पारंपरिक पद्धतीने साजरी करा दिवाळी, दिवाळी सणाची महिती (Diwali Information In Marathi)

पारंपरिक पद्धतीने साजरी करा दिवाळी, दिवाळी सणाची महिती (Diwali Information In Marathi)

‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’...  वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण दिवाळी, दिपावली या नावाने ओळखला जातो. जास्तीत जास्त 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद हा फारच वेगळा असतो. अगदी महिनाभर आधीच या सणाची जोरदार तयारी सुरु होते. फराळाचा सुगंध घराघरातून दरवळू लागतो. घरी सोनपावलांनी लक्ष्मी यावी यासाठी घरी साफसफाई केली जाते.रुसवे फुगवे विसरुन नातेवाईकांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद वाटण्याचा हा काळ असतो. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला खास असे महत्व आहे. तो दिवस साजरा करण्याची पद्धतही तितकीच खास आहे.दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती ही आपल्याला असायला हवी. म्हणूनच आज आपण दिवाळी सणाची माहिती आणि आकाश कंदिल या विषयी जाणून घेणार आहोत. चला तर करुया या आनंदमयीव सणाच्या माहितीची सुरुवात

Table of Contents

  दिवाळी सणाची माहिती (Diwali Information In marathi)

  दिवाळीतील दिवस हे खास पद्धतीने साजरे करण्याची एक पद्धत आहे. वेगवेगळ्या दिवसांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या दिवसाचे महत्व आणि तो दिवस कसा साजरा करतात ते आता जाणून घेऊया.

  धनत्रयोदशी (Dhanatryodashi)

  Instagram

  धनत्रयोदशी, धनतेरेस अशा नावाने हा दिवस ओळखला जातो..या दिवशी धन्वंतरी पूजनासोबतच लक्ष्मी आणि कुबेराची पूजाही केली जाते. हा दिवस साजरा का केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला कशाची खरेदी करावी आणि करु नये याचेही काही नियम आहेत धनत्रयोदशीबद्दल अनेक दंतकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक आख्यायिका जाणून घेऊया. 

  दिनांक : 13 नोव्हेंबर 2020

  दंतकथा: एकदा यमराजाने एक कथा सांगितली. एक हंस नावाचा राजा शिकार करत असताना दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाऊन पोहोचला. दुसऱ्या राज्याच्या राजाने हंस राजाचे स्वागत करत त्याचे आदरातिथ्य केले. त्याचदिवशी हेमराजाला पुत्र झाला. षष्ठीच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचे भविष्य सांगितले, राजाच्या पुत्राचा सोळाव्या मृत्यू होईल… म्हणजेच लग्नाच्या चौथ्यादिवशी तो मरेल. हे ऐकून राजा व्याकूळ झाला त्याने आपल्या पुत्राला मृत्यू येऊ नये म्हणून एका गुहेत लपवून ठेवलं. विधीवत सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे राजपुत्राचा वयाच्या सोळाव्या वर्षी हंस राजाच्या मुलीशी विवाह झाला. त्याचे प्राण घेण्यासाठी यमराज तिथे गेले. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यावेळी एवढ्या आनंदाच्या दिवशी अनर्थ कोसळलेला पाहून यमराजालाही दु:ख झाले. असा प्रसंग कोणावरही येऊ नये म्हणून त्यांनी धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करेल  त्याला अपमृत्यू येणार नाही. असे सांगितले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो.

   अशी केली जाते धनत्रयोदशीची पूजा:

  • घरी अपमृत्यू येऊ नये म्हणून घराबाहेर यमराजाच्या नावाने एक दिवा लावला जातो. म्हणून संध्याकाळी दाराबाहेर दिवा लावावा
  • धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. उत्तम आरोग्य मिळावे यासाठी धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती आणून त्याची पूजा करावी
  • याच दिवशी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. काही जण धणे-गूळ आणि पैसे ठेवून लक्ष्मीची पूजा करावी.

  नरक चतुर्थी (Narakchaturthi)

  Instagram

  दिवाळीचा पहिला दिवस अर्थात नरक चतुर्थी. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे आणि अभ्यंगस्नानाचे महत्व या दिवसासाठी खास आहे. पहाटे उठूनच या दिवसाची सुरुवात केली जाते.मस्त उटणं लावून या दिवशी आंघोळ केली जाते. उटणं लावून आंघोळ करणे म्हणजेच शरीरावरुन मल काढून शरीर शुद्धी करणे. काही जण हे घरीच उटणं बनवतात.  घराबाहेर कारेटे ठेवून अनिष्ट शक्तींना पायाखाली चिरडले जाते आणि मोठ्याने ‘गोविंदा गोविंदा’असे म्हणतात.  नरक चतुर्दशी किंवा नरक चतुर्थी संदर्भातही काही दंतकथा प्रचलित आहेत. 

  दिनांक: 14 नोव्हेंबर 2020

  दंतकथा: पुराणानुसार नरकासुर नावाचा एक असूर होता. ज्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता. त्याला विष्णूपुत्र असेही म्हणत. ज्यावेळी भगवाने विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार केला त्यावेळी हा वराह अवतार जन्मला होता. लंकापती रावणाचा वध झाल्यानंतर नरकासुराचा पृथ्वीच्या गर्भातून जन्म झाला. राजा जनक यांनी त्याचे पालनपोषण केले. पुढे त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा म्हणून भगवान विष्णू यांनी घोषित केले. नरकासुर हा राजा कंस यांच्या फार जवळचा होता. माया या राजकुमारीशी त्याचा विवाह झाला. नरकासुराचे आयुष्य व्यवस्थित व्यतित होत असताना बाणासुराच्या दुष्ट संगतीत तो अडकला. त्यामुळेच वशिष्ठ ऋषींनी नरकासुराला विष्णूच्या हातूनच मृत्यू येईल असा शाप दिला. या शापातून वाचण्यासाठी त्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करत त्याचा कोणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्याने त्या वराच्या बळावर अनेक अन्याय सुरु केले. अनेक राजांना हरवून राज्यातील स्त्रिया आणि मुलींना पळवून मणिपर्वतावर आणून ठेवले. त्याच्या या उन्मत्तपणामुळे देव आणि मानवही त्रासले होते.  अखेर भगवान कृष्णांनी नरकासुराचा वध करण्याचे निश्चित केले. त्याची राजधानी असलेल्या प्राग्ज्योतिषपूर येथे गरुडावर स्वार होत त्यांनी नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे केले. बंदिवासातील सगळ्या महिलांना सोडवले. त्यांना कोणी स्विकारणार नाही हे जाणून त्यांनी तब्बल 16 हजार कन्यांशी विवाह केला. या पराक्रमाची आठवण म्हणून नरक चतुर्थी साजरी केली जाते. 

  अशी केली जाते नरक चतुर्थी:

  • पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्या आधी लहानांना तेलाने मालिश करुन मग त्यावरच उटणं लावलं जातं. 
   घराबाहेर रांगोळी आण दिवा लावला जातो. 
  • तुळशी शेजारी दिवा पेटवून किंवा घराबाहेर कारेटं नावाच फळ घेऊन ते अंगठ्याने फोडले जाते. नरकासुराचा वध म्हणजेच अनिष्ट प्रवृत्तीचा वध  किंवा वाईटाचा नाश म्हणत मस्त सहकुटुंब दिवाळीचा फराळ खाल्ला जातो.

  लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan)

  Instagram

  दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व आहे. व्यापारीर्ग तर हा दिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतो. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा. घरी असलेला पैसा-अडका टिकवून राहावा यासाठी हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. लक्ष्मीपूजन नेमके का केले जाते आणि ते कसे करावे हे आता आपण जाणून घेऊया. 

  दिनांक: 14 नोव्हेंबर 2020

  लक्ष्मी पूजनाविषयी धार्मिक श्रद्धा: शरद पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. शरद पौर्णिमा म्हणजे नवरात्राैत्सवानंतर येणारा कोजागिरीचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला येतो. कार्तिक अमावस्येचा हा दिवस काली मातेचा असतो. या दिवशी काली मातेची पूजा होणे अपेक्षित असते. असे म्हणतात की, शरद पौर्णिमेचा म्हणेज धवल (प्रकाशाचा दिवस) लक्ष्मीचा आणि अमावस्येचा दिवस हा कालीमातेचा असतो. पण बदलत्या काळानुसार दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजाच केली जाते. आता तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाची प्रथाच रुढ झालेली दिसते. 

  असे करा लक्ष्मीपूजन: 

  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश , गणेश यांचीही पूजा केली जाते. 
  • लक्ष्मीमाता प्रसन्न राहण्यासाठी घरातील लक्ष्मी( धन-पैसा-सोनं) याची पूजा केली जाते. यामध्ये वाढ व्हाव आणि आनंद कायम टिकून राहावा अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. 

  बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा (Diwali Padva)

  Instagram

  बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या नावाने ओळखला जाणारा हा दिवस दिवाळीतील अत्यंत महत्वाचा असा दिवस आहेत. हिंदू धर्मानुसार मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक पूर्ण मुहुर्त आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ असे म्हणतात. सोने खरेदी आणि व्यापारांसाठी नव्या वर्षाची ही सुरुवात असते. या दिवशी पतीलाही औक्षण करण्याची पद्धत आहे. 

  दिनांक: 16 नोव्हेंबर 2020

  दंतकथा : असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचना यांचा पूत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही तो अत्यंत चारित्र्यवान, प्रजाहितदक्ष, दानी आणि विनयशीर होता. त्याचा  दानशूरपणा हा त्याच्या ठायी असलेल्या सगळ्यात मोठा गूण. त्याच्या या वाढत्या शक्तीच्या प्रभावाने त्याने देवांचाही पराभव केला. त्याचा पराभव करण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळाराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देणे गरजेचे होते. हे दान घेण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनाअवतार धारण केला आणि बळीराजासमोर उभे राहिले. वामनाने बळीराजाकडे तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून दान देण्याची तयारी दाखवली. वामन रुपातील विष्णूंनी प्रचंड रुप धारण केले आणि दोन पावलांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली आता तिसरे पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे बळीराजाने नम्रपणे वाकत आपले मस्तक पुढे केले. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवत त्याला पाताळ लोकात पाठवत तेथील राज्य दिले. तो गर्विष्ठ असला तरी दानशूर आणि क्षमाशील होता. म्हणूनच भगवान विष्णूंनी त्याला वर देत कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या गुणांची पूजा करतील असे सांगितले. तोच हा दिवस बलिप्रतिपदा

  असा साजरा केला जातो दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा:

  • दानशूर राजा बळी याची प्रतिमा काढत त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याची पूजा करत बळीचे राज्य येवो अशी कामना केली जाते. 
  • व्यापारांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. आर्थिक वर्षाची सुरुवात मानत या दिवशी नव्या चोपड्या आणि वह्यांचे पूजन केले जाते. 
  • तर नव- दांम्पत्यासाठी हा दिवस फारच महत्वाचा असतो. या दिवशी पत्नी पतीला उटण लावून आंघोळ घालते. पती तिला भेटवस्तू देतो. या दिवसाला दिवाळसण असेही म्हणतात. पहिली दिवाळी ही त्यामुळेच नव दाम्पत्यासाठी खास असते. 

  भाऊबीज (Bhaubij)

  बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा हा सण म्हणजे ‘भाऊबीज’ दिवाळीची सांगता या दिवसाने होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.  कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज अशी या सणाची ओळख आहे. या दिवसाच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. शिवाय या दिवसबाबत अनेक श्रद्धाही आहेत. असे म्हणतात की, या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व जागृत होतं. या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि तिच्या हातचे पदार्थ खाल्ल्यामुळे भावाला चांगला लाभ होतो. या दिवशी भावाला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या जातात.

  दिनांक:  16 नोव्हेंबर 2020

  दंतकथा: यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात. अपमृत्यूची भीती करण्यासाठी हा दिवस महत्वाचा असतो. या दिवशी यमराजाला दूर ठेवण्यासाठी ही बहीण- भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळते. 

  अशी साजरी केली जाते भाऊबीज: 

  •  बहीण- भावाचा सण असल्यामुळे बहिणीने या दिवशी भावाच्या आवडीचे खास पदार्थ बनवावेत. या दिवशी भाऊ हा बहिणीकडे येतो. 
  • बहिणीने भावाला ओवाळावे आणि भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यावी.
   भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी अपमृत्यू निवारणार्थ यमाला दीप दान करण्याची पद्धत आहे. 

  घरीच बनवा पारंपरिक आकाश कंदील (How To Make Kandil In Marathi)

  Instagram

  आता तुम्ही घरीच कंदील बनवणार असाल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पारंपरिक आणि सोपा कंदील बनवू शकता. 

  साहित्य: बांबूच्या काड्या, पतंगाचे कागद, दोरा, गोंद, कात्री 

  कृती: 

  Step1: बांबूचा कंदील बनवण्यासाठी तुम्हाला एकाच आकाराचे बांबूचे तुकडे कापून घ्यायचे आहेत. ते फार बारीक आणि जाडही असता कामा नये. यासाठी तुम्हाला आठ चौकौन तयार करायचे असतात. हे चौकौन एकाच आकाराचे हवेत. तर त्याला एक आकारा येण्यासाठी चौकोनाहून लांब अशा चार बारीक काठ्या हवा. 

  Step 2: पहिले चार चौकोन घेऊन त्याचा एक एक कोपरा एकमेकांना जोडून घ्यावा. हा आकार पंचकोनाप्रमाणे दिसायला हवा. 

  Step 3: आता चार मोठ्या काठ्या घेऊन त्या चार कोपऱ्यात उभ्या लावून त्याला हे जोडलेले चौकोन लावून घ्यावे. 
  आता उरलेले चार चौकोन क्राऊन घालतो त्याप्रमाणे दोन्ही खालच्या दिशेला आणि मग थोडे अंतर ठेवून वर बांधून घ्यावे. 

  Step 4: तुमचा कंदीलाचा साचा तयार. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग आणि डिझाईन निवडून कंदील सजवावा. या कंदीलाच्या शेपटच्या लांब ठेवा ते चांगल्या दिसतात. 

  इथून करा आकाश कंदीलांची खरेदी (Designer Aakash Kandil In Marathi)

  जर कंदील घरीच बनवण्यासाठी तुमच्याकडे तितकासा वेळ नसेल आणि तुम्हाला कंदील रेडीमेड विकत घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईनही कंदीलची खरेदी करु शकता. काही कंदीलच्या डिझाईन्स आम्ही तुमच्यासाठी निवडल्या आहेत.

  BlankLeaf Handcrafted Yellow Flower Design Paper Diwali Hanging Lantern Lamp Lampshade

  घरी इको फ्रेंडली कंदील घ्यायचा विचार केला असेल  तर तुम्ही कंदील निवडू शकता. हा कंदील फार महाग नाही. त्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षी नवा घ्यायला काहीच हरकत नाही.

  Celebrations

  BlankLeaf Handcrafted Yellow Flower Design Paper Diwali Hanging Lantern Lamp Lampshade

  INR 289 AT BlankLeaf

  GiftHouse Prettiest Beautiful Nylon Cloth Ball Lantern Fold able Lampshade Cylinder Shape

  हा कंदील बजेटमध्ये असून वापरुन झाल्यानंतर स्वच्छ पुसून तुम्ही पुन्हा ठेवू शकता. आणि त्याचा वापर हवा तेव्हा करु शकता.

  Celebrations

  GiftHouse Prettiest Beautiful Nylon Cloth Ball Lantern Fold able Lampshade Cylinder Shape Lantern Diwali Lights Lamp KANDIL

  INR 465 AT GiftHouse

  Unique Arts & Interiors Paper Multicolored Hanging Star Shaped Lantern

  पेपरपासून तयार करण्यात आलेले हा कंदील असून तुम्हाला मल्टीकलरमध्ये मिळतो. अनेकांना वेगवेगळे आकार आवडतात हा स्टार आकारामध्ये असलेला कंदील आहे.

  Celebrations

  Unique Arts & Interiors Paper Multicolored Hanging Star Shaped Lantern

  INR 279 AT Unique Arts & Interiors

  APSAMBR-12 inch Gold and Silver Each 2 Peice Paper Lanterns

  गोलाकार आणि फॅन्सी असे गोल कंदील ही तुमच्या दाराची शोभा वाढवू शकतात. त्यामुळे तुम्ही याचीही निवड करु शकता.

  Celebrations

  APSAMBR-12 inch Gold and Silver Each 2 Peice Paper Lanterns

  INR 499 AT APSAMBR

  PINK STAR HANGING LANTERN

  काचेच्या स्टार प्रकारातील हा कंदील तुम्हाला इतरवेळीही लावता येईल. हा फॅन्सी कंदील असल्यामुळे हा थोडा महाग आहे. 

  Celebrations

  PINK STAR HANGING LANTERN

  INR 1,250 AT morataara