बिनधास्त खा गोड... यावेळी गोड खाल्ले तर नाही वाढणार वजन

बिनधास्त खा गोड... यावेळी गोड खाल्ले तर नाही वाढणार वजन

गोड पदार्थ हा अनेकांचा वीक पॉईंट असतो. पण वजन कमी करायचे म्हणजे काही खाद्यपदार्थांवर निर्बंध येतात. विशेषत: गोड पदार्थांना तर तुम्हाला तुमच्यापासून दूरच ठेवावे लागते. जिलेबी, पेढे, चॉकलेट, पेस्ट्री, रसमलाई, गुलाबजाम असे पदार्थ तर तुम्हाला फारच लांब ठेवावे लागतात. कारण गोड पदार्थ शरीरात कॅलरीज वाढवण्याचे काम करतात. गोड पदार्थांचे सेवन करुन वजन वाढते ही गोष्ट 100% खरी असली तरी देखील योग्यवेळी आणि योग्यप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केले तर तुमचे वजन वाढणार नाही आणि तुम्ही स्थुल होणार नाही. तुम्ही चुकीच्या वेळी गोड पदार्थ तर खात नाही ना? जाणून घ्या गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ

हातावरील चरबी घालवा व्यायामाशिवाय, उत्तम पर्याय

गोड पदार्थ का टाळावेत?

Instagram

वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला गोड कमी करण्यासाठी सांगितले जाते. कारण गोड पदार्थांमध्ये असलेली साखर ही कॅलरीज वाढवतात. तुमच्या शरीरात दिवसाला किती साखर जायला हवी याचेही एक बजेट ठरलेले असते. त्याहून अधिक आणि चुकीच्या वेळी जर गोड पदार्थ खाल्ले तर ते आरोग्यासाठी जास्त घातक असतात. 

उपाशी पोटी गोड पदार्थाचे करा सेवन

तुम्ही उपाशी असाल आणि तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल तर अशावेळी तुम्ही गोड पदार्थांचे सेवन करु शकता. कारण ज्यावेळी तुम्ही उपाशी असता त्यावेळी तुम्ही खाल्लेले गोड पदार्थ हे उर्जेमध्ये परावर्तित होतात. शरीराला फॅट किंवा इतर कोणत्याही गोष्टी पुरवण्याऐवजी ते शरीराला उर्जा देण्याचे काम करतात.

उदा. तुम्ही फार काळासाठी उपाशी असता त्यावेळी तुम्हाला नेमकं काय खाण्याची इच्छा तीव्र होते ते आठवा. अनेकदा भूक लागल्यावर  आपल्याला गोड खाण्याची इच्छा तीव्र होते. अशावेळी तुम्हाला कोणतेही गोड पदार्थ म्हणजे चॉकलेट किंवा पेस्ट्री असे काहीही चालते. तुम्हालाही असे काही होत असेल तर तुम्ही अशा पदार्थांचे सेवन अगदी बिनधास्त करु शकता. 

पण गोड पदार्थ खाताना तुम्ही त्याचे प्रमाणही योग्य ठेवा. तुमची भूक एका पेस्ट्री किवा आईस्क्रिमने भागली असेल तर तुम्ही उगीचच जास्त खायला जाऊ नका. 

सकाळी उठल्यावर सतत पित्ताचा त्रास होत असेल तर उपाशीपोटी खा ही फळं

वर्कआऊटपूर्वी करा गोड पदार्थांचे सेवन

Instagram

तुम्ही डाएट करत असाल पण तुम्हाला बरेचदा गोड खाऊनच घराबाहेर पडायचे असेल तर तुम्ही वर्कआऊट करण्याच्या आधी याधई याचे सेवन करा. कारण वर्कआऊटच्या आधी तुम्ही याचे सेवन केले तर तुम्हाला कॅलरीज बर्न करायला संधी मिळते. तुम्ही खाल्लेले गोड पदार्थ शरीरात राहात नाहीत. त्यामुळे तुम्हाला अगदीच एखादे चॉकलेट किंवा असे काही खायची इच्छा झाली तर तुम्ही अगदी बिनधास्त याचे सेवन करु शकता. 

जेवणानंतर गोड खाणे म्हणजे वजन वाढवणे

जेवणानंतर आपल्याकडे गोड खाण्याची पद्धत आहे. पण जेवणानंतर गोड खाणे हे आरोग्यासाठी फारच घातक असते. कारण आधीच तुमची भूक भागल्यानंतर तुमचे पोट भरलेले असते. जर जेवणानंतर तुम्ही गोड खाल्ले तर ते तुमच्या शरीराला अधिक सुस्त करण्याचे काम करते. त्यामुळे कोणत्याही जेवणानंतर तुम्ही अजिबात गोड पदार्थ खाण्याचा विचार करु नका. 

पोटासह हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उत्तम योगासन