम्ही एकत्र राहो हीच मनापासून इच्छा
4. एकमेकांसाठी असणारे प्रेम कायम जपा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि कायम असेच एकत्र राहा
5. तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा. एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते. लग्नाबद्दल अभिनंदन
6. दोन अप्रतिम मनं एकत्र जोडली गेली आहेत आणि त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन. कायम एकमेमकांना अशीच साथ देत राहा
7. तुमच्या डोळ्यातील एकमेकांबद्दलचे हे प्रेम असेच कायम वाढत राहो. लग्नाच्या या शुभदिनाबद्दल अभिनंदन
8. नक्की एकमेकांशी लग्न का करायला हवं हे तुमच्याकडे पाहून कळतं. लग्नाबद्दल खूप खूप अभिनंदन.
9. नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात प्रेम कायम वाढत राहो हीच सदिच्छा
10. आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो. लग्नासाठी मनापासून अभिनंदन
वर्षभर अथवा एखाद्या कंपनीसाठी काही वर्ष केलेली मेहनत फळाला येते ती प्रमोशनच्या रूपात. अशाच बढतीसाठी अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव व्हायलाच हवा. असेच काही खास संदेश.
1. मोठी जबाबदारी, जास्त तणाव आ
णि तरीही सतत हसत असणारा चेहरा. पुढची जबाबदारीही तू अशीच पेलशील याची पूर्ण खात्री आहे. बढतीसाठी अभिनंदन
2. तू बुद्धिमान आणि मेहनती आहेस हे तुझ्या कंपनीलादेखील कळलं याचा आम्हाला अत्यानंद आहे. बढतीसाठी मनःपूर्वक अभिनंदन
3. अतिशय मेहनतीने तुला हे सर्व यश प्राप्त झालं आहे. ही बढती तुला आयुष्यात मिळणं अत्यंत गरजेचे होतं आणि तुला ती मिळाली याचा आनंद आहे. अभिनंदन
4. कोणालाही प्रमोशन उगाच मिळत नाही. त्यासाठी गाळावा लागणारा घाम आणि द्यावा लागणारा आयुष्याचा वेळ हा महत्त्वाचा ठरतो. तुझी मेहनत कामी आली. बढतीसाठी अभिनंदन
5. प्रमोशन प्रत्येकालाच हवं असतं. पण बऱ्याचदा कोणालाही मिळतं असं आपल्याला वाटतं. पण तुला मिळालेली ही बढती योग्यच आहे. अभिनंदन
6. कोणत्याही वैयक्तिक इच्छा न ठेवता सर्वांना मदत करत आपल्या टीमसाठी आणि कंपनीसाठी तू काम केलंस आणि त्यामुळेच हा बढतीचा आनंदाचा दिवस आयुष्यात आला आहे. मनापासून अभिनंदन
7. बढती मिळावी यासाठी अगदी झपाटल्यासारखं तू काम केलंस आणि आता वेळ आहे हा आनंद उपभोगायची. तुझे अभिनंदन
8. तुझे कौशल्य, तुझी बुद्धिमत्ता आणि काम करण्याची पद्धत यामुळेच तुला मिळालेली बढती ही योग्यच आहे. तुझे मनापासून अभिनंदन
9. घर आणि ऑफिस या दोन्हीचा ताळमेळ ठेवत तू मिळवलेल्या बढतीबद्दल मनापासून अभिनंदन
10. कोणीही कितीही त्रास करून घेतला तरीही तुम्हाला मिळालेली बढती ही आनंददायीच आहे. मनापासून अभिनंदन
हेही वाचा -
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक