ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
साडीत स्लिम आणि उंच दिसायचं असेल तर या टिप्स करा फॉलो

साडीत स्लिम आणि उंच दिसायचं असेल तर या टिप्स करा फॉलो

साडी हे प्रत्येक स्त्रीचं पहिलं प्रेम असतं. एखादा सण असो, लग्नकार्य असो वा पूजाविधी साडी नेसल्यावर प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. अगदी किशोरवयीन मुलींपासून साठीच्या आजीलाही साडीचा मोह आवरता येत नाही. मात्र साडी तेव्हाच छान दिसते जेव्हा ती टापटीप पद्धतीने नेसली जाते. साडी नेसायची युक्ती माहीत असेल तर कोणतीही स्त्री साडीत बारीक आणि उंच दिसू शकते. यासाठीच ही साडी नेसायची योग्य पद्धत माहीत करण्यासाठी या टिप्स नक्की वाचा.

छोटी प्रिंट असलेली साडी निवडा –

जर तुम्ही थोड्या स्थुल अथवा कमी उंचीच्या असाल तर साडीत उंच आणि बारीक दिसण्याची ही एक चांगली युक्ती आहे. जरी तुम्हाला साडीवर मोठमोठ्या प्रिंट आवडत असल्या तरी छोट्या प्रिंटच्या  साडीत तुम्ही बारीक आणि उंच दिसाल. शिवाय हे प्रिंट डेलिकेट असायला हवं आणि त्याने पूर्ण साडी भरलेली नसावी. 

हलकं कापड निवडा –

साडीत सडपातळ दिसण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. कॉटन अथवा आर्टिफिशिअल सिल्कची साडी नेसल्यावर ती फुलते आणि तुम्हीदेखील तशाच दिसू लागता. मात्र जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर हलकं प्युअर सिल्क, ऑर्गेन्जा, शिफॉन अशा साड्यांची निवड करा. ज्या तुमच्या अंगाला चिकटून राहतील आणि तुम्ही त्यामुळे बारीक दिसाल.

अस्सल मराठमोळा साज केल्यावर, अस्सल मराठमोळे साडी कोट्स

ADVERTISEMENT

लांब बाह्यांचे ब्लाऊज घाला –

साडी म्हटंली की त्यावर मॅचिंग, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे आलंच. साडीपेक्षा तुम्ही ब्लाऊज काय घालता यावर तुमचा संपूर्ण लुक अवलंबून असतो. कितीही भारी साडी असेल तर ब्लाऊज चांगलं नसेल तर त्या साडीमुळे तुमच्या सौंदर्यात भर पडणार नाही. मग जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर ब्लाऊजची निवड जाणिवपूर्वक करायलाच हवी. लांब बाह्यांचे  ब्लाऊज घातल्यामुळे तुम्ही बारीक दिसाल. कारण यामुळे तुमचे दंड झाकले जातील आणि तुमच्या खांदे आणि हाताकडचा भाग एकसमान दिसेल.

बॉर्डरची साडी निवडताना घ्या ही काळजी –

साडीला अधिक उठावदार पणा येतो तो त्या साडीच्या बॉर्डरमुळे… आजकाल अनेक डिझाईन आणि स्टाईलच्या बॉर्डर असलेल्या साड्या बाजारात मिळतात. मात्र जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर जाणिवपूर्वक छोट्या बार्डरची निवड करा. ज्यामुळे तुम्ही उंच आणि सडपातळ दिसाल. 

ADVERTISEMENT

साडी चापूनचोपून नेसा –

बारीक दिसण्यासाठी तुम्ही साडी कशी नेसता हेदेखील खूप महत्त्वाचे आहे. आकर्षक दिसण्यासाठी पदराच्या प्लेट्स छोट्या ठेवा, साडी कंबरेत चापूनचोपून नेसा आणि योग्य पद्धतीने पिन अप करा. अशा काही साध्या आणि सोप्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही साडी नेसली तर त्यात तुम्ही नक्कीच बारीक दिसाल

पेटीकोट निवडा परफेक्ट –

जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर साडीत बारीक दिसण्यासाठी पेटिकोटची निवड योग्य पद्धतीने करा. आजकाल बाजारात बॉडीशेपचे पेटीकोट मिळतात. ज्यामुळे तुमच्या कंबरेखालचा भाग सुडौल दिसतो. शिवाय यासाठी वापरण्यात येणारे कापड आरामदायक असते. ज्यामुळे तुम्हाला त्यात वावरणंदेखील सोपं जातं.

हेअरस्टाईल करा अशी –

साडीत उंच दिसायचं असेल तर केस मोकळे सोडण्याची चुक मुळीच करू नका. कारण त्यामुळे तुमची उंची झाकोळली जाईल. जर तुम्ही कमी उंचीच्या असाल तर केस मोकळे सोडण्याऐवजी पफ अथवा हाय बन अशी हेअर स्टाईल करा. ज्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा जास्त उंच दिसाल.

 

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

वर्षानुवर्ष टिकण्यासाठी अशी घ्या बनारसी साडीची काळजी

पूजा सावंतचे हे एथनिक लुक लग्नसमारंभासाठी आहेत परफेक्ट

19 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT