दिवाळी आल्यानंतर फराळासह तयारी सुरू होते ती कोणते कपडे घालायचे आणि साड्या कोणत्या नेसायच्या त्यावर कसा ब्लाऊज घालायचा याची. यावर्षी तुम्ही जर बॅकलेस ब्लाऊज घालणार असाल अथवा तुम्हाला पाठ दाखवणारे कपडे घालायचे असतील तर तुम्हाला पाठ सुंदर दिसण्यासाठी हवा असेल इन्स्टंट ग्लो. तुमची पाठ जर काळसर दिसतेय असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला पाठीसाठी इन्स्टंट ग्लो मिळवायचा असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या टिप्स वापरा. बऱ्याचदा पाठीवर आलेल्या काळसर डागामुळे अथवा टॅनमुळे आपण बॅकलेस ब्लाऊज अथवा बॅकलेस कपडे घालण्याचे टाळतो. पण आता तुम्हाला यावर आम्ही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या वापरून तुम्ही इन्स्टंट ग्लो मिळवू शकता आणि तुम्हाला हवे तसे कपडे घालूही शकता. काही होममेड स्क्रब तुमची ही समस्या दूर करतील. या सणासुदीला तुम्हाला जर ट्रेंडी कपडे घालायचे असतील आणि स्टायलिश आणि आकर्षक लुक करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मिळवा पाठीचा इन्स्टंट ग्लो.
पाठीचे टॅन घालविण्यासाठी तुम्ही साखर, लिंबू आणि केळ्याच्या स्क्रबचा वापर करू शकता. तुम्ही या तिन्ही गोष्टी एकत्र करून मॅश करा आणि नीट मिक्स करून घ्या. हा स्क्रब पाठीला लावा. साधारण 10 मिनिट्स तुम्ही हे तसंच लाऊन ठेवा. नंतर आंघोळ करा. तुम्हाला त्वरीत पाठीला चमक मिळवता येते. लिंबामध्ये असणाऱ्या विटामिन सी मुळे पाठीवर काळपट डाग त्वरीत जातात आणि साखर आणि केळं तुमच्या त्वचेला उजळपणा देण्याचे काम करते. तुम्ही MyGlmm चे वाईपआऊटही वापरू शकता.
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Dark Spots On Face)
पाठीवरील काळपटपणा घालविण्यासाठी तुम्ही ओटमील आणि दुधाचा वापर करू शकता. ओटमील आपल्या त्वचेला अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी उपयुक्त ठरते तर दूध हे नैसर्गिकरित्या त्वचेला मुलायमपणा देण्याचे आणि त्वचा उजळविण्याचे काम करते. ओटमील आणि दूध एकत्र मिक्स करून घ्या. याचा तयार झालेला स्क्रब तुम्ही पाठीला लावा आणि मसाज करा. काही वेळानंतर तुम्ही आंघोळ करा. तुम्हाला पाठीचा काळसरपणा गेलेा दिसेल आणि तुमची त्वचाही अधिक मऊ आणि मुलायम झाल्याचे लक्षात येईल.
आता अंडरआर्म्स मध्ये दिसणार नाहीत काळे डाग...घालवा ‘अशा’ पद्धतीने
मध हे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे. आपल्या त्वचेसाठी याचा खूपच चांगला उपयोग करून घेता येतो. एका बाऊलमध्ये बेसन घ्या आणि त्यामध्ये अर्ध चमचा हळद पावडर मिक्स करा. त्यामध्ये केशर मिक्स करा आणि वरून मध मिक्स करून सर्व एकत्र करून घ्या. त्यानंतर सर्वात शेवटी त्यामध्ये दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही पाठीला लावा आणि मग साधारण पाच मिनिट्स तुम्ही स्क्रब करा. स्क्रब करताना पाठ खसाखसा चोळू नका. त्यानंतर आंघोळ करा. तुम्हाला पाठीवरील काळसपणा जाऊन त्वरीत चमक आलेली दिसून येईल.
मांड्यांचा काळपटपणा दूर करायचा असल्यास, जाणून घ्या सोपे उपाय
त्वचेसाठी हे उत्तम कॉम्बिनेशन मानलं जातं. एक चमचा बेसन, त्यात दही आणि अगदी चिमूटभर हळद आणि बदाम पावडर घालून मिक्स करून घ्या. ही पेस्ट तुम्ही पाठीला लावा आणि स्क्रब करा. तुम्हाला त्वरीत चमक मिळेल. बेसन आणि दही हे त्वचेसाठी उत्तम असून त्वचेवरील काळपट डाग घालविण्यासाठी चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला त्वरीत ग्लो हवा असेल तर तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक