ADVERTISEMENT
home / Recipes
स्वयंपाकघरातील धुराने असाल त्रस्त, तर करा हा सोपा उपाय

स्वयंपाकघरातील धुराने असाल त्रस्त, तर करा हा सोपा उपाय

स्वयंपाकघरात सतत गॅसवर काही ना काहीतरी पदार्थ चालू असतात आणि विशेषतः फोडणी देताना अथवा काही वेळा लक्ष चुकल्याने जेवण जळल्यास अथवा बऱ्याच कारणांनी धूर सतत येत असतो. काही घरांमध्ये आता चिमणी बसवण्यात येतो. पण अजूनही काही घरात चिमणी नसल्याने आणि घरं लहान असल्याने घरात धूर साचून इतरांनाही त्रास होतो. काही घरांमध्ये स्वयंपाकघरातून धूर बाहेर जाण्यासाठी एक्झॉस्ट फॅनदेखील असतो. पण इतकं असूनही या धुराचा वास तसाच बराच वेळ घरामध्ये राहतो. तर काही वेळा या धुरामुळे घरातील टाईल्सही खराब झालेल्या दिसून येतात. मग यावर नक्की उपाय काय असा प्रश्न पडतो. तर यावर काही सोपे उपाय आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही हे उपाय करून धुरापासून त्रस्त असाल तर स्वतःची मोकळीक करून घेऊ शकता. याची वेळीच काळजी घेतली पाहिजे अन्यथा एका अभ्यासानुसार बऱ्याचदा काही जणांना उलटी, डोकेदुखी अथवा शरीरात बेचैनी निर्माण होणं अशा समस्यांनाही सामोरं जावं लागतं. तुम्हालाही या धुराने त्रस्त केले असेल तर नक्की करा हे उपाय.

लव्हेंडर ऑईल

Shutterstock

घरामध्ये  धूर झाला असेल आणि त्याचा वास जात नसेल तर तुम्ही लव्हेंडर ऑईलच्या मदतीने नक्की हा वास दूर करू शकता.  त्यासाठी तुम्ही दोन चमचे लव्हेंडर ऑईल घ्या आणि त्यात काही थेंब पाण्याचे मिक्स करा. व्यवस्थित एकत्र करा.  हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये  ठेवा आणि स्वयंपाकघरात हा स्प्रे तुम्ही मारा.  काही तासातच तुम्हाला यापासून सुटका मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. लव्हेंडरचा सुगंध तुम्हाला अधिक ताजेपणा देतो आणि धुराने आलेला थकवाही निघून जातो. 

ADVERTISEMENT

कांद्याचा करा उपयोग

Shutterstock

तुम्हाला कांदा वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल पण स्वयंपाकघरातील धुराचा कांद्याच्या वासाने पटकन नायनाट होतो. असं म्हटलं जातं की, कांद्याचा वास सहा धूर पटकन शोषून घेतो. त्यामुळे खूप धूर झाल्यास तुम्ही कांद्याचे पटकन दोन ते तीन भाग कापा आणि स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.  दिवसभर अथवा रात्रभर हे तुकडे ठेवलेत तरी चालेल. यामुळे धुराचा वास निघून जाईल. कांद्याचा वास जास्त काळ टिकत नाही.  त्यामुळे तुमच्या मनात जर प्रश्न आला की धुराचा वास जाईल पण कांद्याच्या  वासाचे काय? तर कांद्याचा वास स्वयंपाकघरात टिकून राहात नाही. 

इनडोअर झाडे लावा

ADVERTISEMENT

Shutterstock

हवा शुद्ध राखण्यासाठी आजकाल अनेक घरांमध्ये इनडोअर प्लांट्स लावले जातात. धुराचा वास कमी करण्यासाठी तुम्ही ही इनडोअर झाडं स्वयंपाघराच्या आजूबाजूला लाऊ शकता. यामुळे हवादेखील शुद्ध राहते आणि धुराचा वास निघून जाण्यासही मदत मिळते.  एअर प्लांट लावल्याने तुम्हाला नेहमी ताजेतवाने  वाटेल. तसंच झाडे लावण्याशिवाय तुम्ही जेवण करताना नेहमी तुमच्या स्वयंपाकघराची खिडकी उघडी ठेवा जेणेकरून धूर कोंडला जाणार नाही.   

घरात स्मोकिंग अर्थात धुम्रपान करू नका

Shutterstock

ADVERTISEMENT

स्वयंपाकघरात धूर पटकन  साठून राहतो.  त्यामुळे घरातील कोणतीही व्यक्ती स्मोकिंग करत असेल तर स्वयंपाकघरात अथवा घरात कुठेही स्मोकिंग करू देऊ नका. यामुळे घरातील इतरानाही अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते. सुरूवातीला काही कळणार नाही पण नंतर त्याचे परिणाम गंभीर होतील. त्यामुळे शक्यतो ही गोष्ट घरात विशेषतः पाळा आणि घरात स्मोकिंगचा धूर होणार नाही याची काळजी घ्या. तसंच कोणताही धूर साठून राहणार नाही याचीही काळजी घ्या.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT