घरीच करा तुमचे महागडे कपडे ड्राय क्लीन, जाणून घ्या योग्य पद्धत

घरीच करा तुमचे महागडे कपडे ड्राय क्लीन, जाणून घ्या योग्य पद्धत

महागडे कपडे, साड्या-शरारा किंवा एखादा महागातला कुडता एकदा वापरुन झाल्यानंतर त्याचा रंग जाऊ नये आणि तो कपडा त्याचे रंग जास्ती काळासाठी टिकून राहावे यासाठी कपडे ड्राय क्लीन करण्याचा सल्ला दिला जातो. आताच्या घडीला ड्राय क्लीन करायचे म्हणजे आपल्याला किमान 100 रुपये तरी खर्च करावाच लागतो. खूप कपडे असतील तर अशावेळी जास्तीचा फटका बसणार हे अगदी नक्की असतं. साडी किंवा मोठ्या कपड्यांचे एखाद्यावेळी चालून जाते. पण कपडे अगदी लहान आणि फार महत्वाचे नसतील पण तरीही ते जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्हाला ड्राय क्लीनसाठी पैसे घालवायला लागत असतील तर अनेकांना ड्राय क्लीन करुच नये असे वाटते. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही नवीन कपड्यांचे ड्राय क्लीन.चला करुया सुरुवात 

पांढरे कपडे धुण्याची डोकेदुखी आता विसरा फॉलो करा या टिप्स

ड्राय क्लीन म्हणजे काय?

कोणतेही पाणी न वापरता कपड्यांवj योग्य अशा केमिकल्सचा उपयोग करुन कपड्यांना स्वच्छ केले जाते. असे कपडे स्वच्छ करताना कपड्यांचा रंग टिकवणे आणि कपड्यांवर चमक राहणे हा एकमेव उद्दिष्ट असते.असे करताना कपड्यांना पुन्हा एकदा कडक इस्त्री केली जाते. त्यामुळे हे  कपडे अधिक चांगले दिसू लागतात. काही कपडे एकदा ड्राय क्लीन केल्यानंतर पुन्हा करायची गरज लागत नाही. 

कधीच वापरू नयेत न धुता नवीन कपडे, होऊ शकतं त्वचेचं नुकसान

घरच्या घरी ड्राय क्लीन करण्याची योग्य पद्धत

Instagram

घरच्या घरी ड्राय क्लीन करण्यासाठी तुम्हाला काही साहित्याची गरज लागेल. हल्ली बाजारात असे होम ड्राय क्लिनींग किट मिळतात.  पण त्यामध्ये तुम्हाला डाग काढण्याची कोणतीही सोय नसते. त्यामुळे तुम्ही सुरुवात कशी करायची ते आता जाणून घेऊया. 

  • ड्राय क्लीन तुम्ही कशाला करायला देत आहात त्यानुसार तुम्हाला ड्राय क्लीन करायचे आहे. म्हणजे तुम्ही फक्त कपडे चमकवण्यासाठी जर त्याचा उपयोग करत असाल ते तुम्हाला भिजवूनही करता येऊ शकते. म्हणजे तुम्ही मशीन वॉश ही करता येते. त्यामध्ये तुम्ही ड्राय क्लीन किटचा उपयोग करु शकता. यामुळे कपड्यांचा रंग टिकवून राहतो. 
  • कपड्याचा प्रकार कोणताही असो तुम्ही त्यावर असलेला डाग सगळ्यात आधी काढून टाका. असे करताना तुम्हाला सगळा कपडा पाण्यात भिजवायची गरज नाही. तुम्ही अगदी आरामात एका वाटीत डाग काढण्यासाठी योग्य सोल्युशन निवडून त्याने त्यावरील डाग काढा. 
  • कपडे पांढरे असतील तर तुम्हाला कपडा पूर्ण भिजला तरी चालू शकतो. पण कपडे रंगीबेरंगी असतील तर रंग एकमेकांना लागू न देणे फार गरजेचे आहे. त्यामुळे असे कपडे अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करा. 
  • कपडे स्वच्छ झाल्यावर ते वाळणेही फार गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही कपडे नीट वाळवा. त्यानंतर तुम्ही तुमचे कपडे व्यवस्थित इस्त्री करुन ठेवा. 
  • कपडे चमकवण्यासाठी बाजारात कपड्यांसाठी चांगले कंडीशनरही मिळते. ज्यामुळे कपडे अधिक चमकदार दिसू लागतात.  


आता खूप पैसे घालवायचे नसतील तर तुम्ही अगदी घरच्या घरी आणि योग्य पद्धतीने ड्राय क्लीन करु शकता. 

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज - How to Organize Your Closet in Marathi

Lifestyle

FineX Fine Care- Dry clean your pure silk saree, Expensive and delicate clothes, Bedsheets, Woolen, Blankets with Confidence

INR 299 AT Finex