मेनोपॉजच्या दिवसात अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी

मेनोपॉजच्या दिवसात अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी

मेनोपॉज अर्थात पाळी संपायच्या दिवसात महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. ज्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवरही होत असतो. वास्तविक 45 ते 50 दरम्यान मेनोपॉज येतो. यानंतर त्वचेशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात  आणि महिलांची त्वचा अधिक निस्तेज आणि खराब दिसू लागते.  तसंच वेळेवर काळजी घेतली नाही तर सुरकुत्यादेखील दिसू लागतात. त्यामुळे मेनोपॉज येण्याच्या काळात आणि अगदी त्यानंतरही त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते.  हा असा काळ असतो जेव्हा चेहऱ्यावर अधिक डाग आणि सुरकुत्या पडू लागतात.  त्यामुळे मेनोपॉजच्या दिवसात कशा प्रकारे त्वचेची काळजी घ्यायची याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेची अधिक खास काळजी घेऊ शकता. 

आपली हार्मोनल अवस्था समजून घ्या

जोपर्यंत तुम्ही तुमच्या त्वचेतील परिवर्तन संपूर्ण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या त्वचेमध्ये नक्की काय काय बदल होत आहेत ते समजणार नाही. नक्की काय बदल होत आहेत हे  समजून घेतलं तरच तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता.  त्यामुळे आपल्या त्वचेत होणाऱ्या बदलांकडे तुम्ही योग्य लक्ष द्या आणि त्यानुसार पुढचं पाऊल उचला. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा त्वचेच्या समस्या वाढत जातात.  

टी ट्री ऑईलचा वापर

Shutterstock

मेनोपॉजच्या काळात अथवा काही वेळानंतर मुरूमांची समस्या उद्भवते. यापासून सुटका मिळविण्यासाठी टी ट्री ऑईलचा वापर करा.  तसं तर बाजारामध्ये अनेक उत्पादने असतात ज्यांचा वापर केला जाऊ शकतो. पण त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणून तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर करून घेऊ शकता. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा अधिक चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

कोरड्या त्वचेसाठी उत्पादन

Beauty

GLOW Iridescent Brightening Moisturising Cream

INR 1,595 AT MyGlamm

मेनोपॉजच्या वेळी त्वचा साधारणतः कोरडी पडते. त्यामुळे अशावेळी कोणत्यातरी चांगल्या मॉईस्चराईजिंगच्या उत्पादनाचा वापर करावा. त्वचेमध्ये अशावेळी मुलायमपणा राखून ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मॉईस्चराईजिंग क्रिम अथवा लोशनचा वापर करा. 

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

कोरफड जेल सर्वात उत्तम

Shutterstock

मेनोपॉजच्या वेळी सुरकुत्यांपासून वाचायचं असेल तर कोरफड जेलचा वापर करणं अत्यंत उत्तम पर्याय  आहे. कोरफड जेलचा वापर करून तुम्ही त्वचेवरील सुरकुत्या कमी करू शकता. रोज रात्री तुम्ही चेहऱ्यावर ही कोरफडची  ताजी जेल लावा त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कोरफड जेल त्वचेवरील मृत त्वचा अर्थात डेड स्किन हटविण्याचे काम करते आणि त्वचा अधिक तरूण आणि तजेलदार दाखविण्यासाठी उपयोगी ठरते. 

कमी सेक्स करणाऱ्या महिलांना येतो लवकर मेनोपॉज, काय आहे तत्थ्य

सूर्यकिरणांपासून सुरक्षा

मेनोपॉजच्या वेळी त्वचा अतिशय  संवेदनशील असते त्यामुळे सूर्यकरिणांपासून त्वचेचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचे आहे. सूर्याच्या किरणांशी अर्थात उन्हाशी जितका कमी संपर्क होईल तितका प्रयत्न करा आणि बाहेर जाताना नेहमी चांगल्या सनस्क्रिनचा वापर करा. कधीही सनस्क्रिन न लावता उन्हामध्ये बाहेर जाऊ नका. 

रजोनिवृत्तीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय (Home Remedies For Menopause In Marathi)

खूप पाणी प्या

Shutterstock

मेनोपॉजच्या वेळी आणि त्यानंतही महिलांना त्वचेमध्ये अधिक कोरडेपणाची समस्या जाणवते. त्यामुळे अशावेळी शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचेच्या कोरडेपणाचे कारण एस्ट्रोजन हार्मोनची कमतरता हे आहे. दिवसातून किमान 10-12 ग्लास पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिजम अधिक मजबूत होते आणि त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. याप्रकारे तुम्ही त्वचेची अधिक काळजी घेऊन त्वचा कायम सुंदर आणि मऊ, मुलायम राखण्यास मदत करू शकता. मेनोपॉजमध्येही तुम्हाला त्रास होणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक